Homeदेश-विदेशनेपाळमध्ये पुजली जाणार 2 वर्षांची 'जिवंत देवी'; वर्षानुवर्षे चालणाऱ्या या प्रथेचा महाराष्ट्रातील...

नेपाळमध्ये पुजली जाणार 2 वर्षांची ‘जिवंत देवी’; वर्षानुवर्षे चालणाऱ्या या प्रथेचा महाराष्ट्रातील तुळजाभवानीशी आहे संबंध?


Aryatara Shakya Nepal Kumari: भारताचा शेजारी देश नेपाळमध्ये 30 सप्टेंबर रोजी नवीन कुमारे देवीची निवड करण्यात आली. शास्त्रानुसार कुमारी देवीची निवड करुन तिला सिंहासनावर बसवण्यात आलं. एका उत्सवादरम्यान फक्त अडीच वर्षांच्या आर्यतारा शाक्य या मुलीची देवी म्हणून निवड करण्यात आली. जिवंत देवी म्हणून तिचा अभिषेकदेखील करण्यात आला.

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

आर्यताराच्या आधी तृष्णा शाक्य शाही कुमारे देवी होती. 27 डिसेंबर 2017 रोजी तिला निवडण्यात आलं होतं. तेव्हा तिचं वय फक्त 3 वर्षे इतके होतं. तसंच, नेपाळमध्ये पूजण्यात येणाऱ्या कुमारी देवी यांना खास दर्जा असतो. त्यांना अनेक जण पुजतात. मात्र या कुमारी देवी एका घराच्या आत एकांत आणि गुप्तपणे जीवन व्यतित करतात. तसंच. समाजात खूप कमीवेळा दिसतात. एक जिवंत देवी शाक्य परंपरेच्या खास क्षणीच घरातून बाहेर पडतात. त्या घरातून वर्षातून फक्त 13 वेळाच बाहेर पडू शकतात. तसंच, कुमारी देवी या मासिक पाळी सुरू होईपर्यंत काठमांडू येथील कुमारी घरात आई-वडिलांपासून दूर देवीप्रमाणेच राहतात.

नवीन कुमारी देवीची निवड कशी होते?

कुमारी देवीसाठी त्याच मुलींची निवड केली जाते. ज्यांचे वय 2-4 वर्ष इतके आहे. तसंच, तिच्या शरीरावर कोणतेही व्रण किंवा खूण नाही. त्यांचे केस, डोळे आणि दात पूर्णपणे आरोग्यदायी असतील आणि त्या निडर असतील. काळोखालाही न भिणाऱ्या असतील.

तुळजाभवानीचे प्रतिनिधित्व?

वरिष्ठ पत्रकार चंद्रभूषण त्यांच्या ‘भारत से कैसे गया बुद्ध का धर्म’ या पुस्तकात म्हणतात की,  नेपाळची कुमारी देवी पंरपरा भारतीय शाक्त परंपरेशी साधर्म्य असलेली आहे. कुमारी देवी तुळजा भवानीचे प्रतिनिधित्व करते. या देवीला महिषासूरमर्दिनीदेखील म्हण तात. नेपाळमध्ये ही देवी नेवार बौद्ध समुदायातदेखील पूजली जाते. तज्ज्ञांच्या मते, तुळजा भवानीचा उल्लेख किंवा चरित्र कोणत्याही बुद्ध परंपरा आणि ग्रंथात सापडत नाही. नेपाळमध्ये तुळजाचा उच्चार तलजूसारखा असून काहीजण तलेजू असंदेखील म्हणतात.

कुमारी देवींचे रडणे अशुभ

कुमारी देवी भक्तांना अत्यंत शांत मुद्रेने भेटते तसंच, इशाऱ्यांमध्ये भाव प्रकट करते. तसंच, नेपाळमध्ये कुमारी देवीचे रडणे अशुभ मानले जाते. 2001मध्ये 6 वर्षांची कुमारी देवी (चनीरा बज्राचार्य) सतत चार दिवस रडत होती. तिच्या रडण्याच्या शेवटच्या दिवशी 1 जून 2001 ला नेपाळचे तत्कालीन युवराजने त्याचे आई-वडिल राजा बीरेद्रे आणि राणी ऐश्वर्यासह शाही कुटुंबातील नऊ लोकांची हत्या केली आणि स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली.

कुमारी देवीसोबत लग्न करण्यात घाबरतात लोक?

कुमारी देवीबाबत कित्येक वर्षांपासून एक मान्यता चालत आली आहे. कुमारी देवीसोबत लग्न करणाऱ्या मुलांचा कमी वयातच मृत्यू होतो आणि त्यांना संपूर्ण आयुष्य एकट्याने काढावे लागते. जेव्हा कुमारी देवी सामान्य जीवन जगू लागते आणि तिचे लग्नाचे वय झाले तरी कोणीही लग्नासाठी तिच्याशी तयार होत नाही.

लोक या मान्यतेमुळंच त्याच्या घरातील मुलांची लग्न माजी कुमारी देवींसोबत करत नाही. त्यांना भिती असते की त्यांच्या मुलांचा अकाली मृत्यू होईल.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!