सासरच्या छळाला कंटाळून वैष्णवी हगवणे हिने 16 मे रोजी आत्महत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच, अजून एका विवाहितेने हुंड्यासाठी सुरू असलेल्या छळाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातही वैष्णवी हग
?
राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना आसरा देण्यासाठी मदत करणाऱ्या संकेत चोंधे आणि सुयश चोंधे यांचे धक्कादायक कारनामे समोर येत आहेत. संकेत चोंधेचा भाऊ सुयश चोंधेची पत्नी समोर आली असून सुयश चोंधेविरोधात पत्नीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुयश चोंधेवर छळ आणि मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी राज्य महिला आयोगातही तक्रार करण्यात आली होती.
सुयश चौंधे याच्या पत्नीने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला. सुयशची बायको म्हणाली, माझा नवरा, सासू, सासरा आणि दिराने माझा शारिरीक आणि मानसिक छळ केला आहे. माझी बदनाम केली असून त्यांच्या घरात काळी जादू देखील केली जात होते. माझ्या नवऱ्याला बाहेरच्या बायकांचा देखील नाद होता. माझा विवाह नोव्हेंबर 2017 साली झाला. वर्षाने मला मुलगी झाली, परंतु मुलगा का झाला नाही म्हणून माझा छळ करत होते. मला बेल्टने देखील मारहाण केली जात होती. लग्नात दोन लाख रुपये आणि दोन तोळे सोने दिल्यानंतरही पतीसह सासरच्या मंडळींकडून वारंवार पैशांची मागणी केली जात होती. पुढे 20 लाख रुपयांच्या अतिरिक्त हुंड्याची मागणी करण्यात आली. शेवटी सहन न झाल्याने मी पोलिसांत तक्रार केली, परंतु माझ्या तक्रारीची दखल घेतली नाही.
या संदर्भात पीडित विवाहितेने पाच महिन्यांपूर्वी खडक पोलिस ठाण्यात आणि चार महिन्यांपूर्वी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचं पीडितेचे म्हणणं आहे. तिने पती सुयश चौंधे, दीर संकेत चौंधे, सासरा नरेश चौंधे आणि सासू वैशाली चौंधे यांच्याविरोधात गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणातील मुख्य आरोपी राजेंद्र हगवणे पोलिसांना चकवा देत असताना जी थार गाडी वापरत होते, ती गाडी संकेत चौंधे याच्या नावावर असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, संकेत चौंधेला चौकशीसाठी बावधन पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले असताना, पोलिस ठाण्याबाहेर 20 ते 25 तरुणांची गर्दी झाली होती. यावेळी पीडित विवाहितेनेही पोलिस ठाण्यात हजर राहून सासरच्या छळाविरोधात थेट तक्रार दाखल केली.































