Homeमहाराष्ट्रMaharashtra Government Orders to Implement of Marathi Language in Government Offices |...

Maharashtra Government Orders to Implement of Marathi Language in Government Offices | राज्य शासनाचा नवा आदेश: राज्यातील सर्व कार्यालयांमध्ये मराठीचा वापर बंधनकारक, जिल्हाधिकाऱ्यांकडे अंमलबजावणीची जबाबदारी – Mumbai News

राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा वापर बंधनकारक असल्याचा आदेश राज्य शासनाने जारी केला आहे. यासंदर्भात शासनाने परिपत्रक प्रसिद्ध केले असून, या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आल

?

राज्यातील अनेक केंद्र शासनाच्या कार्यालयांमध्ये, बँका, रेल्वे, विमा कंपन्या, टपाल, गॅस सेवा, विमान सेवा, मेट्रो-मोनोरेल आदी ठिकाणी मराठी भाषेचा वापर होत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर येत होत्या. विशेषतः मुंबई आणि ठाणे परिसरातील अनेक बँकांमध्ये मराठी भाषेचा वापर न केल्यामुळे नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत होता. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक भूमिका घेत आदेश जाहीर केला आहे.

या आदेशानुसार सर्व कार्यालयांनी त्यांच्या मुख्य दर्शनी भागात त्रिभाषा सूत्रानुसार (हिंदी, इंग्रजी आणि मराठी) सूचना फलक लावणे बंधनकारक असेल. तसेच, कार्यालयात मराठी भाषेचा नियमित वापर होतो का, याची तपासणी करण्याची जबाबदारीही जिल्हाधिकाऱ्यांकडे असेल. यासाठी संबंधित कार्यालयांकडून विहित नमुन्यात स्वयंघोषणापत्र घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

राज्य शासनाच्या आदेशात असेही स्पष्ट करण्यात आले आहे की, जिल्हास्तरावर पालकमंत्री किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकींमध्ये केंद्र शासनाच्या विविध कार्यालयांतील प्रमुखांना सहभागी करून घेतले जावे. या माध्यमातून मराठी भाषेच्या वापराबाबत जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाने करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.

मुंबई आणि ठाण्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र यांसारख्या बँकांमध्ये मराठी भाषेचा वापर होत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आंदोलन देखील छेडले होते. आता सरकारच्या नव्या आदेशानुसार या बँकांमध्येही मराठीचा वापर करणे बंधनकारक असणार आहे.

राज्य सरकारच्या या नियमानुसार, केंद्र सरकारचे जी कार्यालयं महाराष्ट्रात आहेत त्या ठिकाणीही मराठीचा वापर करणे बंधनकारक असेल. रेल्वे आणि मेट्रोच्या ठिकाणी मराठीचा वापर करणे बंधनकारक असेल.

हे ही वाचा…

CBSE ने सर्व शाळांसाठी सूचना जारी केल्या:प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून देण्यावर भर, या शैक्षणिक वर्षापासून लागू होणार

सीबीएसई म्हणजेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने गुरुवार, २२ मे रोजी बोर्डाशी संलग्न शाळांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामध्ये, या शैक्षणिक सत्रापासून म्हणजेच २०२५-२६ पासून प्राथमिक शिक्षणासाठी मातृभाषा किंवा प्रादेशिक भाषा शिकवण्याचे माध्यम बनवावे लागेल. सुरुवातीच्या अभ्यासादरम्यान याची विशेष काळजी घेतली पाहिजे, असे बोर्डाने म्हटले आहे. पूर्ण बातमी वाचा…



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

‘ताजमहाल तेजोमहालय मंदिर होते का’:अलाहाबाद हायकोर्टाने केंद्र- ASI ला उत्तर मागितले; सर्वेक्षण आयुक्त नियुक्तीच्या...

0
अलाहाबाद उच्च न्यायालयाने सोमवारी ताजमहालमध्ये तेजो महालय मंदिर असल्याच्या याचिकेवर सुनावणी केली. त्याचे सर्वेक्षण करण्यासाठी वकील आयोग (एडवोकेट कमिशन) नियुक्त करण्याच्या मागणीवर केंद्र...

ट्रस्टच्या वादातून साधूची फसवणूक; फसवणुकीची कथा

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराएक लोककथा आहे. जुन्या काळात एका गावातील मंदिरात एक साधू राहत होता. तो आपल्या तपस्या, शिस्त आणि साधेपणासाठी प्रसिद्ध होता....

जादूटोण्याची भीती घालून महिलेवर बलात्कार अन् जबरदस्तीने विवाह:मुलासह महिलेचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न, दारणा...

0
धंद्यात भरभराट करून देण्याचे आमिष दाखवत जादूटोण्याची भीती घालून एका महिलेवर लैंगिक अत्याचार करून नंतर तिच्याशी जबरदस्तीने विवाह केल्याप्रकरणी सायखेडा पोलिसांनी संशयित भोंदूबाबा...

श्रीलंका 142 धावांनी आघाडीवर:WI च्या पहिल्या डावात 499 धावा, ग्रीव्ह्सच्या 180 धावा; दुसऱ्या डावात...

0
श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्याचe चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने आपली आघाडी आणखी मजबूत केली. वेस्ट इंडिजचा पहिला डाव...
spot_img

श्रीलंका 142 धावांनी आघाडीवर:WI च्या पहिल्या डावात 499 धावा, ग्रीव्ह्सच्या 180 धावा; दुसऱ्या डावात...

0
श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्याचe चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने आपली आघाडी आणखी मजबूत केली. वेस्ट इंडिजचा पहिला डाव...

संजू सॅमसन झिम्बाब्वे टी-20 मालिकेतून बाहेर:वैभव सूर्यवंशीला पुन्हा संधी, रिंकू सिंगचे पुनरागमन; श्रेयसच कर्णधार...

0
BCCI ने झिम्बाब्वेमध्ये 23 ते 26 जुलै दरम्यान होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या 'प्लेअर...

मैत्रीतील मंदी:तीन चतुर्थांश तरुण मित्र असूनही एकटेपणा अनुभवत आहेत, अधिक ‘कनेक्टेड’ असूनही जवळच्या मित्रांची...

0
एक काळ असा होता, जेव्हा मैत्री म्हणजे तासन्तास एकत्र बसणे, विनाकारण भेटणे आणि लहान-मोठ्या प्रत्येक गोष्टी वाटून घेणे होते. आज चित्र बदलले आहे....

नेटफ्लिक्स शोमध्ये अश्नीर ग्रोवरच्या पत्नीचे वादग्रस्त विधान:’लॉकअप 2′ मध्ये माधुरी म्हणाली- श्रीमंत मुले जन्माला...

0
नेटफ्लिक्सच्या रिॲलिटी शो ‘लॉकअप 2’ मध्ये उद्योगपती अश्नीर ग्रोवर यांच्या पत्नी माधुरी जैन ग्रोवर यांच्या एका विधानावर वाद निर्माण झाला आहे. शोमध्ये एलिमिनेशन...
error: Content is protected !!