Homeमहाराष्ट्रनवऱ्याने बायकोला नाशिक आणि बार्शीच्या 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये आत्महत्या केली

नवऱ्याने बायकोला नाशिक आणि बार्शीच्या 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये आत्महत्या केली

महाराष्ट्र :

गुन्हेगारीच्या बातमीच्या  पत्नीला ठार मारले: नाशिक आणि बार्शीमध्ये दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये जोडीदारानेच आपल्या पत्नीला संपवल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दोन्ही घटनांमध्ये पतीने पत्नीची हत्या करुन आत्महत्या केली आहे. या घटनाचा सविस्तर तपशील समोर आला असून नाशिकमधील मयत दांपत्य निवृत्त शिक्षक आहेत. तर बार्शीमधील पतीने घरासमोरील बदामाच्या झाडाला लटकून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. नेमकं घडलं काय आणि सविस्तर घटनाक्रम जाणून घेऊयात…

किरकोळ कारणावरुन पती-पत्नीमध्ये वाद

बार्शीमध्ये किरकोळ वादातून पतीने पत्नीचा खून केला आणि त्यानंतर पतीनेही गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. पतीने आधी पत्नीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूनंतर पतीनेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची ही घटना शेलगाव आरमध्ये घडली आहे. मयत पतीचं नाव वसंत पवार असं असून त्याच्या पत्नीचं नाव आयनाबाई उर्फ सोनाबाई पवार असं आहे. वसंत पवारला दारूचे व्यसन असल्यामुळे पत्नीसोबत किरकोळ भांडण विकोपाला जायचे.

पत्नीचा जागीच मृत्यू तर वडीलांचा हात फ्रॅक्चर अन् त्यानंतर…

मंगळवारी रात्री दारू पिऊन आल्यानंतर वसंतने पत्नी सोनाबाई आणि वडील अंबादास यांना किरकोळ कारणावरून लाकडी दंडुक्याने मारहाण केली होती. या मारहाणीमध्ये सोनाबाईला डोक्याला आणि तोंडाला जबर मार लागल्यामुळे ती जागीच गतप्राण झाली. तर वसंतचे वडील अंबादास यांचा हात या मारहाणीमध्ये फॅक्चर झाला. वसंत पवारने सकाळी घरासमोरील बदामाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. वैराग पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

78 वर्षीय माजी मुख्यध्यापकाने पत्नीला संपवलं

नाशिकच्या जेलरोड परिसरात राहणाऱ्या निवृत्त मुख्याध्यापकाने पत्नीची गळा दाबून हत्या केली. पत्नीला मारल्यानंतर पतीने स्वतः गळफास घेतला. पत्नीची हत्या करुन स्वत: आत्महत्या करणाऱ्या पतीचं नाव मुरलीधर जोशी असं असून ते 78 वर्षांचे होते. तर मयत पत्नीचं नाव लता जोशी असं आहे. हे दोघेही निवृत्त शिक्षक होते. दोन्ही मुले मुंबईत उच्चपदस्थ अधिकारी आहेत. या अपार्टमेंटमध्ये मुरलीधर आणि लता हे दोघेच राहत होते. लता जोशी यांना 2017 पासून मेंदू विकाराचा त्रास होता. त्या एकदा व्हेंटिलेटरवरही होत्या. दीर्घ आजारपणाला हे दांपत्य कंटाळले होते, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

चिठ्ठीत लिहिलेली ‘ती’ 2 वाक्यं

आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत मुरलीधर जोशी यांनी, “पत्नीला स्वर्गलोकी पाठवले, आता तिच्यासोबत जात आहे,” असं लिहिलेलं आढळून आलं. “आमच्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही”, असंही चिठ्ठीत लिहिल्याचं आढळून आलं.सौजन्य-झी24तास

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!