Homeदेश-विदेशAssam: Kidney smugglers gang exposed after drug addicts were taken to Kolkata...

Assam: Kidney smugglers gang exposed after drug addicts were taken to Kolkata for kidney transplant, 880 people affected | भास्कर ग्राउंड रिपोर्ट: आसाममध्ये नशेखाेरांची किडनी काढण्यासाठी कोलकाता येथे नेत, 880 जण पीडित, किडनी तस्कर टोळीचा पर्दाफाश


  • मराठी बातम्या
  • राष्ट्रीय
  • आसाम: किडनी प्रत्यारोपणासाठी कोलकाता येथे अंमली पदार्थांच्या आहारी गेल्यानंतर किडनी तस्करांच्या टोळीचा पर्दाफाश, 880 लोक प्रभावित

मनोज लस्कर38 मिनिटांपूर्वी

  • लिंक कॉपी करा

आसाममधील नागाव येथील कैवर्ता या लहानशा गावाची लोकसंख्या सुमारे २,२०० आहे. येथे भेटणारा काेणताही व्यक्ती स्वत:च्या एकाच मूत्रपिंडाबद्दलची कहाणी सांगेल. गावातील ४०% (८८०) रहिवाशांकडे फक्त एकच किडनी आहे. खरे तर ड्रग्जच्या व्यसनामुळे आणि आर्थिक अडचणीमुळे या लोकांनी त्यांची एक किडनी विकली आहे. त्यांची दुर्दशा पाहून दलाल त्यांच्याशी संपर्क साधतात आणि त्यांना कोलकाता येथे घेऊन जातात. तेथे शस्त्रक्रियेनंतर त्यांची एक किडनी काढली जाते. आता हे तस्करीचे प्रकरण चव्हाट्यावर आले आहे.

पोलिसांनी धरनी दास, महेंद्र दास आणि दीपदास या तीन तस्करांना अटक केली आहे. ते गरिबांकडून किडनी विकण्याचे रॅकेट चालवत होते. ते बऱ्याच काळापासून हे रॅकेट चालवत होते. गावात बेकायदा दारू आणि ड्रग्जविरुद्ध अलिकडेच झालेल्या जागरूकता बैठकीत ही बाब उघडकीस आली. गावातील २०% लोकांकडे नोकऱ्या आहेत, तर १०% शेतकरी आहेत. उर्वरित लोक मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहेत.

अनेक वर्षांपासून तस्करी, पत्नींनीही दिली किडनी

हुज-कॅबर्टा गावप्रमुखांच्या मते, हा गाेरखधंदा अनेक वर्षांपासून सुरू होता. गरिबी, अवैध दारूचा व्यापार आणि किडनीची विक्री यामुळे गावाचे रूपांतर अपंग लोकांच्या समाजात होत आहे. रहिवाशांनी सांगितले की अनेक गावातील घरांमध्ये पती-पत्नी दोघांनीही प्रत्येकी एक किडनी विकली आहे.कुटुंबात पाच सदस्य असतील तर त्यापैकी तिघांनी आधीच त्यांची किडनी विकली आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर बोलताना एका गावकऱ्याने स्पष्ट केले की गावातील काही विवाहित महिला माहेरी निघून गेल्या तेव्हा दलालांनी या पुरुषांना भावनिक केले. नंतर त्यांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांची किडनी विकण्याचे आमिष दाखवले गेले.

लॉकडाऊननंतर ही टोळी पुन्हा सक्रिय

२०२० च्या लॉकडाऊन दरम्यान मोरीगाव जिल्ह्यातील दक्षिण धरमतुलमध्ये अशाच प्रकारच्या अवयव तस्करी रॅकेटचा पर्दाफाश झाला. त्या प्रकरणात २० हून अधिक गरीब लोक अडकले होते. गुवाहाटी येथील लिलीमाई बडा नावाच्या महिलेला सूत्रधार म्हणून अटक करण्यात आली होती. २०२१ मध्ये नागावमधील हुज गावातील दीपक सिंगला “गार्डची नोकरी’ देण्याचे आमिष दाखवून कोलकात्याला नेण्यात आले. तिथे वैद्यकीय चाचणीच्या नावाखाली त्याची किडनी काढण्याचा कट रचण्यात आला. पण दीपकला संशय आला आणि पळून गेला.

किडनी रॅकेटचा बळी ठरलेले कुटुंब

आणखी एका पीडितेने सांगितले की, “आम्हाला वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली कोलकात्याला नेले हाेते. नंतर बेशुद्ध करून आमच्या किडन्या काढण्यात आल्या. आम्हाला काही महिन्यांनंतरच हे समजले. आज आमच्यासारखे अनेक बळी आहेत. हे गावात एक उघड गुपित बनले आहे. सर्वांना त्याबद्दल माहिती आहे. परंतु कोणीही बोलत नाही.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

‘ताजमहाल तेजोमहालय मंदिर होते का’:अलाहाबाद हायकोर्टाने केंद्र- ASI ला उत्तर मागितले; सर्वेक्षण आयुक्त नियुक्तीच्या...

0
अलाहाबाद उच्च न्यायालयाने सोमवारी ताजमहालमध्ये तेजो महालय मंदिर असल्याच्या याचिकेवर सुनावणी केली. त्याचे सर्वेक्षण करण्यासाठी वकील आयोग (एडवोकेट कमिशन) नियुक्त करण्याच्या मागणीवर केंद्र...

ट्रस्टच्या वादातून साधूची फसवणूक; फसवणुकीची कथा

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराएक लोककथा आहे. जुन्या काळात एका गावातील मंदिरात एक साधू राहत होता. तो आपल्या तपस्या, शिस्त आणि साधेपणासाठी प्रसिद्ध होता....

जादूटोण्याची भीती घालून महिलेवर बलात्कार अन् जबरदस्तीने विवाह:मुलासह महिलेचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न, दारणा...

0
धंद्यात भरभराट करून देण्याचे आमिष दाखवत जादूटोण्याची भीती घालून एका महिलेवर लैंगिक अत्याचार करून नंतर तिच्याशी जबरदस्तीने विवाह केल्याप्रकरणी सायखेडा पोलिसांनी संशयित भोंदूबाबा...

श्रीलंका 142 धावांनी आघाडीवर:WI च्या पहिल्या डावात 499 धावा, ग्रीव्ह्सच्या 180 धावा; दुसऱ्या डावात...

0
श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्याचe चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने आपली आघाडी आणखी मजबूत केली. वेस्ट इंडिजचा पहिला डाव...
spot_img

श्रीलंका 142 धावांनी आघाडीवर:WI च्या पहिल्या डावात 499 धावा, ग्रीव्ह्सच्या 180 धावा; दुसऱ्या डावात...

0
श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्याचe चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने आपली आघाडी आणखी मजबूत केली. वेस्ट इंडिजचा पहिला डाव...

संजू सॅमसन झिम्बाब्वे टी-20 मालिकेतून बाहेर:वैभव सूर्यवंशीला पुन्हा संधी, रिंकू सिंगचे पुनरागमन; श्रेयसच कर्णधार...

0
BCCI ने झिम्बाब्वेमध्ये 23 ते 26 जुलै दरम्यान होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या 'प्लेअर...

मैत्रीतील मंदी:तीन चतुर्थांश तरुण मित्र असूनही एकटेपणा अनुभवत आहेत, अधिक ‘कनेक्टेड’ असूनही जवळच्या मित्रांची...

0
एक काळ असा होता, जेव्हा मैत्री म्हणजे तासन्तास एकत्र बसणे, विनाकारण भेटणे आणि लहान-मोठ्या प्रत्येक गोष्टी वाटून घेणे होते. आज चित्र बदलले आहे....

नेटफ्लिक्स शोमध्ये अश्नीर ग्रोवरच्या पत्नीचे वादग्रस्त विधान:’लॉकअप 2′ मध्ये माधुरी म्हणाली- श्रीमंत मुले जन्माला...

0
नेटफ्लिक्सच्या रिॲलिटी शो ‘लॉकअप 2’ मध्ये उद्योगपती अश्नीर ग्रोवर यांच्या पत्नी माधुरी जैन ग्रोवर यांच्या एका विधानावर वाद निर्माण झाला आहे. शोमध्ये एलिमिनेशन...
error: Content is protected !!