पुणे क्राईम: ओळखीच्या एका व्यक्तीने ज्येष्ठ नागरिकास शेताकडे घेऊन जात त्याचा खून करुन त्याच्या अंगावरील साेन्याचे दागिने घेऊन आराेपी पसार झाल्याची घटना उत्तमनगर पाेलिस ठाण्याच्या हद्दीत घडली हाेती. याप्रकरणी पाेलिसांनी आराेपींची माहिती काढत, सतिश विठ्ठल कडके नारायण पांडुरंग मानकर (वय-७४,रा. बिबवेवाडी,पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. नारायण मानकर यांना ११ एप्रिल राेजी सतीश खडके हा त्याच्या साेबत शेती दाखविण्यासाठी गावाला घेऊन गेला हाेता. परंतु १२ एप्रिल राेजी नारायण मानकर यांचा मृतदेह त्यांच्याच गाडीत आढळल्याने एकच खळबळ माजली होती. याबाबत उत्तमनगर पाेलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. नारायण मानकर यांचा खून झाल्यानंतर आराेपीने त्यांच्या अंगावरील साेन्याचे दागिने पळून नेले हाेते.
त्यानुसार सतिश खडके याचा संशय येऊन पाेलिसांनी तपास केला असता खडके याने त्याची मैत्रिण कल्पना वानखेडे हिच्या मदतीने साेन्याचे दागिने विक्री केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पुणे पाेलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने पाेलीिस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली दाेन्ही आराेपींचा शाेध घेऊन त्यांना अटक केली. आराेपींना पुढील तपासासाठी उत्तमनगर पाेलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
काेयत्याने हल्ला करणारा आराेपी गजाआड
सिंहगड कॅम्पस येथील लाॅ काॅलेज रस्त्यावर चंद्रागण कॅपीटल या इमारतीचे मुख्य गेटजवळ एक तरुण चहा पिण्यासाठी थांबला हाेता. त्यावेळी आराेपी तन्मय भुयारी व ज्ञानेश्वर जाधव या दाेघांनी मिळून तक्रारदार यांना जुन्या भांडणाच्या रागातून त्यांच्याकडील काेयत्याने वार करुन गंभीर जखमी केल्याचा प्रकार घडला हाेता. याप्रकरणी आराेपीवर भारती विद्यापीठ पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. पाेनि सावळाराम साळगावकर यांच्या पथकाने आराेपीस अटक करुन त्यांनी ज्याठिकाणी तक्रारदार यांचेवर वार करुन जखमी केले हाेते, त्या भागात आराेपीस घेऊन जाऊन त्याठिकाणी नागरिकांना व शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भयमुक्त केले.सौ.दिव्य मराठी भास्कर.































