अभिनेता सलमान खान राहत असलेल्या इमारतीत एका व्यक्तीने घुसखोरी केल्याची घटना घडली आहे. मुंबई पोलिसांनी या व्यक्तीला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सलमानला कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सातत्याने धमक्या मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर ही घटना
?
यासंबंधीच्या माहितीनुसार, सलमान खान मुंबईतील गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो. या अपार्टमेंटमध्ये गुरुवारी सकाळी एका अज्ञात व्यक्तीने घुसखोरी केली. सलमानला मिळालेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्यामुळे एकच खळबळ माजली. या घटनेनंतर पोलिसांनी तत्काल सदर व्यक्तीला अटक केली. चौकशीनंतर सदर व्यक्तीचे नाव जितेंद्र कुमार सिंह असे असल्याचे समजले. तो मूळचा छत्तीसगडचा आहे. त्याने सलमानला भेटण्यासाठी येथे आल्याचा दावा केला आहे. पोलिस सध्या त्याची चौकशी करत आहेत.
पोलिसांनी हटकल्यानंतर गेला, पण पुन्हा आला
सूत्रांच्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी सायंकाळी 7.15 वा. घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी जितेंद्र कुमार सिंह याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सूत्रांना सांगितले की, या प्रकरणी बीएनएस कल 329 (1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये सलमानच्या सुरक्षेसाठी तैनात पोलिस अधिकाऱ्याने आपल्या जबाबात वांद्रे पोलिसांना सांगितले की, 20 मे रोजी सकाळी 9.45 वा. एक अज्ञात व्यक्ती गॅलेक्सी अपार्टमेंट इमारतीच्या आसपास संशयास्पद स्थितीत फिरताना आढळला होता. मी त्याला समजावून येथून परत जाण्यास सांगितले. पण त्यानंतर त्या व्यक्तीने रागाच्या भरात स्वतःचा मोबाईल फोन जमिनीवर आदळला.
त्यानंतर सायंकाळी 7.15 वा. तोच अज्ञात व्यक्ती गॅलक्सी अपार्टमेंटच्या मुख्य प्रवेशद्वारावर परत आला. त्याने इमारतीत राहणआऱ्या एका व्यक्तीच्या कारने गेटच्या आत प्रवेश केला. त्यानंतर घटनास्थळी हजर पोलिस कॉन्स्टेबल सुर्वे, म्हात्रे, पवार व सुरक्षा गार्ड कमलेश मिश्रा यांनी तत्काळ त्याला ताब्यात घेतले व वांद्रे पोलिसांच्या ताब्यात सोपवले.
घुसखोर का घुसला होता अपार्टमेंटमध्ये?
सलमान खानच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करताना पकडलेल्या गेलेल्या व्यक्तीने सांगितले की, माझी सलमान खानला भेटण्याची इच्छा आहे. पण पोलिसांनी मला त्याची भेट घेऊ दिली नाही. त्यामुळे मी लपण्याचा प्रयत्न करत होतो.
उल्लेखनीय बाब म्हणजे सलमानला आतापर्यंत अनेकदा जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे. गतवर्षी त्याच्या घराबाहेर गोळीबार झाल्याचीही घटना घडली होती. त्यानंतर त्याच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. सलमान जिथेही जातो, तिथे सध्या त्याला सुरक्षा रक्षकांचा गराडा असतो.
हे ही वाचा…
ज्योती मल्होत्रा 4 वेळा मुंबईला येऊन गेली:लालबागच्या राजाच्या गर्दीचा VIDEO काढला; पाकिस्तानला माहिती पुरवल्याचा संशय
मुंबई – पाकसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या यूट्यूबर ज्योती मल्होत्राने मुंबईचा 4 वेळा दौरा केल्याची खळबळजनक माहिती उजेडात आली आहे. ज्योती मल्होत्राने पाक अधिकारी दानिशच्या सूचनेनुसार पाकचा दौरा केला होता. त्यामुळे तिने मुंबईतील आपल्या प्रवास वर्णनाची माहिती पाकला पुरवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. वाचा सविस्तर
































