जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नव्याने रुजू झालेले भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी अनय नावंदर यांनी “दिव्य मराठी’शी संवाद साधला. शिक्षकांच्या प्रशिक्षणासह अन्य माध्यमांतून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जास्तीत-जास्त दर्जेदार शिक्षण मुलांना कसे मिळेल, यासाठी प्रयत्न करण्यात येतील. पारदर्शकता, गतिमान प्रशासन, लोकाभिमुख कारभार यांना प्राधान्य देणार असल्याचा मानसही त्यांनी बोलून दाखवला. विशेषतः शिक्षण, आरोग्य, ई-ऑफिस प्रणालीचा विस्तार करून केंद्र-राज्य शासनाच्या कल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होईल, असेही ते म्हणाले. Q : सीईओ म्हणून कोणत्या क्षेत्राला प्राधान्य राहील? A : जनहिताच्या सर्वच क्षेत्रांमध्ये व्यवस्थित काम होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू लक्षात घेऊन नियोजन करण्यात येत आहे. जि.प. शाळांमधून दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी शासनाकडून प्रयत्न होत आहेत. जिल्ह्यातही डायटच्या माध्यमातून प्रशिक्षणासह अन्य प्रयत्न होतील. शिक्षण, आरोग्य या दोन अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येईल. शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रशासन अधिक सक्षम, गतिमान कसे होईल, यासाठीही प्रयत्न होतील. Q : नीट, जेईई आणि सीईटी परीक्षांसाठी पूर्णतः मोफत खासगी प्रशिक्षणाची योजना असून, ती गतिमान होईल का? A : ही योजना राबवण्यासाठी काही तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात येत आहे. ही योजना गरीब, गरजूंपर्यंत पोहोचेल. पात्र विद्यार्थी-विद्यार्थ िनींना फायदा होईल. Q : यंदा मान्सूनवर अल निनोचे सावट असल्याने आगामी काळात पाणीटंचाई निर्माण होणार असून, यावर कोणत्या उपाययोजना करणार? A : पाणीटंचाई हा विषय संवेदनशीलपणेच हाताळण्यात येणार आहे. ग्रामस्थांना पाणीपुरवठा व्यवस्थित होण्यासाठी प्रादेशिक, अन्य पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यात येईल. उपाययोजना करण्यात येतील. Q : दर्जेदार रुग्णसेवा मिळावी, यासाठी कोणते प्रयत्न होतील? A : जि.प.अंतर्गत आरोग्य केंद्र, उपकेंद्रांचा आढावा घेण्यात येणार आहे. ही केंद्रे अधिक कार्यक्षम होण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील. येथे रुग्णांना दर्जेदार, तत्परपणे आरोग्य सुविधा मिळतील. आरोग्य विभागाच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होईल. Q : दलित वस्तीच्या निधीचा तिढा कसा सुटेल? A : हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. मात्र न्यायालयात जिल्हा परिषदेची योग्य बाजू सक्षमपणे कशी मांडता येईल, यासाठी प्रयत्न होतील.
A : शिक्षण विभागांतर्गत निपुण अभियान राबवण्यात येत आहे. हे अभियान अधिक प्रभावीपणे कसे राबवता येईल, या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातील. विद्यार्थ्यांचा मूलभूत शैक्षणिक पाया सक्षम होणे गरजेचे आहे. शाळांची गुणवत्ता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
Source link
दिव्य मराठी मुलाखत:पिण्याच्या पाण्याचा मुद्दा संवेदनशीलपणे हाताळणार, जिल्हा परिषद सीईओ अनय नावंदर यांची ग्वाही
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
चंपत राय राजीनाम्याच्या तिसऱ्या दिवशी दिल्लीत:RSS राम मंदिर देणगी चोरीचा तयार करत आहे अहवाल
श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टमधून राजीनामा दिल्यानंतर, चंपत राय रविवारी संध्याकाळी अयोध्येहून दिल्लीसाठी रवाना झाले. ते दुपारी तीन वाजेपर्यंत राम मंदिरातच होते. सूत्रांनी...
ज्येष्ठ पौर्णिमा 2026: विष्णु-महालक्ष्मी अभिषेक, पितृपूजा
3 तासांपूर्वीलिंक कॉपी कराआज (२९ जून) ज्येष्ठ महिन्याची शेवटची तिथी म्हणजेच पौर्णिमा आहे. या वेळी अधिकमासामुळे ज्येष्ठ महिना ५९ दिवसांचा होता. याच पौर्णिमेला...
बेन स्टोक्सची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती:2019 विश्वचषक, 2022 टी-20 वर्ल्डकपचा हिरो; नाइट क्लब वादामुळे कारकीर्द...
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेला तिसरा कसोटी सामना त्याचा शेवटचा सामना असेल. त्याच्या निवृत्तीची घोषणा...
ट्विशा प्रकरणातील आरोपी निवृत्त न्यायाधीश गिरिबाला यांच्या घरी चोरी:दागिने आणि कागदपत्रांची फाइल उचलली, पोलिसांचा...
अभिनेत्री-मॉडेल ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात आरोपी असलेल्या निवृत्त न्यायाधीश गिरिबाला सिंह यांच्या घरात चोर शिरले. त्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह गिरिबाला आणि त्यांचे पुत्र समर्थ...
बेन स्टोक्सची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती:2019 विश्वचषक, 2022 टी-20 वर्ल्डकपचा हिरो; नाइट क्लब वादामुळे कारकीर्द...
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेला तिसरा कसोटी सामना त्याचा शेवटचा सामना असेल. त्याच्या निवृत्तीची घोषणा...
भारताची पाचवी विकेट पडली, स्कोअर 85/5:जय मुंद्राने तीन बळी घेतले; आयर्लंडने दिले 155 धावांचे...
दुसऱ्या टी२० सामन्यात आयर्लंडने भारतासमोर १५५ धावांचे लक्ष्य ठेवले. हॅरी टेक्टरच्या अर्धशतकाच्या (५३) जोरावर संघाने २० षटकांत १५४ धावा केल्या. सामन्याचे स्कोअरकार्ड… प्लेइंग-११...
मुलाला कोचिंगमध्ये प्रवेश द्यायचा आहे:कोचिंग सेंटरमध्ये दाखल करण्यापूर्वी हे 10 प्रश्न विचारा, प्रत्येक पालकांसाठी...
सर्व पालकांना असे वाटते की, त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या चांगल्या संधी मिळाव्यात. चांगले कोचिंग मिळावे, जेणेकरून ते उत्तम करिअर घडवू शकतील. त्यामुळे चांगले कोचिंग...
रावणाची लंका अन् अशोक वाटिका आता कशी दिसते?:अभिनेता प्रदीप काबरा यांनी श्रीलंकेतून शेअर केली...
अभिनेता प्रदीप काबरा नुकतेच श्रीलंका दौऱ्यावर गेले होते, जिथे त्यांनी 'रामायण'शी संबंधित मानल्या जाणाऱ्या स्थळांची झलक शेअर केली. त्यांनी रावणाची लंका, अशोक वाटिका,...
































