Homeदेश-विदेशमाऊंट अबूमध्ये बिबट्याचा कचरा खात असल्याचा व्हिडिओ वन अधिकाऱ्याने शेअर केला आहे

माऊंट अबूमध्ये बिबट्याचा कचरा खात असल्याचा व्हिडिओ वन अधिकाऱ्याने शेअर केला आहे


व्हायरल व्हिडिओ: जंगलं नष्ट करुन मानवी वस्त्या निर्माण करण्यात आल्या आणि प्राण्यांवर आपला निवारा गमावण्याची वेळ आली. यामुळेच अनेक ठिकाणी वन्यप्राणी आणि माणसांमध्ये संघर्ष होतानाही दिसतो. निसर्गाचा समतोल राखताना वन्य प्राण्यांनाही त्यांचा निवारा देणं, जंगलं नष्ट न करणं महत्त्वाचं का आहे याचा प्रत्यय दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 17 सेकंदाची ही व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे, ज्यामध्ये बिबट्या चक्क कचरा खाताना दिसत आहे. राजस्थानच्या माऊंट अबूमधील ही घटना आहे. वनअधिकारी प्रवीण कासवान यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

बिबट्या हा निसर्गातील सर्वात प्राणघातक शिकारी प्राण्यांपैकी एक आहे, जो त्यांच्या गुप्ततेसाठी, ताकदीसाठी आणि अनुकूलतेसाठी ओळखला जातो. परंतु या व्हिडीओत बिबट्या अत्यंत वेगळ्या रुपात दिसत आहे. व्हिडीओमध्ये बिबट्या हताशपणे प्लास्टिक, घाण आणि इतर कचऱ्यातून कचऱ्यात अन्न शोधताना दिसत आहे.

“हे किती दुःखद दृश्य आहे. शिवांश साह यांनी माउंट अबूजवळ हा बिबट्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. पाहा आपला कचरा जंगलात कसा पोहोचत आहे!,” असं कासवान यांनी व्हिडीओ शेअर करताना लिहिलं आहे.  “चला चांगले बनूया, जंगलांचे रक्षण करूया, कचऱ्याचे व्यवस्थापन करूया आणि जंगलाला त्याचे घर परत देऊया,” असा संदेशही त्यांनी दिला आहे.

व्हिडिओ व्हायरल होताच, सोशल मीडिया युजर्सनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली असून, वन्य प्राण्यांच्या अधिवासाच्या समस्येवर सरकारने कारवाई करत कठोर पाऊल उचलावं अशी मागणी केली.

“खूप दुःखद. एक गोष्ट स्पष्ट आहे. आम्ही आमची नागरी जाणीव स्वेच्छेने बदलणार नाही. त्यासाठी मोठा दंड आकारावा लागेल,” असं एका युजरने म्हटलं आहे. तर एकाने म्हटलं आहे की, “विकासाच्या नावाखाली त्यांचे अधिवास त्यांच्याकडून काढून घेतले जात आहेत, जंगले नष्ट केली जात आहेत. पर्यावरणाचे प्रचंड नुकसान झाले आहे पण सरकारला त्याचा काही फरक पडत नाही.”

तिसऱ्याने टिप्पणी करत लिहिलं आहे की, “मी माउंट अबूचा आहे. मी आधी एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये दोन अस्वल डंपिंग यार्डमध्ये होते. आता गायी, म्हशी, अस्वल आणि बिबट्या हे सर्व एकत्र दिसतात. मला नावं सांगायची नाहीत, पण ते काहीही करत नाहीत. खूप वाईट वाटत आहे”.

चौथ्याने म्हटले: “खरोखर खूप वाईट. जेव्हा आपण त्यांची जमीन अतिक्रमण करतो तेव्हा या गरीब प्राण्यांकडे दुसरा पर्याय नसतो. माणसाच्या लोभाला अंत नाही.”

गेल्या वर्षीपर्यंत, भारतात बिबट्यांची संख्या 13 हजार 874 होती, 2018 ते 2022 दरम्यान दरवर्षी 1.08 टक्के वाढ नोंदवली गेली. पर्यावरण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात असं दिसून आलं आहे की मध्य प्रदेश (3907) मध्ये देशातील बिबट्यांची सर्वाधिक संख्या आहे, त्यानंतर महाराष्ट्र (1985), कर्नाटक (1879) आणि तामिळनाडू (1070) आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...
spot_img

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...
error: Content is protected !!