Homeदेश-विदेशउधव ठाकरे शिवसेना म्हणतात की कच्च्या तेलाच्या किंमती कमी होतात परंतु मोदी...

उधव ठाकरे शिवसेना म्हणतात की कच्च्या तेलाच्या किंमती कमी होतात परंतु मोदी सरकार पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी करत नाही


उधव ठाकरे शिवसेना पेट्रोल डिझेल किंमत: “पेट्रोल-डिझेल, आता तरी दिलासा द्या,” अशी मागणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं सत्ताधारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारकडे केली आहे. “देशाचा कायापालट फक्त आपल्याच राजवटीत झाला, असा दावा पंतप्रधान मोदींपासून त्यांच्या भक्त मंडळींपर्यंत सर्वच करीत असतात. मात्र प्रत्यक्षात स्थिती कशी उलट आहे, हे रोज घडणाऱ्या घडामोडींवरून स्पष्ट होत असते. दरवाढ आणि महागाईच्या नावाने बोंब ठोकत ही मंडळी 2014 मध्ये केंद्रात सत्तेत आली. तेव्हापासून सलग 11 वर्षे सत्ता असूनही ना महागाई कमी झाली, ना दरवाढ नियंत्रणात आली. किंबहुना, दरवाढ होऊ नये अशी इच्छाशक्तीच मोदी सरकारची नाही. ती असती तर पेट्रोल-डिझेलचे भाव शक्य तेव्हा कमी झालेले दिसले असते. मात्र हे सरकार पेट्रोल-डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या दरांबाबत ‘अळीमिळी गुपचिळी’ असेच धोरण सोयिस्करपणे अवलंबत आले आहे,” असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.

भारतातील पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याऐवजी वाढतच आहेत

“पेट्रोल-डिझेलचे भाव जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींवर अवलंबून असतात, असे तर्कशास्त्र ही मंडळी सांगत असते. साहजिकच हे दर जागतिक बाजारात कोसळतात तेव्हा पेट्रोल-डिझेलचे देशांतर्गत दर कमी व्हावेत अशी एक साधी अपेक्षा जनतेची असते, परंतु आजपर्यंत ती पूर्ण झालेली नाही. अशावेळी भारतीय पेट्रोलियम कंपन्यांची पाठराखण करणारे मोदी सरकार देशांतर्गत इंधन स्वस्त करण्यासाठी या कंपन्यांवर सक्ती करीत नाही,” असं ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे. “आताही 2021 नंतर प्रथमच कच्च्या तेलाचे दर 70 डॉलर्सच्या खाली आले आहेत. म्हणजे भारतासाठी कच्च्या तेलाच्या आयातीची सरासरी किंमत प्रति बॅरल 70 डॉलर्सपेक्षा कमी झाली आहे. शुक्रवारी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 69.39 डॉलर्स एवढी कमी होती. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये हाच दर 89.44 डॉलर्स एवढा जास्त होता. म्हणजेच वर्षभरात कच्च्या तेलाची किंमत जागतिक बाजारात 22 टक्क्यांनी घसरली आहे. सोमवारी त्यात आणखी घट झाली, पण तरीही भारतातील पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याऐवजी वाढतच आहेत,” असं ठाकरेंच्या शिवसेनेनं अधोरेखित केलं आहे.

भारतातील पेट्रोल-डिझेलचे भावदेखील 22 टक्क्यांनी कमी व्हायला हवे होते, मात्र…

“स्वयंपाकाचा गॅस गेल्याच आठवड्यात 50 रुपयांनी महाग झाला आहे. त्यामुळे सामान्य माणसाचे बजेट बिघडले आहे, पण त्याची पर्वा सत्ताधाऱ्यांना नाही. कारण हे सरकार ‘व्यापारी मंडळा’चे आहे. नफेखोरी ही या सरकारच्या नसानसांत भिनली आहे. त्यामुळेच सामान्य जनतेच्या महागाईच्या झळा कमी होऊ दिल्या जात नाहीत. जगात कच्चे तेल महाग झाले काय किंवा स्वस्त झाले काय, भारतातील पेट्रोल-डिझेलचे दर चढेच राहणार, असेच धोरण मोदी सरकार सत्तेत आल्यापासून राबवीत आहे. अन्यथा जागतिक बाजारपेठेत गेल्या वर्षभरात कच्चे तेल 22 टक्के स्वस्त झाले, त्याप्रमाणे भारतातील पेट्रोल-डिझेलचे भावदेखील 22 टक्क्यांनी कमी व्हायला हवे होते. मात्र तसे घडलेले नाही. उलट पेट्रोल-डिझेलवर अबकारी कर लादून आणि गेल्या आठवड्यात स्वयंपाकाचा गॅस 50 रुपयांनी महाग करून या सरकारने आपली प्रेताच्या टाळूवरचे लोणी खायची वृत्ती पुन्हा दाखवून दिली आहे,” असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे.

हेच मोदी सरकारचे धोरण

“सोमवारी कच्चे तेल आणखी स्वस्त झाले, मग आता तरी पेट्रोल-डिझेल स्वस्त करून सामान्य जनतेला दिलासा द्या! अर्थात केंद्रातील नफेखोर सरकार हे शहाणपण दाखविणार नाही. कारण जनतेला आर्थिक विषमतेने ‘पंगू’ करायचे, सामाजिक-धार्मिक विषमतेच्या नशेत ‘गुंगवून’ ठेवायचे आणि त्यावर आपल्या राजकीय स्वार्थाच्या पोळ्या भाजून घ्यायच्या. जनतेला, देशाला लुटणाऱ्यांना अभय द्यायचे, हेच मोदी सरकारचे धोरण आहे,” असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!