Homeमहाराष्ट्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आश्वासन दिले

शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आश्वासन दिले


पुणे : राज्यातील एक हजार मंडळांमधील एकही ढोल-ताशा वादक बेरोजगार राहणार नाही, म्हणून विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याची ग्वाही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी दिली. ‘पथकातल्या तरुणांना आर्थिक अडचण निर्माण होऊ नये म्हणून ढोल-ताशा पथकांनीही प्रयत्न करायला हवेत,’ अशी अपेक्षा पाटील यांनी या वेळी व्यक्त केली.

ढोल-ताशा महासंघातर्फे आयोजित ‘ढोल-ताशा पथकांच्या पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशना’चे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे विश्वस्त राजेश पांडे, ॲड. प्रताप परदेशी, ढोल-ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, बीएमसीसीचे प्राचार्य डॉ. राजेश सुपेकर या वेळी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, ‘वाद्यांच्या वादनाने माणसाला आत्मिक समाधान प्राप्त होते. राज्यातील वाद्यांची परंपरा मोठी आहे. ती काळासोबत विकसित होत गेली. वेगवेगळ्या वाद्यांचा समावेश विविध प्रकारच्या वादनांमध्ये होत गेला. आता ढोल-ताशा पथकांनीही वेगवेगळ्या वाद्यप्रकारांचा समावेश पथकांमध्ये करावा.’

हेही वाचा

बावनकुळे म्हणाले, ‘ढोल-ताशा परंपरेचा उगम पुण्यात झाला. मात्र, ढोल-ताशांचे वादन ही राज्याची सांस्कृतिक अस्मिता झाली आहे. त्यांच्या वादनाने चैतन्य निर्माण होते. मनामध्ये अभिमान आणि उत्साह संचारतो. महाराष्ट्राचा हा गजर देशातच नव्हे तर जगात पोहोचवायचा आहे. ढोल-ताशा हा आपल्या सांस्कृतिक उत्सवाचा आत्मा आहे. त्यामुळे हा अनमोल ठेवा पुढे नेण्याची जबाबदारी आपली आहे.’पथकांच्या अधिकाधिक मागण्या मान्य होण्यासाठी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले.पराग ठाकूर यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले,‘राज्यात एक हजार ढोल-ताशा पथके असून दीड लाख वादक वादन करीत आहेत. या तरुणांना आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण दिले तर, नैसर्गिक संकटांच्या काळात हे तरुण कामी येतील.’ॲड. शिरीष थिटे यांनी सूत्रसंचालन केले.

ढोल-ताशा पथकांच्या मागण्या

  • ढोल-ताशा वादनाला खेळ म्हणून मान्यता मिळावी
  • विविध मिरवणुकींमध्ये वादनासाठी परवानगी देण्यात यावी
  • नदीकाठ, महापालिका किंवा सरकारच्या मोकळ्या जागा वादकांना सरावासाठी मिळाव्यात
  • क्रीडा स्पर्धांंच्या उद्घाटन कार्यक्रमात ढोल-ताशांचे वादन व्हावे
  • गणेशोत्सवाच्या दीड महिना आधी वादनाला संध्याकाळी सहा ते साडेनऊ वाजेपर्यंत परवानगी असावी



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

हिमाचलमध्ये रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू:महिला शिक्षिकेने बनवलेला लाइव्ह व्हिडिओ समोर आला, दूध विकून...

0
हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यातील रामपूर येथे आज (शुक्रवारी) दुपारनंतर एक बोलेरो कॅम्पस खोल दरीत कोसळली. या अपघातात आई-मुलासह सहा जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी...

कथा: व्यापाऱ्याची दुःखी व्यक्तीला शिकवण:आपण शिकण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या मेहनतीने ज्ञान मिळवतो, तेव्हा...

0
फार जुन्या काळातील एक कथा आहे. एक सोनार मरण पावला. त्याच्या कुटुंबात त्याची पत्नी आणि एक मुलगा होता. सोनाराच्या मृत्यूनंतर कुटुंबावर आर्थिक संकट...

अनऑफिशियल कसोटी, जुरेलच्या शतकामुळे भारत-ए मजबूत स्थितीत:पहिली इनिंग 452/6 धावांवर घोषित केली; श्रीलंका-ए 114/2,...

0
गॉल येथे भारत 'ए' आणि श्रीलंका 'ए' यांच्यातील पहिल्या अनधिकृत कसोटीच्या दुसऱ्या दिवशी कर्णधार ध्रुव जुरेलने शतक झळकावले. शुक्रवारी झालेल्या पावसामुळे दिवसाचा खेळ...

व्यायामानंतरही वजन कमी होत नाही:कॅलरी ट्रॅक करणे पुरेसे नाही, हार्मोन टेस्ट करा, तज्ञांकडून वजन...

0
वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांची सर्वात मोठी तक्रार हीच असते- "मी रोज चालतो, जिममध्ये जातो, डाएटही कंट्रोल करतो, तरीही वजन कमी होत...
spot_img

अनऑफिशियल कसोटी, जुरेलच्या शतकामुळे भारत-ए मजबूत स्थितीत:पहिली इनिंग 452/6 धावांवर घोषित केली; श्रीलंका-ए 114/2,...

0
गॉल येथे भारत 'ए' आणि श्रीलंका 'ए' यांच्यातील पहिल्या अनधिकृत कसोटीच्या दुसऱ्या दिवशी कर्णधार ध्रुव जुरेलने शतक झळकावले. शुक्रवारी झालेल्या पावसामुळे दिवसाचा खेळ...

व्यायामानंतरही वजन कमी होत नाही:कॅलरी ट्रॅक करणे पुरेसे नाही, हार्मोन टेस्ट करा, तज्ञांकडून वजन...

0
वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांची सर्वात मोठी तक्रार हीच असते- "मी रोज चालतो, जिममध्ये जातो, डाएटही कंट्रोल करतो, तरीही वजन कमी होत...

लग्नासाठी गोव्यात पोहोचले साऊथ आणि बॉलिवूड स्टार्स:अनिल कपूर-जॅकी श्रॉफ, चिरंजीवी आणि नागार्जुन पारंपरिक लूकमध्ये...

0
अभिनेत्री आणि राजकारणी खुशबू सुंदर आणि चित्रपट निर्माता सुंदर सी यांची मोठी मुलगी अवंतिका सुंदर विवाहबंधनात अडकली आहे. तिने 25 जून रोजी गोव्यातील...

50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी, 22 भाषा सपोर्ट

0
नवी दिल्ली4 तासांपूर्वीलिंक कॉपी करासॅमसंगने आपला गॅलेक्सी A-सिरीजचा नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी A27 5G जागतिक बाजारात लॉन्च केला आहे. हा नवीन हँडसेट जुन्या गॅलेक्सी...
error: Content is protected !!