Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री फडणवीसांचा ड्रिम प्रोजेक्ट महाराष्ट्र दिनी सेवेत? नाशिक-मुंबई प्रवास 3 तासांत होणार

मुख्यमंत्री फडणवीसांचा ड्रिम प्रोजेक्ट महाराष्ट्र दिनी सेवेत? नाशिक-मुंबई प्रवास 3 तासांत होणार

महाराष्ट्र सम्रुद्दी महामर्ग: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेला समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा 1 मेला म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या खुला होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समृद्धीच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यादृष्टीने एमएसआरडीसीने तयारी सुरू केल्याचे समजते.

एमएसआरडीसीने 701 किमी लांबीचा आणि 55 हजार कोटी रुपयांचा निधी खर्चून नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग प्रकल्प हाती घेतला आहे. हा संपूर्ण महामार्ग याआधीच वाहतूक सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र, विविध कारणांमुळे या प्रकल्पाला विलंब झाला आहे. दरम्यान, टप्प्याटप्प्याने आतापर्यंत 625 किमी लांबीचा नागपूर-इगतपुरी दरम्यानचा महामार्ग वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. आता इगतपुरी-आमणे, भिवंडी या शेवटच्या आणि महत्त्वाच्या टप्याच्या लोकार्पणाची प्रतीक्षा आहे.  इगतपुरी ते आमणे हा 76  किलोमीटरचा समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महाराष्ट्र दिनी होणार खुला होणार असल्याची चर्चा आहे. 35 मीटर रुंद आणि 6 लेन  दुहेरी बोगद्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे.

इगतपुरी-आमणे, भिवंडी हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यास मुंबईकरांना केवळ आठ तासांत नागपूर गाठता येणार आहे. आता ही प्रतीक्षा लवकरच संपुष्टात येणार आहे. शेवटच्या टप्याचे 100 टक्के काम पूर्ण झाले असून, आता हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे.

समृद्धी महामार्गाची काही वैशिष्ट्ये

– हा 6 लेनचा, 120 मीटर रुंदीचा आणि 701 किलोमीटर लांब महामार्ग देशातील सर्वात अत्याधुनिक एक्सप्रेसवे आहे, जो 150 किमी प्रतितास गतीने प्रवासासाठी डिझाइन करण्यात आला आहे.

– महामार्गावर 65 फ्लायओव्हर, 24 इंटरचेंज, 6 बोगदे आणि अनेक वाहन तसेच पादचारी अंडरपास आहेत.

– इगतपुरी ते मुंबईदरम्यान कसारा जवळ 8 किलोमीटर लांब जुळ्या बोगद्यांपैकी एक बनवण्यात आला आहे, जो अत्याधुनिक जर्मन तंत्रज्ञानावर आधारित फुल वॉटर मिस्ट सिस्टमने सुसज्ज आहे.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

नागौद राजघराण्याच्या सुनेला गोळी मारल्याचा व्हिडिओ:पती बाबा राजाची वर्किंग पार्टनर सुनीताने गोळीबार केला, योगिता...

0
मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील नागौद राजघराण्याशी संबंधित गोळीबाराच्या घटनेला नवे वळण मिळाले आहे. परसमनिया गढी येथे रूपेंद्र सिंह उर्फ बाबा राजा यांच्या पत्नी...

स्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:झाडे-झुडपे आपल्याला शुद्ध हवा, फळे, छाया देतात; त्यांच्याशिवाय नद्या, पर्वत,...

0
सध्या हिरवळ कमी होत चालली आहे. याचे मुख्य कारण असे आहे की, आपण आपल्या ऋषि-मुनींच्या शिकवणी विसरलो आहोत. आपल्या शास्त्रांमध्ये वृक्षांना पूजनीय आणि...

6.5 फूट उंचीचा गुरनूर भारतातील तिसरा सर्वात उंच खेळाडू:पदार्पणाच्या वनडेमध्ये 27 धावा देऊन 3...

0
अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये शनिवारी 6 फूट 5 इंच उंचीच्या वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारने भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तो भारतीय संघासाठी खेळणारा तिसरा सर्वात...

FSSAI स्टेपल पिन्स मार्गदर्शक तत्त्वे; अन्न पॅकेजिंग सुरक्षा तपासणी

0
लेखिका : अदिती ओझा2 तासांपूर्वीलिंक कॉपी करामिठाईचा डबा असो, नमकीनचे पाकीट असो, बेकरीचे सामान असो किंवा ऑनलाइन फूड असो, आपल्यापैकी बहुतेक लोक डोळे...
spot_img

6.5 फूट उंचीचा गुरनूर भारतातील तिसरा सर्वात उंच खेळाडू:पदार्पणाच्या वनडेमध्ये 27 धावा देऊन 3...

0
अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये शनिवारी 6 फूट 5 इंच उंचीच्या वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारने भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तो भारतीय संघासाठी खेळणारा तिसरा सर्वात...

FSSAI स्टेपल पिन्स मार्गदर्शक तत्त्वे; अन्न पॅकेजिंग सुरक्षा तपासणी

0
लेखिका : अदिती ओझा2 तासांपूर्वीलिंक कॉपी करामिठाईचा डबा असो, नमकीनचे पाकीट असो, बेकरीचे सामान असो किंवा ऑनलाइन फूड असो, आपल्यापैकी बहुतेक लोक डोळे...

विजयचा नवीन चित्रपट चर्चेत:’स्त्री’ च्या निर्मात्यांसोबत विजय देवरकोंडा हातमिळवणी करू शकतो, पॅन-इंडिया चित्रपटाची तयारी

0
तेलुगू सिनेमातील मोठा स्टार आणि सतत आपल्या करिअरची दिशा बदलताना दिसणारा विजय देवरकोंडा आणखी एका मोठ्या प्रोजेक्टबद्दल चर्चेत आहेत. इंडस्ट्रीच्या गल्लीबोळात जोरदार चर्चा...

चांदी ₹8,429 ने वाढून ₹2.51 लाखांवर पोहोचली:या वर्षी किंमत ₹21 हजारने वाढली, सोनं आज...

0
सोन्या-चांदीच्या दरात 15 जून रोजी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, एक किलो चांदी 8,429 रुपयांनी वाढून 2.51 लाख...
error: Content is protected !!