Homeमहाराष्ट्रमनसे नेते संदीप देशपांडेंना धमकी, मराठी सक्तीच्या मुद्द्यावरुन वाद पेटला

मनसे नेते संदीप देशपांडेंना धमकी, मराठी सक्तीच्या मुद्द्यावरुन वाद पेटला

मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडेंना धमकी देण्यात आलीय. एका अज्ञात व्यक्तींना संदीप देशपांडेंना (Sandip Deshpande) धमकी देत शिवीगाळ केलीय. मराठी सक्तीच्या मुद्द्यावरुन मनसे आक्रमक झालीय. दरम्यान याच पार्श्वभूमीवर संदीप देशपांडेंना धमकी देण्यात आल्याची माहिती आहे.

मराठीच्या सक्तीसाठी मनसेनं आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर चांगलाच वाद निर्माण झाला होता. दरम्यान याच मुद्द्यावरुन मनसे नेते संदीप देशपांडेंना धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर संदीप देशपांडेंनी दादर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलीय. एका अज्ञात व्यक्तीनं संदीप देशपांडेंना धमकी देत शिवीगाळ देखील केलीये.

फोनवरुन मिळालेल्या धमकीनंतर संदीप देशपांडेंनी राज ठाकरेंची भेट घेतली. संपूर्ण प्रकरणाची माहिती त्यांनी राज ठाकरेंना दिली. तसंच अशा धमक्यांना भीक घालत नसल्याचं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय.

मनसेच्या मराठी सक्तीच्या मुद्द्यावरुन चांगलंच राजकारण तापलंय. दरम्यान मनसेच्या या भूमिकेनंतर उत्तर भारतीय विकास सेनेचे सुनील शुक्लांनी मनसेला कोर्टात खेचण्याचा इशारा दिला होता. तर महाराष्ट्रात मराठीचा सन्मान कोणी करत नसेल त्याला धडा शिकवूच असा पलटवार बाळा नांदगावकरांनी केला.

मराठी सक्तीवरुन राज्यात चांगलंच राजकारण रंगलंय. दरम्यान या मुद्द्यावरुन एकीकडे मनसेला कोर्टात खेचण्याचा इशारा देण्यात आलाय. तर दुसरीकडे मनसे नेते संदीप देशपांडेंना देखील धमकी देण्यात आलीय.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

कथा: व्यापाऱ्याला सेवकाची शिकवण:एक छोटीशी चूक आपल्या वर्षांच्या मेहनतीवर पाणी फेरू शकते, प्रत्येक परिस्थितीत...

0
एक लोककथा आहे. एका राज्यात एक अत्यंत कुशल व्यापारी होता. त्याची बुद्धिमत्ता, प्रामाणिकपणा आणि व्यवस्थापन क्षमता अद्भुत होती. राजा देखील त्याच्या योग्यतेने प्रभावित...

जोकोविचने फेडररचा विक्रम मोडला:विम्बल्डनमध्ये सर्वाधिक 106 सामने जिंकणारा खेळाडू बनला; ओसाकाने वर्ल्ड नंबर-1 सबालेंकाला...

0
नोव्हाक जोकोविच विम्बल्डनच्या इतिहासात सर्वाधिक सामने जिंकणारा पुरुष खेळाडू बनला आहे. चौथ्या फेरीत, 39 वर्षीय जोकोविचने रशियाच्या क्वालिफायर रोमन सफीउलिनला 7-6 (8-6), 6-3,...

पंढरपुरात जीर्णोद्धार पूर्ण झालेल्या मंदिरांत मूर्तींची प्राणप्रतिष्ठा:व्यंकटेश, महालक्ष्मी, हनुमान आदी मंदिरे दर्शनासाठी खुली

0
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिर जतन व संवर्धन विकास आराखड्यांतर्गत जीर्णोद्धार व संवर्धनाची कामे पूर्ण झालेल्या व्यंकटेश मंदिर, महालक्ष्मी मंदिर, काशी...

दिल्लीत नवविवाहितेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू:अडीच महिन्यांपूर्वी झाले होते लग्न; कुटुंबाने हुंड्यासाठी हत्येचा आरोप...

0
दिल्लीतील लोधी कॉलनीमध्ये एका नवविवाहितेच्या मृत्यूचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी सांगितले की, शनिवारी एनडीएमसी (NDMC) फ्लॅट्सच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने २८ वर्षीय आकृती...
spot_img

जोकोविचने फेडररचा विक्रम मोडला:विम्बल्डनमध्ये सर्वाधिक 106 सामने जिंकणारा खेळाडू बनला; ओसाकाने वर्ल्ड नंबर-1 सबालेंकाला...

0
नोव्हाक जोकोविच विम्बल्डनच्या इतिहासात सर्वाधिक सामने जिंकणारा पुरुष खेळाडू बनला आहे. चौथ्या फेरीत, 39 वर्षीय जोकोविचने रशियाच्या क्वालिफायर रोमन सफीउलिनला 7-6 (8-6), 6-3,...

जसप्रीत बुमराह रेड बॉलची तयारी

0
अहमदाबाद2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने रेड बॉल क्रिकेटची तयारी सुरू केली आहे. रविवारी त्याने अहमदाबादमध्ये लाल एसजी चेंडूने गोलंदाजी करतानाचे...

एलपीजी सबसिडी स्कॅम अलर्ट: सायबर तज्ञांनी नागरिकांना चेतावणी दिली

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करादेशात सध्या LPG (लिक्विड पेट्रोलियम गॅस) ची थोडी टंचाई आहे. सायबर ठग याचाच फायदा घेऊन LPG ग्राहकांना लक्ष्य करत आहेत....

नवीन बायोपिक:15 वर्षांनंतर सेलिना मोठ्या पडद्यावर परतणार, ‘सिस्टर निवेदिता’ची भूमिका साकारणार

0
सेलिना जेटली सुमारे १५ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. ती दिग्दर्शक राम कमल मुखर्जी यांच्या पुढील बायोपिकमध्ये सिस्टर निवेदिता (मार्गारेट नोबल) यांची...
error: Content is protected !!