Homeदेश-विदेश‘सत्याचा विजय’; मात्र षड्यंत्रकारी शक्तींना शिक्षा झाल्यावरच संपूर्ण न्याय मिळेल...

‘सत्याचा विजय’; मात्र षड्यंत्रकारी शक्तींना शिक्षा झाल्यावरच संपूर्ण न्याय मिळेल ! – सनातन संस्थेची भूमिका

वर्ष २००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात NIA विशेष न्यायालयाने साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी आदी सर्व हिंदुत्वनिष्ठांना निर्दोष मुक्त केले, अखेर न्यायदेवतेच्या मंदिरात पुन्हा एकदा ‘सत्याचा विजय’ झाला. धर्मनिष्ठेचा विजय झाला. हा निर्णय हिंदु समाजासाठी ऐतिहासिक आहे. सनातन संस्था या सर्व निर्दाेष मुक्त झालेल्या राष्ट्रनिष्ठांचे मन:पूर्वक अभिनंदन करते. या निर्णयाने केवळ अन्याय दूर झाला नाही, तर ‘हिंदु दहशतवाद’ प्रचलित करण्याचे षड्यंत्रही खोटे ठरले आहे. आज हिंदुत्वनिष्ठांची निर्दाेष मुक्तता झाली आहे; परंतु जोवर हिंदूंना गोवणार्‍या, खोटे पुरावे सादर करणार्‍या आणि साध्वीजींसह सर्वांवर कारागृहात अनन्वित अत्याचार करणार्‍या षड्यंत्रकारी शक्तींना शिक्षा होत नाही, तोवर संपूर्ण न्याय मिळाला, असे म्हणता येणार नाही. या सर्वांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणीही सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाच्या निकालानंतर केली आहे.

         श्री. अभय वर्तक पुढे म्हणाले की, निर्दाेष मुक्त झालेल्या हिंदूंना ‘भगवा दहशतवाद’ व ‘हिंदु आतंकवाद’ या खोट्या आरोपांचा कलंक झेलत अनेक वर्षे अन्यायकारकपणे तुरुंगवास भोगला. या प्रकरणात तत्कालीन तपास यंत्रणांनी अत्यंत पक्षपाती आणि पूर्वग्रहदूषित भूमिका घेतली होती. विशेषतः तत्कालीन वरिष्ठ पोलीस अधिकारी परमवीर सिंह आणि त्यांच्यासारख्या अधिकार्‍यांनी राजकीय दबावाखाली खोटे पुरावे तयार केले. निर्दोष व्यक्तींना जबरदस्तीने गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर तत्कालीन काँग्रेसी नेते दिग्विजय सिंह, पी. चिदंबरम आणि सुशीलकुमार शिंदे यांनी ‘भगवा दहशतवाद’ हा शब्द प्रचलित करून हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचा प्रयत्न केला. २००९ मध्ये याच काँग्रेसने मडगाव बॉम्बस्फोटप्रकरणी सनातन संस्थेच्या साधकांना षड्यंत्रपूर्वक गोवले आणि २०१३ मध्ये मा. न्यायालयाने सनातनच्या सर्व साधकांना निर्दाेष मुक्त केले, तद्वतच २००८ मध्ये षड्यंत्रपूर्वक गोवलेल्यांना तब्बल १७ वर्षांनी मा. न्यायालयाने सर्वांना निर्दाेष मुक्त केले. हिंदु समाजाला आतंकवादी ठरवण्याचे पाप काँग्रेसने केले; पण न्यायदेवतेने हिंदु समाजाला न्याय दिला, असेही श्री. वर्तक म्हणाले.

   

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!