Homeमहाराष्ट्रCase registered against Cabinet Minister Radhakrishna Vikhe Patil | कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण...

Case registered against Cabinet Minister Radhakrishna Vikhe Patil | कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर गुन्हा दाखल: साखर कारखान्यात 9 कोटींच्या अपहाराची होती तक्रार, सर्वोच्च न्यायालयाने दिले चौकशीचे आदेश – Mumbai News

राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के आणि इतर 54 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाख

?

शेतकऱ्यांच्या नावावर राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज घेऊन शेतकऱ्यांना वितरित न केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. 2004-2005 आणि 2007 साली अपहार केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. तसेच कारखान्याच्या तत्कालीन संचालक मंडळावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी प्रवरा कारखान्याचे सभासद बाळासाहेब केरूनाथ विखे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राधाकृष्ण विखे पाटलांसह 54 जणांवर भादंस कलम 415, 420, 464, 465 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील हे राज्यातील नेते तसेच कॅबिनेट मंत्री आहेत, त्यामुळे पोलिस त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ करत होते. त्यामुळे तक्रारदार बाळासाहेब केरूनाथ विखे यांनी राहता येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. येथील न्यायालयाने फिर्यादीची चौकशी करून सर्व संचालकांच्या विरुद्ध क्रिमिनल प्रोसिजर कोड कलम 156/3 अन्वये गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले होते. परंतु विखे पाटलांनी औरंगाबाद खंडपीठात दाद मागितली तेव्हा औरंगाबाद उच्च न्यायालयाने राहता येथील न्यायालयाचा आदेश अमान्य केला होता.

यानंतर बाळासाहेब विखे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. अखेर सर्वोच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निकाल ग्राह्य धरत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह 54 जणांवर गुन्हा दाखल करत चौकशीचे आदेश दिले आहेत.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

24 जूनचे राशिभविष्य:वृषभ राशीच्या लोकांना गुंतवणुकीतून फायदा, मीन राशीच्यांना अडकलेले पैसे मिळतील आणि कन्या...

0
बुधवार, 24 जून रोजी वृषभ राशीच्या लोकांसाठी गुंतवणूक फायदेशीर ठरेल आणि यंत्रसामग्रीशी संबंधित व्यवसायात नफा होऊ शकतो. कर्क राशीच्या लोकांचा जमिनीशी संबंधित वाद...

महिला टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा सलग चौथा विजय:पाकिस्तानला 113 धावांनी हरवले, पेरी-वोलची 100+ धावांची भागीदारी

0
टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलिया महिला संघाची उत्कृष्ट कामगिरी सुरू आहे. हेडिंग्ले येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 113 धावांनी पराभव केला. एलिस पेरीच्या 71 धावांच्या...

पाच दिवसीय संस्कार प्रशिक्षण शिबिरांतून संस्कृतीची ओळख:230 हून अधिक बालसाधकांनी घेतला शिबिराचा प्रत्यक्ष लाभ‎

0
सध्याच्या आधुनिक युगात लहान मुलांवर योग्य संस्कार व्हावेत आणि त्यांना आपल्या समृद्ध संस्कृतीची ओळख व्हावी, या उद्देशाने सनातन संस्थेच्या वतीने केशवनगर भागातील जानोरकर...

गंगा नदीत बोटीत बसून बीअर पार्टी, नॉनव्हेज खाल्ले:वाराणसी पोलिसांनी पाच जणांना अटक केली, 5...

0
काशीमध्ये गंगा नदीत बोटीवर मांसाहारी आणि बिअर-दारू पार्टी केल्याचा प्रकार समोर आला आहे. व्हिडिओमध्ये 5 नावाडी बोटीत बसून चिकन बनवताना दिसत आहेत. सोबत...
spot_img

महिला टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा सलग चौथा विजय:पाकिस्तानला 113 धावांनी हरवले, पेरी-वोलची 100+ धावांची भागीदारी

0
टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलिया महिला संघाची उत्कृष्ट कामगिरी सुरू आहे. हेडिंग्ले येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 113 धावांनी पराभव केला. एलिस पेरीच्या 71 धावांच्या...

श्री चरणी पहिल्यांदाच नंबर-1 महिला टी-20 बॉलर:वर्ल्डकप 2026 मध्ये सर्वाधिक 10 विकेट्स घेतल्या; बॅटिंगमध्ये...

0
21 वर्षांची भारतीय फिरकीपटू श्री चरणी महिला टी-20 आंतरराष्ट्रीय गोलंदाजी क्रमवारीत नंबर-1 स्थानावर पोहोचली आहे. तिने इंग्लंडची फिरकीपटू लिन्सी स्मिथला मागे टाकत पहिले...

या गोष्टींसोबत जांभूळ खाऊ नका:होऊ शकते गॅस, ब्लोटिंग, पोटदुखी, जाणून घ्या याचे फायदे, खाण्याची...

0
पाऊस सुरू होताच बाजारात जांभळांची रेलचेल सुरू होते. आंबट-गोड चवीचे हे गडद जांभळ्या रंगाचे फळ पोषक तत्वांचा खजिना आहे. यात फायबर, लोह, व्हिटॅमिन...

नाचते हुए मरी तो मिसाल बन जाउंगी!:’ईठा’चा थक्क करणारा टीझर रिलीज; लावणी सम्राज्ञी विठाबाईंच्या...

0
'स्त्री २' या ऐतिहासिक यशानंतर बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर कोणत्या भूमिकेत दिसणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. अखेर मॅडॉक फिल्म्सने श्रद्धाच्या आगामी 'ईठा'...
error: Content is protected !!