Homeमहाराष्ट्रसुवर्ण रोख्यांमधून आठ वर्षांत २११ टक्के परतावा

सुवर्ण रोख्यांमधून आठ वर्षांत २११ टक्के परतावा

महाराष्ट्र (मुंबई) : केंद्र सरकारच्या सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेत १६ ऑक्टोबर २०१७ मध्ये गुंतविलेल्या रोख्यांचे मुदतपूर्व विमोचन (रिडम्प्शन) करायचे झाल्यास, रिझर्व्ह बँकेने ९,२२१ रुपये प्रतिग्रॅम असा दर निश्चित केल्याचे रविवारी जाहीर केले. आठ वर्षांपूर्वी रोख्यांच्या खरेदी किमतीच्या तुलनेत हा दर २११.१ टक्के अधिक आहे.

सुवर्ण रोख्यांचा विमोचन दर हा सरलेल्या ९ एप्रिल ते १५ एप्रिल २०२५ या दिवसाअंती बंद झालेल्या सोन्याच्या किमतीच्या सरासरीच्या आधारावर निश्चित केला गेला आहे. भारतीयांमधील धातूरूपी सोन्याचे आकर्षण पाहता त्याला पर्याय या रूपाने आणि सोन्याच्या आयातीवर खर्च होणाऱ्या परदेशी चलनात कपात व्हावी, या उद्देशाने १४ जानेवारी २०१६ रोजी सार्वभौम सुवर्ण रोखे योजना सुरू करण्यात आली होती. आठ वर्षांपूर्वी २,९६४ रुपये प्रतिग्रॅमप्रमाणे सुवर्ण रोख्यांची विक्री झाली होती. त्या तुलनेत विमोचनासाठी निर्धारित ९,२२१ रुपये प्रतिग्रॅम हा दर २११.१ टक्के परतावा मिळवून देणारा आहे. या रोख्यांचा मुदत कालावधी हा आठ वर्षांचा आहे. सध्या जागतिक पातळीवर वाढलेले सोन्याचे दर आणि वाढत्या अस्थिरतेमुळे केंद्र सरकारने सार्वभौम सुवर्ण रोखे योजना थांबवली आहे.

२०१७ मधील खरेदी किंमत – २,९६४ रुपये प्रतिग्रॅम

विमोचन किंमत (एप्रिल २०२५) ९,२२१ रुपये प्रतिग्रॅम

प्रतिग्रॅम नफा – ६,२५७ रुपये

एकूण परतावा (%) – २११.१ सौ.लोकसत्ता

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

देणगी चोरीची FIR करणारे कृष्ण मोहन नवे महासचिव:IFS मधून निवृत्त झाल्यानंतर RSS मध्ये आले,...

0
श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त कामेश्वर चौपाल यांच्या निधनानंतर सप्टेंबर 2025 मध्ये त्यांच्या जागी निवृत्त IFS कृष्ण मोहन यांना विश्वस्त बनवण्यात आले....

मुंबई राजभवन SRPF जवानाची ड्युटीवर आत्महत्या; पोलीस तपास

0
मलबार हिल येथील अत्यंत सुरक्षित आणि 'व्हीआयपी' समजल्या जाणाऱ्या राजभवन परिसरात एक अत्यंत खळबळजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. राजभवनाच्या सुरक्षेसाठी तैनात...

TMC ने EC ला 2027 पर्यंत समित्या वैध घोषित केल्या

0
नवी दिल्ली1 तासापूर्वीलिंक कॉपी कराममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस (TMC) गटाने सोमवारी निवडणूक आयोगासमोर (EC) आपले सविस्तर उत्तर दाखल करत बंडखोर गटाचे...

7 जुलै रोजी वक्री बुध राशी बदलेल:5 ऑगस्टपर्यंत बुध मिथुन राशीत राहील, जाणून घ्या...

0
बुध सध्या वक्री आहे, म्हणजेच हा ग्रह मागे सरकत आहे. 7 जुलै रोजी वक्री बुध कर्क राशीतून मिथुन राशीत प्रवेश करेल. 24 जुलैपर्यंत...
spot_img

संजू सॅमसन झिम्बाब्वे टी-20 मालिकेतून बाहेर:वैभव सूर्यवंशीला पुन्हा संधी, रिंकू सिंगचे पुनरागमन; श्रेयसच कर्णधार...

0
BCCI ने झिम्बाब्वेमध्ये 23 ते 26 जुलै दरम्यान होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या 'प्लेअर...

मैत्रीतील मंदी:तीन चतुर्थांश तरुण मित्र असूनही एकटेपणा अनुभवत आहेत, अधिक ‘कनेक्टेड’ असूनही जवळच्या मित्रांची...

0
एक काळ असा होता, जेव्हा मैत्री म्हणजे तासन्तास एकत्र बसणे, विनाकारण भेटणे आणि लहान-मोठ्या प्रत्येक गोष्टी वाटून घेणे होते. आज चित्र बदलले आहे....

नेटफ्लिक्स शोमध्ये अश्नीर ग्रोवरच्या पत्नीचे वादग्रस्त विधान:’लॉकअप 2′ मध्ये माधुरी म्हणाली- श्रीमंत मुले जन्माला...

0
नेटफ्लिक्सच्या रिॲलिटी शो ‘लॉकअप 2’ मध्ये उद्योगपती अश्नीर ग्रोवर यांच्या पत्नी माधुरी जैन ग्रोवर यांच्या एका विधानावर वाद निर्माण झाला आहे. शोमध्ये एलिमिनेशन...

फरार नीरव मोदीला लवकरच भारतात आणले जाऊ शकते:युरोपियन-कोर्टात शेवटचा खटलाही हरला; गेल्या 7 वर्षांपासून...

0
फरार हिरे व्यापारी नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. नीरव मोदी युरोपीय मानवाधिकार न्यायालयात आपली शेवटची केसही हरला आहे. त्यामुळे...
error: Content is protected !!