महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी, विविध अध्यादेशांचे सादरीकरण आणि मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आजच्या कामकाजात राज्यातील दुष्काळ, पाणीटंचाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, वीजटंचाई तसेच विविध प्रलंबित मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) आणि शिंदे गटातील राजकीय घडामोडी, सहा खासदारांच्या पक्षांतराचा मुद्दा आणि ‘ऑपरेशन टायगर’ यावरूनही सभागृहात जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे. महायुती सरकारकडून महत्त्वाची विधेयके मांडली जाणार असून विरोधक आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. पहिल्या दिवशी तरतूद: शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी 20,552 कोटी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारने दोन्ही सभागृहांत ९७,७०६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या आहेत. आगामी काळातील राजकीय गणिते लक्षात घेता यातून शेतकरी, कष्टकरी महिला आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर निधीची मोठी तरतूद करण्यात आली आहे. विशेषतः ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी आणि शेतकरी वर्गाला दिलासा देण्यासाठी सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ची घोषणा करत थेट २० हजार ५५२ कोटी रुपयांची विक्रमी तरतूद केली आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन व वेतनासाठी १,७३४ कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर झाला आहे. विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी ५०० कोटी दिले आहेत. आर्थिक अडचणीत सापडलेल्या सहकारी साखर कारखान्यांना बाहेर काढण्यासाठी ४८३ कोटी रुपये मंजूर केले आहेत. याशिवाय २०१७ मधील जुन्या शेतकरी सन्मान योजनेतील प्रलंबित देणी पूर्ण करण्यासाठी २०० कोटी मंजूर झाले आहेत. तसेच संजय गांधी दिव्यांग निराधार योजनेसाठी ८७४ कोटी दिले आहेत. सुरक्षेसाठी कोट्यवधींचा बूस्टर डोस नागपूर विधानभवन विस्तारासाठी १०० कोटी, नवीन कारागृह बांधकामासाठी २०० कोटी आणि सागरी पोलिस प्रशिक्षणासाठी ३८२ कोटी रुपये दिले आहेत. यासह सायबर गुन्हे जनजागृतीसाठी २० कोटी आणि सीसीटीएनएस प्रकल्पासाठी ५० कोटी रुपये निश्चित केले आहेत.
Source link
पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस:दुष्काळ, पाणीटंचाई आणि ‘ऑपरेशन टायगर’वरून सभागृहात खडाजंगीची शक्यता
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
लखनऊ कोचिंग आगीत 15 ठार; इमारत अनधिकृत:2016 मध्ये पाडण्याचे दिले होते आदेश; 4 अधिकारी...
लखनऊमधील कोचिंगला आग लागल्याच्या घटनेत आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 5 महिला आणि 10 पुरुष आहेत. बहुतांश जण 20 ते 30...
25 ला निर्जला एकादशी, 29 ला वट पौर्णिमा:पाण्याचे महत्त्व समजावून सांगणारे एक व्रत, दुसरे...
जूनच्या शेवटच्या आठवड्यात दोन मोठे व्रत येतील. 25 जून, गुरुवारी निर्जला एकादशी आणि 29 जून, सोमवारी वटपौर्णिमा व्रत केले जाईल. हे दोन्ही व्रत...
Mbappe पहिला खेळाडू 6 वेळा 2+ गोल; फ्रान्स, नॉर्वे अंतिम ३२ मध्ये पोहोचले
16 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराफ्रान्सचा स्टार फॉरवर्ड किलियन एमबाप्पे वर्ल्ड कपच्या इतिहासात एका सामन्यात दोन किंवा अधिक गोल सर्वाधिक वेळा करणारा खेळाडू बनला आहे....
टीएमसी समांतर समिती स्थापन; अरुप रॉय अध्यक्ष; ऋतब्रता भट्टाचार्यांचे ममता बान यांना आव्हान
मराठी बातम्याराष्ट्रीयटीएमसी समांतर समिती स्थापन; अरुप रॉय अध्यक्ष; ऋतब्रत भट्टाचार्यांचे ममता बान यांना आव्हानकोलकाता6 तासांपूर्वीलिंक कॉपी कराविधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर तृणमूल काँग्रेस (टीएमसी)...
Mbappe पहिला खेळाडू 6 वेळा 2+ गोल; फ्रान्स, नॉर्वे अंतिम ३२ मध्ये पोहोचले
16 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराफ्रान्सचा स्टार फॉरवर्ड किलियन एमबाप्पे वर्ल्ड कपच्या इतिहासात एका सामन्यात दोन किंवा अधिक गोल सर्वाधिक वेळा करणारा खेळाडू बनला आहे....
उद्या हॉकीमध्ये भारत-पाकिस्तान सामना:FIH प्रो लीगमध्ये सामना, मागील सामना 2024 मध्ये झाला; सध्या भारत...
भारतीय पुरुष हॉकी संघ मंगळवारी FIH प्रो लीगच्या लंडन लेगमध्ये आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानशी खेळेल. हा सामना लंडनच्या ली वेली हॉकी सेंटरमध्ये भारतीय...
विचार सकारात्मक ठेवा, म्हातारपणाची जाणीव होणार नाही:जगप्रसिद्ध पुस्तक ‘द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शियस माइंड’...
वाढत्या वयातही मन तरुण ठेवता येते का? सकारात्मक विचार खरोखरच जीवनात फरक घडवू शकतात का? जगातील सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या प्रेरणादायी पुस्तकांपैकी एक असलेल्या...
पुष्पा-2 चेंगराचेंगरी प्रकरण, अल्लू अर्जुन न्यायालयात व्हर्चुअली हजर होणार:न्यायालयाने समन्स पाठवले होते, चार्जशीटमध्ये आरोपी...
हैदराबादमधील संध्या थिएटर अपघाताच्या प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुन सोमवारी नामपल्ली न्यायालयात व्हर्च्युअली हजर राहणार आहेत. न्यायालयाने त्यांना वैयक्तिकरित्या हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते....





























