Homeमहाराष्ट्रSanjay Shirsat Criticize Mahayuti Government Over Spent Funds From Social Justice And...

Sanjay Shirsat Criticize Mahayuti Government Over Spent Funds From Social Justice And Tribal Development | पाय तोडायचे अन् पळ म्हणायचे: मग माझ्या खात्याचा नंबर कसा येणार? निधी वळवण्यावरून संजय शिरसाटांचा सरकारला सवाल – Maharashtra News

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेअंतर्गत मूल्यमापनाचा निकाल जाहीर केला आहे. त्यात महिला व बाल विकासमंत्री आदिती तटकरे यांचा पहिला क्रमांक आला आहे. यावरून शिंदे गटाचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री

?

लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा सव्वाचारशे कोटी रुपयांचा निधी वळवण्यात आल्यामुळे संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली होती. सामाजिक न्याय खात्याची गरज नसेल त्या खात्यात पैसे खर्च करायचे नसतील तर खाते बंद केली तरी चालेल, अशी उद्विग्न प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली होती. आज त्यांनी पुन्हा एकदा मंत्र्यांच्या रिपोर्ट कार्डवरून सरकारवर टीका केली आहे.

नेमके काय म्हणाले संजय शिरसाट?

आदिती तटकरे यांच्या खात्यात आमच्या खात्याचा निधी वर्ग केला. त्यामुळे लाडक्या बहिणींना पैसे गेले. त्यानंतर त्यांचा विभाग नंबर एक वर आला. या कामगिरीत आमचा कुठेही उल्लेख नाही. कारण आम्हाला काम करण्याची संधी मिळाली नाही. मग आमचा उल्लेख 100 दिवसांच्या उपक्रमामध्ये कसा होणार? त्यामुळे हे खातेच बंद करून टाका, हे चांगले आहे, असा टोला शिरसाट यांनी लगावला. एकीकडे माझे पाय तोडायचे आणि दुसरीकडे मला म्हणायचे की, पळ…तर हे शक्य होणार नाही. हा माझ्यावर होत असलेला अन्याय आहे, असे संजय शिरसाट म्हणाले.

एकनाथ शिंदेंना भेटून आपबीती सांगणार

खात्याकडे निधी नसेल तर आम्ही नेमके काय काम करत आहे, हे जनतेला कसे कळणार? सरकारला कसे कळणार? असा सवालही शिरसाट यांनी केला. समाज कल्याण विभाग हे गोरगरीब जनतेला न्याय देणारे विभाग आहे. अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते आहे. त्यांनी मोठ्या मनाने या विभागाला जास्तीत जास्त निधी द्यायला हवा. या खात्याचा निधी इतरत्र वर्ग करायला नको. मी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून मी सगळे आपबीती सांगणार असल्याचे संजय शिरसाट यांनी सांगितले.

हे ही वाचा….

चंद्रशेखर बावनकुळेंचे निधी वळवण्याला समर्थन:म्हणाले – योजना चालवण्यासाठी थोडा थोडा निधी घेतला असेल तर काही हरकत नाही

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा सव्वा चारशे कोटींचा निधी वळवण्यात आला आहे. यावरून सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निधी वळवण्याला समर्थन दिले आहे. सामाजिक न्याय विभागात ज्या जाती आहेत, त्यांच्यात लाडकी बहिणी आहेत. यामुळे काही निधी आदिवासी विभागाचा, काही निधी सामाजिक न्याय विभागाचा, काही निधी महिला आणि बाल कल्याण विभागाचा असा थोडा थोडा निधी घेतला असेल तर काही हरकत नाही, असे बावनकुळे म्हणाले. पूर्ण बातमी वाचा…

पक्ष बदलला, कलह तोच:मविआत असताना अजित पवार निधी देत नसल्याचा आरोप होता, महायुतीत असतानाही तेच सुरू

महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना अजित पवार निधी देत नाहीत, असा आरोप एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी बंड पुकारताना केला होता. आता सरकार बदलले तरीही निधीचा कलह कायम आहे. तशा तर एकनाथ शिंदे विरुद्ध अजित पवार अशा कुरबुरी सुरूच होत्या. पण शनिवारी शिंदेसेनेचे नेते, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी विशेष पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांवर थेट हल्लाबोल केला. मला अंधारात ठेवून लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय खात्याचे पैसे वळवण्यात आले. असे त्यांनी सांगितले. पूर्ण बातमी वाचा…



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

हिमाचलमध्ये रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू:महिला शिक्षिकेने बनवलेला लाइव्ह व्हिडिओ समोर आला, दूध विकून...

0
हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यातील रामपूर येथे आज (शुक्रवारी) दुपारनंतर एक बोलेरो कॅम्पस खोल दरीत कोसळली. या अपघातात आई-मुलासह सहा जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी...

कथा: व्यापाऱ्याची दुःखी व्यक्तीला शिकवण:आपण शिकण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या मेहनतीने ज्ञान मिळवतो, तेव्हा...

0
फार जुन्या काळातील एक कथा आहे. एक सोनार मरण पावला. त्याच्या कुटुंबात त्याची पत्नी आणि एक मुलगा होता. सोनाराच्या मृत्यूनंतर कुटुंबावर आर्थिक संकट...

अनऑफिशियल कसोटी, जुरेलच्या शतकामुळे भारत-ए मजबूत स्थितीत:पहिली इनिंग 452/6 धावांवर घोषित केली; श्रीलंका-ए 114/2,...

0
गॉल येथे भारत 'ए' आणि श्रीलंका 'ए' यांच्यातील पहिल्या अनधिकृत कसोटीच्या दुसऱ्या दिवशी कर्णधार ध्रुव जुरेलने शतक झळकावले. शुक्रवारी झालेल्या पावसामुळे दिवसाचा खेळ...

व्यायामानंतरही वजन कमी होत नाही:कॅलरी ट्रॅक करणे पुरेसे नाही, हार्मोन टेस्ट करा, तज्ञांकडून वजन...

0
वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांची सर्वात मोठी तक्रार हीच असते- "मी रोज चालतो, जिममध्ये जातो, डाएटही कंट्रोल करतो, तरीही वजन कमी होत...
spot_img

अनऑफिशियल कसोटी, जुरेलच्या शतकामुळे भारत-ए मजबूत स्थितीत:पहिली इनिंग 452/6 धावांवर घोषित केली; श्रीलंका-ए 114/2,...

0
गॉल येथे भारत 'ए' आणि श्रीलंका 'ए' यांच्यातील पहिल्या अनधिकृत कसोटीच्या दुसऱ्या दिवशी कर्णधार ध्रुव जुरेलने शतक झळकावले. शुक्रवारी झालेल्या पावसामुळे दिवसाचा खेळ...

व्यायामानंतरही वजन कमी होत नाही:कॅलरी ट्रॅक करणे पुरेसे नाही, हार्मोन टेस्ट करा, तज्ञांकडून वजन...

0
वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांची सर्वात मोठी तक्रार हीच असते- "मी रोज चालतो, जिममध्ये जातो, डाएटही कंट्रोल करतो, तरीही वजन कमी होत...

लग्नासाठी गोव्यात पोहोचले साऊथ आणि बॉलिवूड स्टार्स:अनिल कपूर-जॅकी श्रॉफ, चिरंजीवी आणि नागार्जुन पारंपरिक लूकमध्ये...

0
अभिनेत्री आणि राजकारणी खुशबू सुंदर आणि चित्रपट निर्माता सुंदर सी यांची मोठी मुलगी अवंतिका सुंदर विवाहबंधनात अडकली आहे. तिने 25 जून रोजी गोव्यातील...

50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी, 22 भाषा सपोर्ट

0
नवी दिल्ली4 तासांपूर्वीलिंक कॉपी करासॅमसंगने आपला गॅलेक्सी A-सिरीजचा नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी A27 5G जागतिक बाजारात लॉन्च केला आहे. हा नवीन हँडसेट जुन्या गॅलेक्सी...
error: Content is protected !!