Homeमनोरंजनआलिया भट्टनं बेस्ट फ्रेन्ड कतरिना कैफचा बॉयफ्रेंड चोरला? रणबीरच्या Ex सोबत कसं...

आलिया भट्टनं बेस्ट फ्रेन्ड कतरिना कैफचा बॉयफ्रेंड चोरला? रणबीरच्या Ex सोबत कसं आहे आलियाचं नातं

चित्रनगरी :बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट इंडस्ट्रीतील लोकप्रिय कपल्सपैकी एक आहे. चाहते त्यांच्यावर खूप प्रेम करतात. 14 एप्रिल 2022 रोजी त्यांनी लग्न केलं. त्यांच्या लग्नाला आता तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. रणबीरनं आलियाला मसाई मारामध्ये लग्नासाठी प्रपोज केलं होतं. खरंतर तिथे दोघं सुट्टीचा आनंद घेत होते. त्या आधी आलियाला याविषयी कोणतीही माहिती नव्हती. दरम्यान, या आधी रणबीर कधी आलियाची बेस्ट फ्रेन्ड कतरिना कैफसोबत रिलेशनशिपमध्ये होता. इतकंच नाही तर चर्चा अशी व्हायची की तिनं बेस्ट फ्रेन्डकडून तिचा बॉयफ्रेंड चोरला. पण खरंच असं झालं का?

रणबीर कपूरची लव्ह लाइफ ही नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे. जेव्हा रणबीर आणि कतरिना पहिल्यांदा भेटले होते जेव्हा रणबीर हा दीपिकाला डेट करत होता. कतरिना देखील कथितपणे त्या काळात सलमान खानसोबत रिलेशनशिपमध्ये होती. 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अजब प्रेम की गजब कहानी’ च्या सेटवर रणबीर आणि कतरिना या दोघांमध्ये मैत्री झाली. दीपिका आणि रणबीरचं ब्रेकअप झालं. कतरिना आणि सलमानचं नातं संपल्याच्या चर्चा देखील रंगू लागल्या होत्या.

दरम्यान, बऱ्याच चर्चा झाल्यानंतर कतरिना कैफ आणि रणबीर कपूर एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आले. दोघं अनेकदा पार्ट्यांमध्ये, कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले. जवळपास सहा वर्ष दोघांनी एकमेकांना डेट केलं. कथितपणे काही काळासाठी लिव्हइनमध्ये देखील राहिले. अफवा या देखील होत्या की रणबीर आणि कतरिनानं लंडनमध्ये गुपचूप साखरपुडा केला आणि 2016 मध्ये ते लग्न करणार होते. त्यानंतर बऱ्याच काळानंतर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला, ते सहा वर्ष रिलेशनशिपमध्ये होते आणि एकीकडे लग्नाच्या चर्चा सुरु होत असताना 2016 मध्ये रणबीर आणि कतरिनाचा ब्रेकअप झाला. ब्रेकअपनंतरही ते दोघं एकमेकांना सन्मान करतात. दोघं त्यांच्या दोघांच्या आयुष्यात पुढे गेले पण त्यातही एक ट्वीट आला तो म्हणजे रणबीर कपूर त्याच्यापेक्षा वयानं 10 वर्ष लहान असलेल्या आलिया भट्टला डेट करतोय. या बातमीनं सगळ्यांना धक्का बसला कारण आलिया आणि कतरिना एकमेकांच्या बेस्ट फ्रेंड्स होत्या. आलिया आणि रणबीरच्या वयाच्या अंतरावरून वाद मोठा झाला. आलियावर बेस्टफ्रेंडचा बॉयफ्रेंड चोरल्याचे आरोप करण्यात आले.

खरंतर 2022 मध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूरनं लग्न केलं. त्याच्या चार महिने आधी कतरिना कैफनं डिसेंबर 2021 मध्ये विकी कौशलसोबत लग्न केलं. ते तिघे त्यांच्या या भूतकाळाला मागे सोडतं आयुष्यात पुढे गेले आहेत.

काही काळापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत कटरिनाला विचारण्यात आलं होतं की तिचा एक्स EX गर्लफ्रेंड आलिया भट्टची मैत्रिण आहे? त्याचं उत्तर देत कतरिनानं सांगितलं की ती कधीच कोणत्या गोष्टीला घेऊन मनात वाईट भावना ठेवत नाही.

करण जोहरच्या चॅट शोमध्ये रॅपिड फायर राउंड दरम्यान, करणनं आलियाला विचारलं होतं की ‘तुला कोणता टॅग सगळ्यात जास्त चांगला वाटतो. आपल्या एक्सच्या एक्सच्या एक्ससोबत चांगलं मित्र राहणं की आपल्या बॉयफ्रेंडत्या एक्ससोबत चांगले मित्र राहणं.’ यावर आलियानं सांगितलं की ‘मला वाटतं की आपल्या पार्टनरच्या एक्ससोबत मैत्री कशी ठेवायची, हे मला माहित आहे. मी त्याच्या एक्सची खूप चांगली मैत्रिण आहे. माझं त्या दोघांवर प्रेम आहे.'( सौ.झी.न्यूज)

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

TMC ने EC ला 2027 पर्यंत समित्या वैध घोषित केल्या

0
नवी दिल्ली1 तासापूर्वीलिंक कॉपी कराममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस (TMC) गटाने सोमवारी निवडणूक आयोगासमोर (EC) आपले सविस्तर उत्तर दाखल करत बंडखोर गटाचे...

7 जुलै रोजी वक्री बुध राशी बदलेल:5 ऑगस्टपर्यंत बुध मिथुन राशीत राहील, जाणून घ्या...

0
बुध सध्या वक्री आहे, म्हणजेच हा ग्रह मागे सरकत आहे. 7 जुलै रोजी वक्री बुध कर्क राशीतून मिथुन राशीत प्रवेश करेल. 24 जुलैपर्यंत...

संजू सॅमसन झिम्बाब्वे टी-20 मालिकेतून बाहेर:वैभव सूर्यवंशीला पुन्हा संधी, रिंकू सिंगचे पुनरागमन; श्रेयसच कर्णधार...

0
BCCI ने झिम्बाब्वेमध्ये 23 ते 26 जुलै दरम्यान होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या 'प्लेअर...

मैत्रीतील मंदी:तीन चतुर्थांश तरुण मित्र असूनही एकटेपणा अनुभवत आहेत, अधिक ‘कनेक्टेड’ असूनही जवळच्या मित्रांची...

0
एक काळ असा होता, जेव्हा मैत्री म्हणजे तासन्तास एकत्र बसणे, विनाकारण भेटणे आणि लहान-मोठ्या प्रत्येक गोष्टी वाटून घेणे होते. आज चित्र बदलले आहे....
spot_img

संजू सॅमसन झिम्बाब्वे टी-20 मालिकेतून बाहेर:वैभव सूर्यवंशीला पुन्हा संधी, रिंकू सिंगचे पुनरागमन; श्रेयसच कर्णधार...

0
BCCI ने झिम्बाब्वेमध्ये 23 ते 26 जुलै दरम्यान होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या 'प्लेअर...

मैत्रीतील मंदी:तीन चतुर्थांश तरुण मित्र असूनही एकटेपणा अनुभवत आहेत, अधिक ‘कनेक्टेड’ असूनही जवळच्या मित्रांची...

0
एक काळ असा होता, जेव्हा मैत्री म्हणजे तासन्तास एकत्र बसणे, विनाकारण भेटणे आणि लहान-मोठ्या प्रत्येक गोष्टी वाटून घेणे होते. आज चित्र बदलले आहे....

नेटफ्लिक्स शोमध्ये अश्नीर ग्रोवरच्या पत्नीचे वादग्रस्त विधान:’लॉकअप 2′ मध्ये माधुरी म्हणाली- श्रीमंत मुले जन्माला...

0
नेटफ्लिक्सच्या रिॲलिटी शो ‘लॉकअप 2’ मध्ये उद्योगपती अश्नीर ग्रोवर यांच्या पत्नी माधुरी जैन ग्रोवर यांच्या एका विधानावर वाद निर्माण झाला आहे. शोमध्ये एलिमिनेशन...

फरार नीरव मोदीला लवकरच भारतात आणले जाऊ शकते:युरोपियन-कोर्टात शेवटचा खटलाही हरला; गेल्या 7 वर्षांपासून...

0
फरार हिरे व्यापारी नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. नीरव मोदी युरोपीय मानवाधिकार न्यायालयात आपली शेवटची केसही हरला आहे. त्यामुळे...
error: Content is protected !!