वसमत शहरातील सर्वेनंबर १८० मध्ये गावठाणचे बनावट प्रमाणपत्र जोडून भुखंडाची खरेदी विक्री करणाऱ्या दोघांवर वसमत शहर पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. २५ फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या भागातील खरेदी विक्रीत मोठा गोंधळ उघडकीस येणार असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत येथील सर्वेनंबर १८० मध्ये पालिकेच्या मालकिची जागा आहे. या ठिकाणी मागील काही दिवसांपासून भुखंडाची खरेदी विक्री केली जात होती. मात्र सदर खरेदी विक्री अवैध असल्याच्या तक्रारी नगसेवकांनी पालिका प्रशासनाकडे केल्या होत्या. त्यानुसार पालिकेचे मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर यांनी तातडीने पथक स्थापन करून खरेदी विक्रीसाठी पालिकेकडून देण्यात आलेल्या दस्ताऐवजाची चौकशी सुरु केली होती. या चौकशीमध्ये या सर्वेनंबर मध्ये आतापर्यंत झालेल्या सर्व खरेदी विक्री व्यवहाराच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. यामध्ये काही दिवसांपुर्वीच झालेल्या खरेदीखतासाठी वसमत पालिकेच्या नगररचना विभागाच्या अधिकाऱ्याकडून देण्यात आलेल्या गावठाण प्रमाणपत्राबाबत संशय निर्माण झाला होता. त्यानुसार गावठाण प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्राची शाहनिशा केल्यानंतर सदर प्रमाणपत्रावर संबंधित अधिकाऱ्यांनी आपली स्वाक्षरी नसल्याचे स्पष्ट करीत त्या प्रमाणपत्रावरील स्वाक्षरी बनावट असल्याचे स्पष्ट केले. यावरून गावठाण प्रमाणपत्राचा बनावट प्रकार उघड झाला. त्यामुळे मुख्याधिकारी चिंचाळकर यांनी तातडीने पालिकेचे कर्मचारी ज्ञानेश्वर जाधव यांना दोषींवर गुन्हे दाखल करण्यासाठी प्राधिकृत केले. त्यानंतर जाधव यांनी आज वसमत शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यामध्ये देवानंद साबळे (रा. कोर्टा, ता. वसमत) व मंगेश पारवेकर (रा. वसमत) यांनी दस्ताऐवज तयार करतांना नगर रचना सहाय्यक यांच्या स्वाक्षरीचे बनावट प्रमाणपत्र तयार करून फसवणुक केल्याचे नमुद केले. यावरून पोलिसांनी देवानंद व मंगेश यांच्या विरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक सुधीर वाघ पुढील तपास करीत आहेत.
Source link
वसमतमध्ये बोगस ‘गावठाण’ प्रमाणपत्राद्वारे भूखंडाची विक्री:दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी ट्रस्टने FIR दाखल केली:यात टिन्नू यादवसह 8 जणांची नावे;...
राम मंदिराच्या देणगी चोरी प्रकरणात श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने गुरुवारी एफआयआर (FIR) दाखल केली आहे. यात 8 आरोपी बनवण्यात आले आहेत. ट्रस्टचे...
Horoscope 25 june 2026 leo income sagittarius job responsibility
14 तासांपूर्वीकॉपी लिंकगुरुवार, 25 जून रोजी सिंह राशीच्या लोकांना यश मिळू शकते आणि उत्पन्न चांगले राहील. कन्या राशीच्या लोकांनी कोणाला उधार पैसे दिले...
साई सुदर्शनने श्रीलंका-ए विरुद्ध शतक झळकावले:पहिल्या अनऑफिशियल कसोटीत इंडिया-ए चा स्कोअर 333/4, ध्रुव जुरेल-शेख...
श्रीलंका 'ए' संघाविरुद्धच्या पहिल्या अनधिकृत कसोटीच्या पहिल्या दिवशी भारत 'ए' संघाने ४ गडी गमावून ३३३ धावा केल्या. भारतीय सलामीवीर साई सुदर्शनने आपल्या प्रथम-श्रेणी...
ग्रे-डिवोर्स; अमेरिकेत 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये 40% घटस्फोट:कारण- नात्यांपेक्षा अस्तित्वाला जास्त महत्त्व देत...
30 वर्षांपेक्षा जास्त काळ एकत्र राहिल्यानंतर ऍलन हिकेनबॉटम आणि त्यांच्या पत्नीने घटस्फोट घेतला. सुरुवातीला दोघांमध्ये पुस्तके आणि कलेबद्दल खूप ओढ होती. दोघांनी मिळून...
साई सुदर्शनने श्रीलंका-ए विरुद्ध शतक झळकावले:पहिल्या अनऑफिशियल कसोटीत इंडिया-ए चा स्कोअर 333/4, ध्रुव जुरेल-शेख...
श्रीलंका 'ए' संघाविरुद्धच्या पहिल्या अनधिकृत कसोटीच्या पहिल्या दिवशी भारत 'ए' संघाने ४ गडी गमावून ३३३ धावा केल्या. भारतीय सलामीवीर साई सुदर्शनने आपल्या प्रथम-श्रेणी...
ग्रे-डिवोर्स; अमेरिकेत 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये 40% घटस्फोट:कारण- नात्यांपेक्षा अस्तित्वाला जास्त महत्त्व देत...
30 वर्षांपेक्षा जास्त काळ एकत्र राहिल्यानंतर ऍलन हिकेनबॉटम आणि त्यांच्या पत्नीने घटस्फोट घेतला. सुरुवातीला दोघांमध्ये पुस्तके आणि कलेबद्दल खूप ओढ होती. दोघांनी मिळून...
'वेलकम टू द जंगल' चे 56 हजार तिकीट विकले:आगाऊ बुकिंगमध्ये ₹1.34 कोटींची कमाई, नवीन...
‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटातील नवीन गाणे ‘ओ मेरे बलम’ आज प्रदर्शित झाले आहे. ट्रेलरमध्ये ऐकू आलेल्या त्याच्या धुनने प्रेक्षकांचे लक्ष वेधून...
ग्रीन होम 4% पर्यंत महाग, वीज-पाण्यावर 30% पर्यंत बचत:घर खरेदी करताना टिकाऊपणा नवीन निकष...
घर खरेदी करण्याचे निकष आता फक्त स्थान, किंमत आणि सुविधा नाहीत, तर टिकाऊपणा (सस्टेनेबिलिटी) देखील आहे. प्रॉपटेक फर्म स्क्वेअर यार्ड्सच्या एका अहवालानुसार, ग्रीन...






























