Homeमहाराष्ट्रCitizens suffer due to old pipelines that keep bursting, water supply after...

Citizens suffer due to old pipelines that keep bursting, water supply after ten days | सतत फुटणाऱ्या जुन्या पाइपलाइनमुळे नागरिकांचे हाल, दहा दिवसांआड पाणी: जामखेड शहराला पाणी पुरवठा करणारी पाइपलाइन आठ दिवसांत चार वेळा फुटली‎ – Ahmednagar News

?

जामखेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाइन सतत फुटत असल्याने शहराला, दहा दिवसाआड पाणी मिळत आहे. त्यामुळे लोकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. याकडे लक्ष देण्यासाठी दोन्ही लोकप्रतिनिधींना वेळ नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे

जामखेड शहरासाठी भुतवडा तलावातून १९७२ ला पाणीपुरवठा योजना तयार झाली आणि ती १९७५ ला कार्यान्वित केली आहे. ही पाणीपुरवठा योजना तत्कालीन पाटबंधारे मंत्री स्व. आबासाहेब निंबाळकर यांनी मंजूर केली होती. तीही विना वीजपुरवठा नसलेली अशी योजना महाराष्ट्र कुठेही नाही. २०११ ला लोकसंख्या ३९ हजार ५५१ इतकी गृहीत धरून पाणी पुरवठा योजना केली होती. आता २०२५ ला लोकसंख्या अंदाजे ५० हजार इतकी झाली आहे. लोकसंख्या वाढली, पण पाणी पुरवठा योजना जुनीच आहे. त्यामुळे पाण्याचे रोटेशन बिघडत चालले आहे. ग्रामपंचायत काळातील पाइपलाइन असल्याने पाइपची मुदत संपली आहे. ही पाइप कंपनीही बंद झाल्या आहेत. मग पाइपलाइन फुटली तरी पाईप कुठुन आणणार हा प्रश्न गंभीर बनला आहे आणि पाइपलाइन कशी दुरुस्त करायची हा प्रश्न गंभीर बनला आहे. सध्या नवीन पाणीपुरवठा योजनांचे काम धिम्यागतीने सुरू आहे काम करतांना ठेकेदाराकडून अनेकवेळा जुनी पाईप लाईन फोडली आहे. त्यामुळे आठ दिवसांत चार वेळा पाइपलाइन फुटली आहे. त्यामुळे पाणी रोटेशन बिघडत आहे. शेतीचे कामे सुरू आहेत. दिवसेंदिवस गंभीर होत चालला जामखेड शहराचा पाणीप्रश्न काम करताना पाइप सतत फुटत असल्याने पाणी पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्याही नाकीनऊ आले आहे. सध्या भुतवडा गावात अनेकदा पाइपलाइन फुटत आहे. दिवसेंदिवस शहराचा पाणी प्रश्न गंभीर होत चालला आहे. याकडे लोकप्रतिनिधी व विविध पक्षांचे कार्यकर्ते यांचेही लक्ष नाही. सध्या नगरपरिषद प्रशासनाकडूनही लक्ष दिले जात नाही. निवडणुका नसल्याने पुढारी नगरपरिषदेकडे फिरकत देखील नाही,अशा परिस्थितीमध्ये पाण्यासाठी लोकांचे हाल होत आहेत.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

वार्षिक 14 लाख रुपये कमावणाऱ्या पत्नीला पोटगी नाही:हायकोर्ट म्हणाले – पत्नीची मागणी पतीचे ‘एक...

0
भोपाळमध्ये राहणाऱ्या एका महिलेने पतीकडून अंतरिम पोटगीची (मेंटेनन्स) मागणी केली होती. ही मागणी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायालयाने म्हटले की, आर्थिकदृष्ट्या...

24 जूनचे राशिभविष्य:वृषभ राशीच्या लोकांना गुंतवणुकीतून फायदा, मीन राशीच्यांना अडकलेले पैसे मिळतील आणि कन्या...

0
बुधवार, 24 जून रोजी वृषभ राशीच्या लोकांसाठी गुंतवणूक फायदेशीर ठरेल आणि यंत्रसामग्रीशी संबंधित व्यवसायात नफा होऊ शकतो. कर्क राशीच्या लोकांचा जमिनीशी संबंधित वाद...

महिला टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा सलग चौथा विजय:पाकिस्तानला 113 धावांनी हरवले, पेरी-वोलची 100+ धावांची भागीदारी

0
टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलिया महिला संघाची उत्कृष्ट कामगिरी सुरू आहे. हेडिंग्ले येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 113 धावांनी पराभव केला. एलिस पेरीच्या 71 धावांच्या...

पाच दिवसीय संस्कार प्रशिक्षण शिबिरांतून संस्कृतीची ओळख:230 हून अधिक बालसाधकांनी घेतला शिबिराचा प्रत्यक्ष लाभ‎

0
सध्याच्या आधुनिक युगात लहान मुलांवर योग्य संस्कार व्हावेत आणि त्यांना आपल्या समृद्ध संस्कृतीची ओळख व्हावी, या उद्देशाने सनातन संस्थेच्या वतीने केशवनगर भागातील जानोरकर...
spot_img

महिला टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा सलग चौथा विजय:पाकिस्तानला 113 धावांनी हरवले, पेरी-वोलची 100+ धावांची भागीदारी

0
टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलिया महिला संघाची उत्कृष्ट कामगिरी सुरू आहे. हेडिंग्ले येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 113 धावांनी पराभव केला. एलिस पेरीच्या 71 धावांच्या...

श्री चरणी पहिल्यांदाच नंबर-1 महिला टी-20 बॉलर:वर्ल्डकप 2026 मध्ये सर्वाधिक 10 विकेट्स घेतल्या; बॅटिंगमध्ये...

0
21 वर्षांची भारतीय फिरकीपटू श्री चरणी महिला टी-20 आंतरराष्ट्रीय गोलंदाजी क्रमवारीत नंबर-1 स्थानावर पोहोचली आहे. तिने इंग्लंडची फिरकीपटू लिन्सी स्मिथला मागे टाकत पहिले...

या गोष्टींसोबत जांभूळ खाऊ नका:होऊ शकते गॅस, ब्लोटिंग, पोटदुखी, जाणून घ्या याचे फायदे, खाण्याची...

0
पाऊस सुरू होताच बाजारात जांभळांची रेलचेल सुरू होते. आंबट-गोड चवीचे हे गडद जांभळ्या रंगाचे फळ पोषक तत्वांचा खजिना आहे. यात फायबर, लोह, व्हिटॅमिन...

नाचते हुए मरी तो मिसाल बन जाउंगी!:’ईठा’चा थक्क करणारा टीझर रिलीज; लावणी सम्राज्ञी विठाबाईंच्या...

0
'स्त्री २' या ऐतिहासिक यशानंतर बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर कोणत्या भूमिकेत दिसणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. अखेर मॅडॉक फिल्म्सने श्रद्धाच्या आगामी 'ईठा'...
error: Content is protected !!