Homeमहाराष्ट्रFIDE Women's Grand Prix Chess Tournament in Pune | पुण्यात महिला बुद्धिबळ...

FIDE Women’s Grand Prix Chess Tournament in Pune | पुण्यात महिला बुद्धिबळ महाकुंभ: फिडे ग्रँड प्रिक्सच्या पाचव्या टप्प्यात कोनेरु हंपीसह जागतिक स्तरावरील खेळाडूंचा सहभाग – Pune News

महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या वतीने फिडे महिला ग्रँड प्रिक्स बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या टप्प्यात या स्पर्धेत जगातील अव्वल बुद्धिबळ पत्रांमध्ये चुरशीच्या लढती रंगणार असून यामध्ये भारताची रॅपिड बुद्धिबळ जगज्जेती ग्रँड मास्टर कोनेरु हंपी,ग्रँड मास्टर

?

सोमवार,14 एप्रिल 2025पासून रंगणाऱ्या पहिल्या फेरीत कोनेरु हंपी व वैशाली आर या भारताच्या खेळाडूंमध्ये लढत रंगणार आहे. तर, भारताच्या ग्रँड मास्टर हरिका द्रोणावल्ली समोर चीनच्या ग्रँड मास्टर झू जीनरचे कडवे आव्हान असणार आहे.तसेच, भारताच्या आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुख हिला बल्गेरियाच्या आंतरराष्ट्रीय मास्टर सालिनोव्हा न्यूरघ्युन हिच्याशी सामना करावा लागणार असून अन्य दोन लढतींमध्ये पोलंडची आंतरराष्ट्रीय मास्टर एलिना कॅशलीनस्काया विरुद्ध रशियाची आंतरराष्ट्रीय मास्टर पोलिना शुव्हालोहा आणि मंगोलियाची आंतरराष्ट्रीय मास्टर बॅट खुयाक विरुद्ध जॉर्जियाची आंतरराष्ट्रीय मास्टर मेलिना सॅलोम यांच्यात लढती रंगणार आहे.

जगातील अव्वल 20महिला खेळाडूंमधील 14 खेळाडूंची त्यांच्या यापूर्वीच्या टप्प्यातील कामगिरीच्या आधारावर या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून स्पर्धेच्या सहा सत्रांच्या संयोजकांनी निवडलेल्या प्रत्येकी एका खेळाडू अशा एकूण 6 खेळाडूंचा वाईल्ड कार्ड द्वारे समावेश करण्यात आला आहे.

भारतातर्फे नागपूरची आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुख हिला वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश देण्यात आला असून ती सध्याची जगातील सर्वोच्च मानांकित ज्युनियर खेळाडू आहे.

महिलांच्या फिडे स्पर्धा मालिकेतील या आधीच्या टप्प्याचे आयोजन जॉर्जिया, कझाकस्तान,मोनॅको व सायप्रस येथे आयोजित करण्यात आले होते. आता भारत व ऑस्ट्रेलिया येथे मिळून होणाऱ्या अशा सहाठिकाणी होणाऱ्या या अत्यंत प्रतिष्ठेच्या कँडीडेट स्पर्धेसाठी या स्पर्धेतून पात्र ठरण्याची संधी असल्यामुळे जागतिक स्पर्धेची आव्हानवीर संधी मिळणार असल्यामुळे या स्पर्धेला अत्यंत महत्व आहे.

महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेचे सचिव निरंजन गोडबोले हे या स्पर्धेचे संचालक असून इव्हान सायरोव्ही हे चीफ आरबीटर म्हणून काम पाहणार आहेत. पुण्याच्या दिप्ती शिदोरे डेप्युटी चीफ आरबीटर ही जबाबदारी सोपवण्यात आली असून मार्गेट ब्रोको या स्पर्धेच्या आरबीटर असणार आहेत.स्पर्धेचे सामने राऊंड रॉबिन पद्धतीने 9फेऱ्यांमध्ये खेळविण्यात येणार आहेत.स्पर्धेचे सरासरी रेटिंग 2454 आहे. स्पर्धेचे उद्घाटन खासदार डॉ. प्रा.मेधा कुलकर्णी, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष डॉ परिणय फुके यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे कार्याध्यक्ष सिद्धार्थ मयूर, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे,महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सचिव व स्पर्धा संचालक निरंजन गोडबोले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

कथा: व्यापाऱ्याला सेवकाची शिकवण:एक छोटीशी चूक आपल्या वर्षांच्या मेहनतीवर पाणी फेरू शकते, प्रत्येक परिस्थितीत...

0
एक लोककथा आहे. एका राज्यात एक अत्यंत कुशल व्यापारी होता. त्याची बुद्धिमत्ता, प्रामाणिकपणा आणि व्यवस्थापन क्षमता अद्भुत होती. राजा देखील त्याच्या योग्यतेने प्रभावित...

जोकोविचने फेडररचा विक्रम मोडला:विम्बल्डनमध्ये सर्वाधिक 106 सामने जिंकणारा खेळाडू बनला; ओसाकाने वर्ल्ड नंबर-1 सबालेंकाला...

0
नोव्हाक जोकोविच विम्बल्डनच्या इतिहासात सर्वाधिक सामने जिंकणारा पुरुष खेळाडू बनला आहे. चौथ्या फेरीत, 39 वर्षीय जोकोविचने रशियाच्या क्वालिफायर रोमन सफीउलिनला 7-6 (8-6), 6-3,...

पंढरपुरात जीर्णोद्धार पूर्ण झालेल्या मंदिरांत मूर्तींची प्राणप्रतिष्ठा:व्यंकटेश, महालक्ष्मी, हनुमान आदी मंदिरे दर्शनासाठी खुली

0
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिर जतन व संवर्धन विकास आराखड्यांतर्गत जीर्णोद्धार व संवर्धनाची कामे पूर्ण झालेल्या व्यंकटेश मंदिर, महालक्ष्मी मंदिर, काशी...

दिल्लीत नवविवाहितेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू:अडीच महिन्यांपूर्वी झाले होते लग्न; कुटुंबाने हुंड्यासाठी हत्येचा आरोप...

0
दिल्लीतील लोधी कॉलनीमध्ये एका नवविवाहितेच्या मृत्यूचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी सांगितले की, शनिवारी एनडीएमसी (NDMC) फ्लॅट्सच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने २८ वर्षीय आकृती...
spot_img

जोकोविचने फेडररचा विक्रम मोडला:विम्बल्डनमध्ये सर्वाधिक 106 सामने जिंकणारा खेळाडू बनला; ओसाकाने वर्ल्ड नंबर-1 सबालेंकाला...

0
नोव्हाक जोकोविच विम्बल्डनच्या इतिहासात सर्वाधिक सामने जिंकणारा पुरुष खेळाडू बनला आहे. चौथ्या फेरीत, 39 वर्षीय जोकोविचने रशियाच्या क्वालिफायर रोमन सफीउलिनला 7-6 (8-6), 6-3,...

जसप्रीत बुमराह रेड बॉलची तयारी

0
अहमदाबाद2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने रेड बॉल क्रिकेटची तयारी सुरू केली आहे. रविवारी त्याने अहमदाबादमध्ये लाल एसजी चेंडूने गोलंदाजी करतानाचे...

एलपीजी सबसिडी स्कॅम अलर्ट: सायबर तज्ञांनी नागरिकांना चेतावणी दिली

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करादेशात सध्या LPG (लिक्विड पेट्रोलियम गॅस) ची थोडी टंचाई आहे. सायबर ठग याचाच फायदा घेऊन LPG ग्राहकांना लक्ष्य करत आहेत....

नवीन बायोपिक:15 वर्षांनंतर सेलिना मोठ्या पडद्यावर परतणार, ‘सिस्टर निवेदिता’ची भूमिका साकारणार

0
सेलिना जेटली सुमारे १५ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. ती दिग्दर्शक राम कमल मुखर्जी यांच्या पुढील बायोपिकमध्ये सिस्टर निवेदिता (मार्गारेट नोबल) यांची...
error: Content is protected !!