Homeमहाराष्ट्रतुमच्या स्मार्टफोनवर सायबर गुन्हेगारांचा डोळा, मोबाईल चोरून 'असा' मारला जातोय बँक खात्यावर...

तुमच्या स्मार्टफोनवर सायबर गुन्हेगारांचा डोळा, मोबाईल चोरून ‘असा’ मारला जातोय बँक खात्यावर डल्ला!


नाशिक सायबर गुन्हा: तुम्ही मोबाईल हॅक करून पैसे चोरण्याची घटना ऐकली असेल किंवा तुमचा ओटीपी मागून पैसे अपहार केल्याची घटना देखील वाचली असेल.मात्र नाशिकमध्ये एक वेगळीच घटना घडली आहे.नाशिक मध्ये राहणा-या एका कंत्राटदाराचा मोबाईल चोरून त्याच्या अकाउंट वरून तब्बल साडेतीन कोटी रुपये चोरल्याची घटना घडली आहे.

आर्थिक फसवणुकीतून वाचायचं असेल तर तुम्हाला कोणताही फोन आला किंवा मेसेज आला किंवा कुणी ओटीपी मागितला तर त्यावर विश्वास ठेवू नका असं आवाहन अनेकदा करण्यात आलंय. मात्र आता तुम्हाला तुमचा स्मार्टफोनही सांभाळून ठेवावा लागणार आहे. कारण सायबर गुन्हेगारांचा आता तुमच्या फोनवर डोळा आहे. मोबाईल हॅक करून नाही तर मोबाईल चोरून या सायबर भामट्यांनी नाशिकमधील एका कंत्राटदाराला साडेतीन कोटींचा गंडा घातलाय. कुरिअर देण्यासाठी ओटीपी पाहण्याच्या बहाण्याने  हेल्मेट घातलेले दोन जण कंत्राटदाराजवळ आले. आणि त्याचा फोन घेऊन पसार झाले. आणि अवघ्या काही तासात कंत्राटदाराचं अकाऊंट रिकामं झालं.

सायबर पोलिसांच्या मदतीने कंत्राटदाराच्या बँक खात्यावरील सर्व व्यवहार तत्काळ थांबवण्यात आले. तपासामध्ये कंत्राटदाराच्या खात्यावरून धुळ्यातील एका व्यक्तीच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती मिळाली धुळे पोलिसांच्या मदतीने खातेधारकाला शोधण्यात आलं. 48 तासात कंत्राटदाराला त्याचे पैसे परत मिळाले. ज्या खातेधारकाच्या खात्यावर पैसे जमा झाले त्याने हे पैसे जमीन व्यवहाराचे असल्याचं सांगितलं. त्यामुळे त्याच्यासोबत व्यवहार करणा-या व्यक्तींचा शोध घेतला जातोय.

अद्याप हे सायबर भामटे पोलिसांच्या हाती लागू शकले नाहीयेत.
आपले सगळे पैसे परत मिळाल्याने कंत्राटदाराने सुटकेचा निश्वास सोडला असला तरी या प्रकारामुळे नाशिकमध्ये खळबळ उडालीये.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

मैत्रीतील मंदी:तीन चतुर्थांश तरुण मित्र असूनही एकटेपणा अनुभवत आहेत, अधिक ‘कनेक्टेड’ असूनही जवळच्या मित्रांची...

0
एक काळ असा होता, जेव्हा मैत्री म्हणजे तासन्तास एकत्र बसणे, विनाकारण भेटणे आणि लहान-मोठ्या प्रत्येक गोष्टी वाटून घेणे होते. आज चित्र बदलले आहे....

राज्यात अतिवृष्टीने 9 बळी:मानखुर्दमध्ये चाळ कोसळून 5 चिमुकल्यांसह 6 जणांचा अंत; पावसामुळे जनजीवन विस्कळीत

0
मुंबई, ठाणे, पालघर आणि संपूर्ण कोकण पट्ट्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक सखल भागांत घरांमध्ये...

नेटफ्लिक्स शोमध्ये अश्नीर ग्रोवरच्या पत्नीचे वादग्रस्त विधान:’लॉकअप 2′ मध्ये माधुरी म्हणाली- श्रीमंत मुले जन्माला...

0
नेटफ्लिक्सच्या रिॲलिटी शो ‘लॉकअप 2’ मध्ये उद्योगपती अश्नीर ग्रोवर यांच्या पत्नी माधुरी जैन ग्रोवर यांच्या एका विधानावर वाद निर्माण झाला आहे. शोमध्ये एलिमिनेशन...

युरोपमधील 23 देशांमध्ये विक्रमी उष्णतेची लाट:उष्णतेमुळे 11 लाख कोटींचे नुकसान, पुढील वर्षी 34% लोकसंख्या...

0
युरोपमध्ये या वर्षीच्या उष्णतेचा लोकांच्या जीवनावर आणि अर्थव्यवस्थेवर, दोन्हीवर थेट परिणाम झाला. युरोपमधील 23 देशांमध्ये विक्रमी उष्णतेची लाट नोंदवली गेली. अनेक भागांमध्ये तापमान...
spot_img

मैत्रीतील मंदी:तीन चतुर्थांश तरुण मित्र असूनही एकटेपणा अनुभवत आहेत, अधिक ‘कनेक्टेड’ असूनही जवळच्या मित्रांची...

0
एक काळ असा होता, जेव्हा मैत्री म्हणजे तासन्तास एकत्र बसणे, विनाकारण भेटणे आणि लहान-मोठ्या प्रत्येक गोष्टी वाटून घेणे होते. आज चित्र बदलले आहे....

नेटफ्लिक्स शोमध्ये अश्नीर ग्रोवरच्या पत्नीचे वादग्रस्त विधान:’लॉकअप 2′ मध्ये माधुरी म्हणाली- श्रीमंत मुले जन्माला...

0
नेटफ्लिक्सच्या रिॲलिटी शो ‘लॉकअप 2’ मध्ये उद्योगपती अश्नीर ग्रोवर यांच्या पत्नी माधुरी जैन ग्रोवर यांच्या एका विधानावर वाद निर्माण झाला आहे. शोमध्ये एलिमिनेशन...

फरार नीरव मोदीला लवकरच भारतात आणले जाऊ शकते:युरोपियन-कोर्टात शेवटचा खटलाही हरला; गेल्या 7 वर्षांपासून...

0
फरार हिरे व्यापारी नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. नीरव मोदी युरोपीय मानवाधिकार न्यायालयात आपली शेवटची केसही हरला आहे. त्यामुळे...

जोकोविचने फेडररचा विक्रम मोडला:विम्बल्डनमध्ये सर्वाधिक 106 सामने जिंकणारा खेळाडू बनला; ओसाकाने वर्ल्ड नंबर-1 सबालेंकाला...

0
नोव्हाक जोकोविच विम्बल्डनच्या इतिहासात सर्वाधिक सामने जिंकणारा पुरुष खेळाडू बनला आहे. चौथ्या फेरीत, 39 वर्षीय जोकोविचने रशियाच्या क्वालिफायर रोमन सफीउलिनला 7-6 (8-6), 6-3,...
error: Content is protected !!