Homeदेश-विदेशकात्रा श्रीनगर रेल्वे ट्रॅक ही ट्रेन 997 पुल आणि 119 किमी लांबीच्या...

कात्रा श्रीनगर रेल्वे ट्रॅक ही ट्रेन 997 पुल आणि 119 किमी लांबीच्या बोगद्यातून भारतीय रेल्वेमार्गे धावेल


कात्रा श्रीनगर रेल्वे ट्रॅक: 28 वर्षांपासून सुरु असलेल्या भारतातील सर्वात थरारक रेल्वे मार्गाचे काम अखेर पूर्ण झाले आहे. या मार्गावर तब्बल 997 पूल आहेत. तसेच या रेल्वेमार्गावरील ट्रेन 119 KM लांब बोगद्यातून धावणार आहे. या प्रवासादरम्यान रेल्वेच्या खिडकीतून बाहेर पाहिले असता बर्फाच्छदित डोंगर दऱ्या असे विहंगम निसर्ग सौंदर्य पहायला मिळेल. हा प्रवास म्हणजे स्वर्गानुभवापेक्षा कमी नसेल. विशेष म्हणजे या मार्गावरील 6 ते 7 तासांचा प्रवास फक्त 3 तासात पूर्ण होणार आहे.

कटरा-श्रीनगर रेल्वे असा हा रेल्वे मार्ग आहे. हे रेल्वे मार्ग उभारणे म्हणजे भारतीय रेल्वेसाठी मोठे चॅलेंज होते. हा रेल्वे मार्ग बांधण्यासाठी रेल्वेला तब्बल 28 वर्षे लागली. 1197 मध्ये रेल्वेने हा प्रकल्प सुरू केल होता. हा रेल्वे मार्ग उभारताना अभियंत्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. अखेर या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. 19 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी या ट्रॅकवरील पहिल्या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

जम्मू ते काश्मीर असा हा रेल्वे मार्ग असेल. या रेल्वे मार्गावर सेमी-हाय स्पीड वंदे भारत ट्रेन धावणार आहे. जम्मूमधील श्री माता वैष्णोदेवी कटरा स्टेशनपासून काश्मीरमधील श्रीनगर रेल्वे स्टेशनपर्यंत धावेल. आतापर्यंत जम्मू ते श्रीनगर रेल्वे मार्ग नव्हता. या मर्गावर रस्त्याने प्रवास करण्यासाठी 6 ते 7 तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. बर्फवृष्टी होते तेव्हा अनेक तास वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. मात्र, आता रेल्वे प्रकल्पामुळे दोन्ही शहरांमधील प्रवास जलद आणि सुलभ झाला आहे. विशेष म्हणजे कोणत्याही हवामानत प्रवास करताना कोणतीही अडचण येणार नाही.

या रेल्वे मार्गावर 36 बोगदे असणार आहेत. या बोगद्यांचे एकूण अंतर सुमारे 119 किलोमीटर इतके आहे. एकूण 272 किलोमीटरचा हा रेल्वे ट्रॅक आहे. म्हणजेच या मार्गावरील 40  टक्के रेल्वे प्रवास हा बोगद्यातून होणार आहे. या मर्गावर लहान-मोठे मिळून 979 पूल असमार आहेत. यापैकी चिनाब नदीवर बांधलेला पूल जगातील सर्वात उंच आहे. या पुलाची उंची 359 मीटर इतकी आहे. म्हणजे हा पूल आयफेल टॉवरपेक्षा 35 मीटर उंच आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

मुंबई राजभवन SRPF जवानाची ड्युटीवर आत्महत्या; पोलीस तपास

0
मलबार हिल येथील अत्यंत सुरक्षित आणि 'व्हीआयपी' समजल्या जाणाऱ्या राजभवन परिसरात एक अत्यंत खळबळजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. राजभवनाच्या सुरक्षेसाठी तैनात...

TMC ने EC ला 2027 पर्यंत समित्या वैध घोषित केल्या

0
नवी दिल्ली1 तासापूर्वीलिंक कॉपी कराममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस (TMC) गटाने सोमवारी निवडणूक आयोगासमोर (EC) आपले सविस्तर उत्तर दाखल करत बंडखोर गटाचे...

7 जुलै रोजी वक्री बुध राशी बदलेल:5 ऑगस्टपर्यंत बुध मिथुन राशीत राहील, जाणून घ्या...

0
बुध सध्या वक्री आहे, म्हणजेच हा ग्रह मागे सरकत आहे. 7 जुलै रोजी वक्री बुध कर्क राशीतून मिथुन राशीत प्रवेश करेल. 24 जुलैपर्यंत...

संजू सॅमसन झिम्बाब्वे टी-20 मालिकेतून बाहेर:वैभव सूर्यवंशीला पुन्हा संधी, रिंकू सिंगचे पुनरागमन; श्रेयसच कर्णधार...

0
BCCI ने झिम्बाब्वेमध्ये 23 ते 26 जुलै दरम्यान होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या 'प्लेअर...
spot_img

संजू सॅमसन झिम्बाब्वे टी-20 मालिकेतून बाहेर:वैभव सूर्यवंशीला पुन्हा संधी, रिंकू सिंगचे पुनरागमन; श्रेयसच कर्णधार...

0
BCCI ने झिम्बाब्वेमध्ये 23 ते 26 जुलै दरम्यान होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या 'प्लेअर...

मैत्रीतील मंदी:तीन चतुर्थांश तरुण मित्र असूनही एकटेपणा अनुभवत आहेत, अधिक ‘कनेक्टेड’ असूनही जवळच्या मित्रांची...

0
एक काळ असा होता, जेव्हा मैत्री म्हणजे तासन्तास एकत्र बसणे, विनाकारण भेटणे आणि लहान-मोठ्या प्रत्येक गोष्टी वाटून घेणे होते. आज चित्र बदलले आहे....

नेटफ्लिक्स शोमध्ये अश्नीर ग्रोवरच्या पत्नीचे वादग्रस्त विधान:’लॉकअप 2′ मध्ये माधुरी म्हणाली- श्रीमंत मुले जन्माला...

0
नेटफ्लिक्सच्या रिॲलिटी शो ‘लॉकअप 2’ मध्ये उद्योगपती अश्नीर ग्रोवर यांच्या पत्नी माधुरी जैन ग्रोवर यांच्या एका विधानावर वाद निर्माण झाला आहे. शोमध्ये एलिमिनेशन...

फरार नीरव मोदीला लवकरच भारतात आणले जाऊ शकते:युरोपियन-कोर्टात शेवटचा खटलाही हरला; गेल्या 7 वर्षांपासून...

0
फरार हिरे व्यापारी नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. नीरव मोदी युरोपीय मानवाधिकार न्यायालयात आपली शेवटची केसही हरला आहे. त्यामुळे...
error: Content is protected !!