Homeदेश-विदेशभारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाले तर कोण जिंकेल? AI चे भाकीत ऐकून...

भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाले तर कोण जिंकेल? AI चे भाकीत ऐकून तुम्हाला वाटेल आश्चर्य!


भारत पाकिस्तान अणु युद्ध: पहलगाम हल्ल्यानंतर भारतीयांच्या मनातील पाकिस्तानविरुद्धचा राग शिगेला पोहोचलाय. आता भारताने पाकिस्तानवर हल्ला करावा, अशी प्रतिक्रिया अनेक भारतीय व्यक्त करतायत. पण जर भारत आणि पाकिस्तानमध्ये अणुयुद्ध झाले तर काय होईल? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? या प्रश्नाचे आर्टिफिशियल इंटेलिजेंसने दिलेले उत्तर आश्चर्यकारक आहे. सध्या अनेक प्रश्नांची उत्तरे आपण एआयकडून घेतोय. त्यामुळे भारत-पाकिस्तान युद्धासंदर्भातील प्रश्नही एआयलाच विचारण्यात आलाय. एआयने यावर काय उत्तर दिलंय, जाणून घेऊया.

भारत आणि पाकिस्तान अणुयुद्धामुळे केवळ 2 देशांचाच नव्हे तर संपूर्ण जगाचा नाश होईल. यामध्ये कोट्यवधी लोकांचे प्राण जाऊ शकतात. हवामान व्यवस्था बिघडू शकते आणि संपूर्ण मानवजातीला धोका निर्माण होऊ शकतो, असं उत्तर एआयने दिलंय.

‘हे युद्ध कोणीही जिंकणार नाही’

आर्टिफिशियल इंटेलिजेंस म्हणते की, हे युद्ध कोणीही जिंकणार नाही. यात मानवता हरेल. कारण दोन्ही देश अणुशक्ती आहेत. भारत आणि पाकिस्तान दोघांकडेही सुमारे 170 ते 172 अण्वस्त्रे आहेत. पाकिस्तानकडे शाहीन आणि घौरी सारखी क्षेपणास्त्रे आहेत. तर भारताकडे अग्नि-5 सारखी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे आणि ब्रह्मोससारखी अचूक क्रूझ क्षेपणास्त्रे आहेत.

भारत जमीन, पाणी आणि आकाश या मार्गांनी अणुहल्ला करण्यास सक्षम आहे तर पाकिस्तान तांत्रिकदृष्ट्या मागे आहे. जर दोन्ही देशांनी एकमेकांवर 100 अणुबॉम्ब टाकले तरी सुमारे 2 कोटी लोक आपले प्राण गमावू शकतात. यासोबतच तापमानात घट झाल्यामुळे शेती उद्ध्वस्त होईल आणि संपूर्ण जगात अन्न संकट निर्माण होऊ शकते, असंही एआयने आपल्या उत्तरात म्हटलंय.

याचा परिणाम आशियापुरता मर्यादित नसेल

एका अहवालानुसार, या युद्धाचा परिणाम केवळ आशियापुरता मर्यादित राहणार नाही. तर तो जागतिक पातळीवर होईल. अणुयुद्धाचे दुष्परिणाम बराच काळ टिकतील. रेडिएशनमुळे कर्करोग, जन्मजात दोष आणि इतर आजार पसरतील. माती, हवा आणि पाणीदेखील विषारी होईल. कोट्यवधी लोक बेघर आणि उपाशी राहतील. जर भारत आणि पाकिस्तानमध्ये असे युद्ध झाले तर तो पराभव फक्त एका देशाचा नसून संपूर्ण मानवतेचा असेल, असेही या अहवलात म्हटलंय.

यावर तज्ञांचे काय मत आहे?

सध्या दोन्ही देशांतून एकमेकांविरुद्ध भडक विधाने केली जात आहेत. पाकिस्तानकडून खूप काही घडतय. तिथले नेते अधिक चिथावणीखोर भाषणं ठोकतायत. पाकिस्तान दहशतवाद्यांना पाठिंबा देणारा देश असू शकतो पण भारत हा एक जबाबदार आणि यशस्वी देश आहे. अशा परिस्थितीत पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यातील दोषींना भारत नक्कीच धडा शिकवेल. असे असताना भारताकडून कधीही मानवतेचे उल्लंघन होणार नाही, असे मत तज्ज्ञ व्यक्त करतायत. या भाकिताच्या बाबतीत बोलायचं झालं तर AI हे एक कृत्रिम तंत्रज्ञान आहे. ते नेहमीच बरोबर किंवा नेहमीच चूक असेलच असे नाही.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!