छत्रपती शिवाजी महाराज जयंती 2025: छत्रपती संभाजी महाराज…स्वराज्याचा छावा, स्वराज्यासाठी बलिदान देणारा असामान्य योद्धा. शेवटच्या श्वासापर्यंत संभाजी राजेंनी (Chhatrapati Sambhaji Maharaj) स्वराज्याच्या रक्षणासाठी लढा दिला. मुघल बादशहा औरंगजेब देखील छत्रपती संभाजीराजे यांच्यापुढे पराभूत झाला. मुघल बादशहा औरंगजेब याने छत्रपती संभाजीराजे यांना कैद केले. मात्र, जिंकूनही औरंगजेब अपयशी ठरला. संभाजीराजेंमुळे औरंगजेबाची एकमेव इच्छा त्याच्या हयातीत काय त्याच्यानंतरही कधीच पूर्ण होऊ शकली नाही.
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी हे मराठा साम्राज्याचे महान योद्धे होते. संभाजी महाराजांचा जन्म 24 मे 1657 रोजी सकाळी 10:01 वाजता पुरंदर किल्ल्यावर झाला. शिवापूरच्या ऐतिहासिक दस्तऐवजात छत्रपती शिवरायांचे पुत्र छत्रपती संभाजी यांच्या जन्माची नोंद आहे.
संभाजी हे त्यांच्या काळातील एक महान राजा, पराक्रमी आणि शूर योद्धा होते. त्यांच्याकडे अद्भुत युद्ध कौशल्य होते. वयाच्या 31 वर्षी संभाजीराजेंच्या आयुष्याचा शेवट झाला. मात्र, अतीशय लहान कालाविधीत त्यांनी शेकडो लढाया लढल्या आणि एकही लढाई ते हरले नाहीत.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाची यशोगाथा पश्चिम भारत म्हणजेच महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यापासून दक्षिण भारतापर्यंत पसरली होती. छावा म्हणजे सिंहाचे पिल्लू, म्हणजेच बाळ सिंह. संभाजी एक पराक्रमी पुरुष होते. ते मातृभूमीचे खरे सुपुत्र होते. क्रूर मुघल सम्राट औरंगजेबही छावा म्हणजेच संभाजीच्या नावाला घाबरत असे.
औरंगजेब याने छत्रपती संभाजीराजे यांना कैद केले.औरंगजेबने संभाजेरांजेंवर धर्मांतर करण्यासाठी त्यांचे प्रचंड हाल केले. मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी औरंगजेबने त्यांच्यावर दबाव आणला. मात्र, शेवटपर्यंत संभाजीराजे औरंगजेबची अट मान्य केली. उलट तु मराठ्यांसोबत ये आम्ही तुला धर्मांतही करायला सांगणार नाही असे सांगितले. तब्बल 40 दिवस औरंगजेबने सभाजीराजेंना कैद करुन त्यांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. शेवटच्या श्वासापर्यंत संभाजी राजेंनी औरंगजेबला स्वराज्य खिळखिळे करु दिले नाही. यामुळेच मराठा साम्राज्य काबीज करण्याची औरंगजेबाची इच्छा त्याच्या हयातीत काय त्याच्यानंतरही कधीच पूर्ण होऊ शकली नाही.

































