Homeमहाराष्ट्रTaking advantage of his wife's blindness, he abused a 12-year-old girl. |...

Taking advantage of his wife’s blindness, he abused a 12-year-old girl. | पत्नी अंध असल्याचा गैरफायदा घेत 12 वर्षीय मुलीवर अत्याचार: नराधम पित्या विरुध्द आखाडा बाळापूर पोलिसात गुन्हा दाखल, मुलगी गरोदर राहिल्याने प्रकरण उघडकीस – Hingoli News

आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यांतर्गत एका गावात पत्नी अंध असल्याचा गैरफायदा घेऊन १२ वर्षीय मुलीवरच अत्याचार करणाऱ्या पित्या विरुध्द आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात रविवारी ता. २५ सायंकाळी गुन्हा दाखल झाला आहे. मुलगी गरोदर राहिल्याने पित्याच्या कृत्याचा भांडाफ

?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यांतर्गत एका गावात पिडीत मुलगी तिच्या दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या आई, वडिल व दोन लहान भावांसह एका खोलीत राहते. वडिल रोजमजूरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सदर मुलगी सहावी वर्गात शिक्षण घेते. डिसेंबर महिन्यात पिडीत अल्पवयीन मुलगी कुटुंबासह घरात झोपली असतांना तिच्या पित्यानेच तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. मात्र सदर मुलीने मारहाणीच्या भितीने सदर प्रकार कोणालाही सांगितला नाही.

मात्र मागील काही दिवसांत त्या मुलीच्या पोटात दुखत असल्याने तिच्या कुटुंबियांनी तिला थेट नांदेड येथे शासकिय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तिच्या आरोग्य तपासणी मध्ये सदर मुलगी गरोदर असल्याचे दिसून आले. सदर प्रकरण वेगळेच दिसून येत असल्याने वैद्यकिय अधिकाऱ्यांनी सदर मुलीकडे विचारणा केल्यानंतर तिने डॉक्टरांना घराचा पत्ता व इतर माहिती दिली.

त्यावरून वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तातडीने आखाडा बाळापूर पोलिसांना माहिती दिली. पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर बसवंते, महिला पोलिस उपनिरीक्षक श्रीदेवी वग्गे यांच्या पथकाने तातडीने नांदेड येथे जाऊन त्या मुलीचा जवाब नोंदविला. यावेळी मुलीने तिच्या पित्यानेच अत्याचार केल्याचा जवाब नोंदविला. यावरून पोलिसांनी तातडीने पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याची अधिक चौकशी सुरु केली आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

देणगी चोरीची FIR करणारे कृष्ण मोहन नवे महासचिव:IFS मधून निवृत्त झाल्यानंतर RSS मध्ये आले,...

0
श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त कामेश्वर चौपाल यांच्या निधनानंतर सप्टेंबर 2025 मध्ये त्यांच्या जागी निवृत्त IFS कृष्ण मोहन यांना विश्वस्त बनवण्यात आले....

मुंबई राजभवन SRPF जवानाची ड्युटीवर आत्महत्या; पोलीस तपास

0
मलबार हिल येथील अत्यंत सुरक्षित आणि 'व्हीआयपी' समजल्या जाणाऱ्या राजभवन परिसरात एक अत्यंत खळबळजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. राजभवनाच्या सुरक्षेसाठी तैनात...

TMC ने EC ला 2027 पर्यंत समित्या वैध घोषित केल्या

0
नवी दिल्ली1 तासापूर्वीलिंक कॉपी कराममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस (TMC) गटाने सोमवारी निवडणूक आयोगासमोर (EC) आपले सविस्तर उत्तर दाखल करत बंडखोर गटाचे...

7 जुलै रोजी वक्री बुध राशी बदलेल:5 ऑगस्टपर्यंत बुध मिथुन राशीत राहील, जाणून घ्या...

0
बुध सध्या वक्री आहे, म्हणजेच हा ग्रह मागे सरकत आहे. 7 जुलै रोजी वक्री बुध कर्क राशीतून मिथुन राशीत प्रवेश करेल. 24 जुलैपर्यंत...
spot_img

संजू सॅमसन झिम्बाब्वे टी-20 मालिकेतून बाहेर:वैभव सूर्यवंशीला पुन्हा संधी, रिंकू सिंगचे पुनरागमन; श्रेयसच कर्णधार...

0
BCCI ने झिम्बाब्वेमध्ये 23 ते 26 जुलै दरम्यान होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या 'प्लेअर...

मैत्रीतील मंदी:तीन चतुर्थांश तरुण मित्र असूनही एकटेपणा अनुभवत आहेत, अधिक ‘कनेक्टेड’ असूनही जवळच्या मित्रांची...

0
एक काळ असा होता, जेव्हा मैत्री म्हणजे तासन्तास एकत्र बसणे, विनाकारण भेटणे आणि लहान-मोठ्या प्रत्येक गोष्टी वाटून घेणे होते. आज चित्र बदलले आहे....

नेटफ्लिक्स शोमध्ये अश्नीर ग्रोवरच्या पत्नीचे वादग्रस्त विधान:’लॉकअप 2′ मध्ये माधुरी म्हणाली- श्रीमंत मुले जन्माला...

0
नेटफ्लिक्सच्या रिॲलिटी शो ‘लॉकअप 2’ मध्ये उद्योगपती अश्नीर ग्रोवर यांच्या पत्नी माधुरी जैन ग्रोवर यांच्या एका विधानावर वाद निर्माण झाला आहे. शोमध्ये एलिमिनेशन...

फरार नीरव मोदीला लवकरच भारतात आणले जाऊ शकते:युरोपियन-कोर्टात शेवटचा खटलाही हरला; गेल्या 7 वर्षांपासून...

0
फरार हिरे व्यापारी नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. नीरव मोदी युरोपीय मानवाधिकार न्यायालयात आपली शेवटची केसही हरला आहे. त्यामुळे...
error: Content is protected !!