Homeदेश-विदेशThe challenge of setting boundaries with parents | माता-पित्यासमवेत सीमा निश्चित करणे...

The challenge of setting boundaries with parents | माता-पित्यासमवेत सीमा निश्चित करणे आव्हान: सहन न होणाऱ्या गोष्टी सांगा, वादाचे विषय टाळा, सभ्यपणाने नकार दिल्यास नात्यामधील गोडवा वाढेल!


न्यूयॉर्क3 तासांपूर्वी

  • कॉपी दुवा
  • अमेरिकन लेखिका हेन्ना सांगतात की, ‘स्वत:समवेत तुम्हाला कसा व्यवहार हवा हे सांगणेही गरजेचे’

शिक्षण वा नोकरीच्या कारणामुळे मुलांना आपल्या माता-पित्यापासून दूर राहावे लागते. अशावेळी संवादाची दरी निर्माण होण्याची शक्यता असते. त्याचा नात्यांवर परिणाम होतो. जाणकार सांगतात की, माता-पित्यासमवेत सीमा निश्चित करणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. ज्यांना आपण दीर्घ काळापासून ओळखतो, त्यांच्यासमोर प्राथमिकता ठेवणे मुळीच सोपे नसते. नाते कमकुवत होण्याची भीती सतावते. भावनांना धक्का पोहोचू नये असे वाटते. ‘गुड ऑकवर्ड’ पुस्तकाच्या लेखिका हेन्ना प्रॉयर सांगतात की, नात्यांत चांगल्या गरजा आणि सहन न होणाऱ्या गोष्टी स्पष्ट करणे गरजेचे असते. त्यातून आपल्याला स्वत:प्रती कशी वर्तणूक अपेक्षित आहे, हे स्पष्ट होते. सांगत आहेत, हेन्ना प्रॉयर…

दूर सारण्याऐवजी त्यांना सांगा की, तुम्हाला कशी मदत हवी? निर्णयावर प्रश्न उपस्थित झाल्यास आत्मविश्वासाने बाजू मांडा

अापल्या गरजा सांगा: माता-पिता न मागता सल्ला देतात. त्यांचा हेतू आधी समजून घ्या. त्यांचे आभार माना. त्यानंतर शांतपणे म्हणा की, ‘तुम्ही मदत करू इच्छिता हे आम्हाला माहित आहे. आम्ही त्याचे कौतुक करतो. मात्र सध्या आणण आमचे ऐकावे असे वाटते. सल्ला अपेक्षित नाही.’ यातून त्यांना दूर सारण्याऐवजी कशा प्रकारचे सहकार्य हवे, हे स्पष्ट होते.

चर्चेची वेळ निश्चित करा : तुम्ही व्यस्त असलेल्या वेळी माता-पिता वारंवार फोन करत असतील तर एक निश्चित वेळ ठरवा. उदा. त्यांना म्हणा की, ‘मी तुमचे ऐकण्यासाठी प्रचंड आतूर आहे, मात्र सध्या एक प्रोजेक्ट पूर्ण करत आहे. जेवणानंतर सविस्तर बोलू.’ त्यातून त्यांना वाटेल की, तुम्ही त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकू इच्छिता. मग त्यासाठी ऑफिसच्या काळातील एखादी वेळ निश्चित करू शकता. मात्र ती तंतोतंत पाळणेही गरजेचे.

​विषय बदला : जर एखादा विषय वारंवार विसंवादाचे, भांडणाचे कारण ठरत असेल तर बोलण्याच्या आधीच सीमा निश्चित करा. तुम्ही म्हणू शकता की, ‘मी आपल्या नात्याची काळजी घेतो. त्यामुळे आज या विषयावर बोलणे उचित होणार नाही.’ त्यातून संदेश जाईल की, तुम्हाला कटूता नको तर नाते जपायचे आहे. चर्चेला दुसरे वळण द्या. ‘सोबत घालवलेल्या क्षणांचा आनंद घेऊ’, असे म्हणा.

भावनात्मक आधार द्या : माता-पिता भावनात्मक आधार मागत असतील आणि तुम्ही देण्याच्या स्थितीत नसाल तर सहानुभूतीसह सीमा निश्चित करा. त्यातून तुम्ही नाते संतुलित दिशेने नेण्यात यशस्वी व्हाल.

मान्यता नाही तर सन्मान मिळवा : तुमचा निर्णय आई-वडिलांना मान्य नसेल तर त्यांना आत्मविश्वासाने सांगा की, मी घेतलेल्या निर्णयाने आनंदी आहे. मला चांगल्या प्रकारे माहित आहे की, तुम्ही ते वेगळ्या आणि अधिक चांगल्या प्रकारे करू शकाल. परंतु मला वाटते की, माझ्या निर्णयाचा केवळ स्विकार नको, त्याचा सन्मान करावा. यामुळे तुम्ही आत्मनिर्भर असल्याचा संदेश यातून जाईल.

गैरसमज दूर करा : अनेकदा जवळच्या नात्यातील सीमा स्विकार केल्या जात नाहीत. यामुळे आई‑वडिलांना याची जाणीव करून द्या की, तुम्ही नाते अधिक बळकट बनविण्यासाठी हे करत आहात. त्यांना सांगा की, आपण अधिक चांगल्या प्रकारे एकत्र असावे. बदल स्विकारणे थोडे कठीण जाते. परंतु यामुळे नातेसंबंध अधिक दृढ होण्यास मदतच मिळेल.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!