Homeसांस्कृतिकपुष्पक विमान कोणाचं होतं; इंद्र देव की रावण? 99 टक्के लोकांना माहित...

पुष्पक विमान कोणाचं होतं; इंद्र देव की रावण? 99 टक्के लोकांना माहित नाही योग्य उत्तर

सांस्कृतिक : पुष्पक विमनचा खरा मालक कोण होता: पुष्पक विमानाचं नाव सगळ्यांनी नक्कीच ऐकलं असेल. ज्या लोकांना पुष्पक विमानाबद्दल माहिती नाही त्यांच्यासाठी सांगायचं झालं, तर रामायणामध्ये याचा उल्लेख आहे. त्रेतायुगात जेव्हा रावणानं माता सीतेचं अपहरण केलं, तेव्हा तो त्यांना पुष्पक विमानातून लंकेला घेऊन गेला होता. आज जसं आपण विमानात बसून एका शहरातून दुसऱ्या शहरात जातो, तसंच ते विमान होतं. आकाशात उडणारं, वेगानं जाणारं. रावाणाचा वध केल्यानंतर श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण हे पुष्कप विमानात बसून अयोध्येला जातात. पण मग आता प्रश्न असा आहे की पुष्पक विमान होतं तरी कुणाचं? पुष्पक विमान रावणाचं होतं की देवांचे देव इंद्र यांचं?

तर याचं उत्तर थोडं वेगळं आहे. पुष्पक विमान रावणाचं किंवा इंद्र देवाचं नव्हतं. पौराणिक ग्रंथ रावण संहितानुसार, ब्रह्मदेवानं हे विमान त्यांच्या भक्त वैश्रवण  यांना दिलं होतं. तर पुष्पक विमानाचं तेज हे सुर्यासारखं होतं. हे ज्या कोणाला मिळणार तो देवांच्या समान होणार असं म्हटलं जातं होतं. पुष्पक विमान ना रावणाचं होतं ना देवांचा राजा इंद्र देवाचं.

कोन वैश्वन होता?

वैश्रवण म्हणजेच रावणाचा सावत्र भाऊ कुबेर. त्यांनी ब्रह्मदेवांची खूप तपश्चर्या केली होती, त्यामुळे ब्रह्मदेवांनी त्यांना दोन वर दिले. एक म्हणजे त्यांना चौथा लोकपाल बनवलं आणि दुसरं म्हणजे पुष्पक विमान दिलं. हे विमान विश्वकर्मा यांनी बनवलं होतं.विश्वकर्मा म्हणजे देवतांचे मुख्य शिल्पकार. त्यांनी हे विमान खास ब्रह्मदेवांसाठी तयार केलं होतं, पण त्यांनी ते कुबेराला दिलं.

विश्रवा हे कुबेर आणि रावण यांचे वडील होते. कबुरचा जन्म हा विश्रवा यांच्या पहिल्या पत्नीपासून जन्माला आले होते आणि रावण त्यांच्या दुसऱ्या पत्नीचा अर्थात कैकेसीचा मुलगा. यामुळे कुबेर आणि रावण हे सौतेले भाऊ होते.

रावण जेव्हा मोठा झाला तेव्हा त्याने कुबेराकडून लंका आणि पुष्पक विमान दोन्ही जोरजबरदस्तीने हिसकावून घेतलं. तर एकंदरीत काय पुष्पक विमान आधी कुबेराचं होतं आणि नंतर रावणानं ते हिसकावून घेतलं.

(Disclaimer –  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘शिवतेज न्यूज’ याची खातरजमा करत नाही.) सौ.झी.न्यूज

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सलून हेअर वॉश स्ट्रोक धोका; ब्युटी पार्लर सिंड्रोम खबरदारी स्पष्ट केली

0
लेखिका : अदिती ओझा7 तासांपूर्वीलिंक कॉपी करालोक अनेकदा ग्रूमिंगसाठी सलूनमध्ये जातात. येथे हेअर कटपासून ते हेअर वॉश आणि स्पापर्यंत अनेक सेवा उपलब्ध असतात....

सपना चौधरीने मासूम शर्मासोबत गाण्यास नकार दिला:दिल्लीतील शोमध्ये म्हटले- आजकाल माझं पुरुषांशी पटत नाहीये;...

0
हरियाणवी डान्सर-सिंगर सपना चौधरी सध्या पती वीर साहूसोबत सुरू असलेल्या कौटुंबिक वादामुळे चर्चेत आहे. दिल्लीत आयोजित कार्यक्रमातही सपना चौधरीच्या बोलण्यात हीच खंत दिसून...

स्क्रीन-फ्री बालपण, फायदे-तोट्यांचा अभ्यास बाकी:मोबाईलपासून दूर राहण्यासाठी स्मार्ट खेळणी; पालकांची चिंता कमी झाली पण...

0
आजचे पालक एका विचित्र कोंडीत सापडले आहेत. एकीकडे मुलांचा स्क्रीन-टाइम वाढण्याची भीती, दुसरीकडे काम आणि व्यस्त जीवन. याच रिकाम्या जागेत नवीन युगातील एआय-आधारित,...

यूएस मध्यमवर्गीय उत्पन्न स्थिरता; AI प्रभाव वाढत आहे

0
केटी रॉजर्स.न्यू यॉर्क टाईम्स33 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराअमेरिकन अर्थव्यवस्था सध्या एका विरोधाभासातून जात आहे, जिथे एका बाजूला अब्जाधीशांची संपत्ती नवीन उंची गाठत आहे, तर...
spot_img

सलून हेअर वॉश स्ट्रोक धोका; ब्युटी पार्लर सिंड्रोम खबरदारी स्पष्ट केली

0
लेखिका : अदिती ओझा7 तासांपूर्वीलिंक कॉपी करालोक अनेकदा ग्रूमिंगसाठी सलूनमध्ये जातात. येथे हेअर कटपासून ते हेअर वॉश आणि स्पापर्यंत अनेक सेवा उपलब्ध असतात....

सपना चौधरीने मासूम शर्मासोबत गाण्यास नकार दिला:दिल्लीतील शोमध्ये म्हटले- आजकाल माझं पुरुषांशी पटत नाहीये;...

0
हरियाणवी डान्सर-सिंगर सपना चौधरी सध्या पती वीर साहूसोबत सुरू असलेल्या कौटुंबिक वादामुळे चर्चेत आहे. दिल्लीत आयोजित कार्यक्रमातही सपना चौधरीच्या बोलण्यात हीच खंत दिसून...

स्क्रीन-फ्री बालपण, फायदे-तोट्यांचा अभ्यास बाकी:मोबाईलपासून दूर राहण्यासाठी स्मार्ट खेळणी; पालकांची चिंता कमी झाली पण...

0
आजचे पालक एका विचित्र कोंडीत सापडले आहेत. एकीकडे मुलांचा स्क्रीन-टाइम वाढण्याची भीती, दुसरीकडे काम आणि व्यस्त जीवन. याच रिकाम्या जागेत नवीन युगातील एआय-आधारित,...

मस्क म्हणाले- सरकारी मदतीने यश मिळाले नाही:स्पेसएक्स-टेस्लाच्या एकूण मूल्यात प्रोत्साहन फक्त 2%; अलीकडेच जगातील...

0
टेस्ला आणि स्पेसएक्सचे CEO एलॉन मस्क यांनी, त्यांचे यश सरकारी मदतीमुळे आहे असे म्हणणाऱ्या दाव्यांना पूर्णपणे फेटाळून लावले आहे. मस्क यांनी सोशल मीडिया...
error: Content is protected !!