Homeमहाराष्ट्रभुसावळमध्ये कुत्र्यांची दहशत, वर्षभरात 4 हजार 477 नागरिकांना कुत्र्यांचा चावा

भुसावळमध्ये कुत्र्यांची दहशत, वर्षभरात 4 हजार 477 नागरिकांना कुत्र्यांचा चावा

वाल्मिक जोशी (प्रतिनिधी) भुसावळ : भुसावळमध्ये भटक्या कुत्र्यांची मोठी दहशत पाहायला मिळतेय. भटक्या कुत्र्यांमुळे भुसावळकरांची घाबरगुंडी उडाली आहे. कधी कुणाला कुठे भटका कुत्रा चावा घेईल याचा काही नेम नाहीये. कारण वर्षभरात भुसावळमध्ये तब्बल 4 हजार 477 नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलाय. म्हणजे दिवसाला 12 ते 13 नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलाय.

जळगावच्या भुसावळमध्ये भटक्या कुत्र्यांची मोठी दहशत पाहायला मिळतेय. भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिकांना अक्षरक्षा जीव मुठीत घेऊन वावरावं लागतंय.. याचं कारण म्हणजे शहरात वाढलेल्या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना. शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. प्रमुख रस्ते आणि सर्वच भागांमध्ये कुत्र्यांच्या टोळ्या धुमाकूळ घालतायत. भुसावळमध्ये वर्षभरात तब्बल 4 हजार 477 जणांना भटक्या कुत्र्यांने चावा घेतला आहे. त्यामुळे भुसावळमध्ये दिवसाला 12 ते 13 नागरिकांना भटके कुत्रे चावा घेताहेत.  भटक्या कुत्र्यांचा शहरात एवढा धुमाकुळ सुरू असताना नगर परिषद प्रशासन काय करतंय हा प्रश्न उपस्थित होतोय. मात्र नगर परिषद प्रशासनाचं या भटक्या कुत्र्यांच्या त्रासाकडे लक्ष नाही आहे.

हेही वाचा : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलसह चार हॉस्पिटलही संशयाच्या भोवऱ्यात; तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात धक्कादायक अपडेट

भुसावळमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत :

भुसावळमधील नागरिक भटक्या कुत्र्यांच्या दहशतीत असून दिवसाला सरासरी 12 ते 13 जणांवर कुत्र्यांचा हल्ला होतो. लहान मुलांना चावा घेतल्याच्याही अनेक घटना समोर आल्या आहेत. भटक्या कुत्र्यांच्या त्रासाकडे पालिकेचं दुर्लक्ष होत असून मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण, लसीकरण दोन महिन्यांपासून रखडलंय. भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी 30 लाखांचा निधी मंजूर असून निर्बिजीकरणाचं ठेकेदाराला दिलेलं काम तांत्रिक अडचणीमुळे रखडलं आहे.

आतापर्यंत वर्षभरात भटक्या कुत्र्यांनी साडे चार हजार नागरिकांना चावा घेतलाय. मात्र पालिका प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाहीय. सांगलीत संभाजी भिडे यांनी कुत्र्याने चावा घेतल्यानंतर पालिका प्रशासनाला जाग आली. आणि भटक्या कुत्र्यांची धरपकड सुरू करण्यात आलीय. तसंच भुसावळ पालिकाही कोण्या मोठ्या नामांकीत व्यक्तीला कुत्र्याने चावा घेतल्यावरच याकडे लक्ष देणार का ? असा प्रश्न भुसावळकर विचारत आहेत.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

FSSAI स्टेपल पिन्स मार्गदर्शक तत्त्वे; अन्न पॅकेजिंग सुरक्षा तपासणी

0
लेखिका : अदिती ओझा2 तासांपूर्वीलिंक कॉपी करामिठाईचा डबा असो, नमकीनचे पाकीट असो, बेकरीचे सामान असो किंवा ऑनलाइन फूड असो, आपल्यापैकी बहुतेक लोक डोळे...

विजयचा नवीन चित्रपट चर्चेत:’स्त्री’ च्या निर्मात्यांसोबत विजय देवरकोंडा हातमिळवणी करू शकतो, पॅन-इंडिया चित्रपटाची तयारी

0
तेलुगू सिनेमातील मोठा स्टार आणि सतत आपल्या करिअरची दिशा बदलताना दिसणारा विजय देवरकोंडा आणखी एका मोठ्या प्रोजेक्टबद्दल चर्चेत आहेत. इंडस्ट्रीच्या गल्लीबोळात जोरदार चर्चा...

बांगलादेशच्या पंतप्रधानांचे विशेष सहाय्यक दिल्ली विमानतळावर थांबले, आयओआरएच्या बैठकीला उपस्थित न राहता परतले

0
मराठी बातम्याआंतरराष्ट्रीयबांगलादेशच्या पंतप्रधानांचे विशेष सहाय्यक दिल्ली विमानतळावर थांबले, आयओआरएच्या बैठकीला उपस्थित न राहता परतलेढाका3 तासांपूर्वीलिंक कॉपी कराबांगलादेशच्या पंतप्रधानांचे सल्लागार डॉ. जाहेद उर रहमान...

चांदी ₹8,429 ने वाढून ₹2.51 लाखांवर पोहोचली:या वर्षी किंमत ₹21 हजारने वाढली, सोनं आज...

0
सोन्या-चांदीच्या दरात 15 जून रोजी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, एक किलो चांदी 8,429 रुपयांनी वाढून 2.51 लाख...
spot_img

FSSAI स्टेपल पिन्स मार्गदर्शक तत्त्वे; अन्न पॅकेजिंग सुरक्षा तपासणी

0
लेखिका : अदिती ओझा2 तासांपूर्वीलिंक कॉपी करामिठाईचा डबा असो, नमकीनचे पाकीट असो, बेकरीचे सामान असो किंवा ऑनलाइन फूड असो, आपल्यापैकी बहुतेक लोक डोळे...

विजयचा नवीन चित्रपट चर्चेत:’स्त्री’ च्या निर्मात्यांसोबत विजय देवरकोंडा हातमिळवणी करू शकतो, पॅन-इंडिया चित्रपटाची तयारी

0
तेलुगू सिनेमातील मोठा स्टार आणि सतत आपल्या करिअरची दिशा बदलताना दिसणारा विजय देवरकोंडा आणखी एका मोठ्या प्रोजेक्टबद्दल चर्चेत आहेत. इंडस्ट्रीच्या गल्लीबोळात जोरदार चर्चा...

चांदी ₹8,429 ने वाढून ₹2.51 लाखांवर पोहोचली:या वर्षी किंमत ₹21 हजारने वाढली, सोनं आज...

0
सोन्या-चांदीच्या दरात 15 जून रोजी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, एक किलो चांदी 8,429 रुपयांनी वाढून 2.51 लाख...

फिफा विश्वचषकात आज काबो वर्डे संघाचे पदार्पण:2010 च्या चॅम्पियन स्पेनशी सामना; स्पर्धेत पहिल्यांदाच बेल्जियम...

0
फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये आज स्पेनचा सामना पहिल्यांदाच टूर्नामेंट खेळणाऱ्या काबो वर्डे संघासोबत होईल. दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने येतील. हा सामना अटलांटा...
error: Content is protected !!