Homeमहाराष्ट्रManoj Jarange met Vaishnavi Hagvane Family Demands CID Inquiry | मनोज जरांगेंनी...

Manoj Jarange met Vaishnavi Hagvane Family Demands CID Inquiry | मनोज जरांगेंनी घेतली वैष्णवीच्या कुटुंबीयांची भेट: सीआयडी चौकशीची मागणी; म्हणाले – आरोपींवर मोक्का लागतो की नाही याची माहिती द्यावी – Pune News

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण निषेधार्ह असून हगवणे कुटुंबातील पाच जणांना यात आरोपी करण्यात आलेले आहे. तसेच एक आरोपी अद्याप आहे. वैष्णवी हिने आत्महत्या केलेली नसून तिची संगनमताने हत्या करण्यात आलेली आहे. त्यामुळे या प्रकरणात आरोपींवर मोक्का लागतो की नाह

?

वैष्णवी हगवणे हिचे वडील अनिल कस्पटे यांच्या कुटुंबाची भेट मनोज जरांगे यांनी सोमवारी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जरांगे म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि पोलिस यांनी कुटुंबाला घटनेच्या तपास प्रगतीबाबत माहिती देणे गरजेचे आहे. मात्र, ती अद्याप दिली जात नसल्याचे दिसून आले आहे.

पोलिस यंत्रणेने बारकाईने तपास करून कुटुंबाचे म्हणणे पुन्हा ऐकून घेत त्यांना न्याय देणे आवश्यक आहे. या कुटुंबाला जर न्याय नाही मिळाला आणि आरोपींच्या बाजूने जर तपास झाला, तर राज्यातील गृह विभाग आणि गृहमंत्री अकार्यक्षम असल्याचे स्पष्ट होईल. गृहमंत्रालय कमकुवत आहे आणि ते अन्याय झालेल्या ठिकाणी न्याय देत नाही असे दिसल्यास आम्ही राज्यात पुन्हा उठाव करून सरकारला जाब विचारू. पुन्हा लोक आंदोलनाच्या पावित्र्यात जातील. वैष्णवी हिला न्याय दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.

सरकारने या प्रकरणात मोक्का लावतो सांगितले आहे. त्यामुळे त्याची प्रक्रिया तातडीने सुरू झाली पाहिजे. तसेच कुटुंबास अंधारात ठेवून तपास केला जाऊ नये. हुंड्यासारख्या कुप्रथा हुंडा देणाऱ्यांनी आणि घेणाऱ्यानेही बंद केल्या पाहिजे. आपली संस्कृती वाईट दिशेने जात असल्याचे यातून स्पष्ट होत आहे, असेही जरांगे म्हणाले.

राज्य महिला आयोग यांच्याकडे ज्या तक्रारी येतात, त्याबाबत गांभीर्याने कारवाई झाली पाहिजे, त्यासाठीच आयोगाची नेमणूक करण्यात आलेली आहे. महिलांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी हक्काचे न्याय मंदिर म्हणून महिला आयोगाकडे पाहिले जाते. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत दखल घेतली जाणार नसेल तर महिला आयोग बरखास्त केलेला बरा अशी माझी भावना आहे. पुढील काळात तरी महिला आयोग सुधारला पाहिजे आणि त्यांनी महिलांच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे अशा सूचना मुख्यमंत्री यांनी दिल्या पाहिजे, असे मनोज जरांगे म्हणालेत. दरम्यान, कस्पटे कुटुंबाची यांची स्व.सरपंच संतोष देशमुख कुटुंबाने भेट घेऊन सांत्वन करत चर्चा केली.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

‘ताजमहाल तेजोमहालय मंदिर होते का’:अलाहाबाद हायकोर्टाने केंद्र- ASI ला उत्तर मागितले; सर्वेक्षण आयुक्त नियुक्तीच्या...

0
अलाहाबाद उच्च न्यायालयाने सोमवारी ताजमहालमध्ये तेजो महालय मंदिर असल्याच्या याचिकेवर सुनावणी केली. त्याचे सर्वेक्षण करण्यासाठी वकील आयोग (एडवोकेट कमिशन) नियुक्त करण्याच्या मागणीवर केंद्र...

ट्रस्टच्या वादातून साधूची फसवणूक; फसवणुकीची कथा

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराएक लोककथा आहे. जुन्या काळात एका गावातील मंदिरात एक साधू राहत होता. तो आपल्या तपस्या, शिस्त आणि साधेपणासाठी प्रसिद्ध होता....

जादूटोण्याची भीती घालून महिलेवर बलात्कार अन् जबरदस्तीने विवाह:मुलासह महिलेचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न, दारणा...

0
धंद्यात भरभराट करून देण्याचे आमिष दाखवत जादूटोण्याची भीती घालून एका महिलेवर लैंगिक अत्याचार करून नंतर तिच्याशी जबरदस्तीने विवाह केल्याप्रकरणी सायखेडा पोलिसांनी संशयित भोंदूबाबा...

श्रीलंका 142 धावांनी आघाडीवर:WI च्या पहिल्या डावात 499 धावा, ग्रीव्ह्सच्या 180 धावा; दुसऱ्या डावात...

0
श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्याचe चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने आपली आघाडी आणखी मजबूत केली. वेस्ट इंडिजचा पहिला डाव...
spot_img

श्रीलंका 142 धावांनी आघाडीवर:WI च्या पहिल्या डावात 499 धावा, ग्रीव्ह्सच्या 180 धावा; दुसऱ्या डावात...

0
श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्याचe चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने आपली आघाडी आणखी मजबूत केली. वेस्ट इंडिजचा पहिला डाव...

संजू सॅमसन झिम्बाब्वे टी-20 मालिकेतून बाहेर:वैभव सूर्यवंशीला पुन्हा संधी, रिंकू सिंगचे पुनरागमन; श्रेयसच कर्णधार...

0
BCCI ने झिम्बाब्वेमध्ये 23 ते 26 जुलै दरम्यान होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या 'प्लेअर...

मैत्रीतील मंदी:तीन चतुर्थांश तरुण मित्र असूनही एकटेपणा अनुभवत आहेत, अधिक ‘कनेक्टेड’ असूनही जवळच्या मित्रांची...

0
एक काळ असा होता, जेव्हा मैत्री म्हणजे तासन्तास एकत्र बसणे, विनाकारण भेटणे आणि लहान-मोठ्या प्रत्येक गोष्टी वाटून घेणे होते. आज चित्र बदलले आहे....

नेटफ्लिक्स शोमध्ये अश्नीर ग्रोवरच्या पत्नीचे वादग्रस्त विधान:’लॉकअप 2′ मध्ये माधुरी म्हणाली- श्रीमंत मुले जन्माला...

0
नेटफ्लिक्सच्या रिॲलिटी शो ‘लॉकअप 2’ मध्ये उद्योगपती अश्नीर ग्रोवर यांच्या पत्नी माधुरी जैन ग्रोवर यांच्या एका विधानावर वाद निर्माण झाला आहे. शोमध्ये एलिमिनेशन...
error: Content is protected !!