ठाकरे कुटुंबाचे अत्यंत विश्वासून आणि निष्ठावान नेते मानले जाणारे सचिन अहिर यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर सचिन अहिर यांना थेट विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी विराजमान केले जाणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. एकीकडे ठाकरे गटाने या बंडखोरीवर संताप व्यक्त करत अहिर यांच्यावर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. मात्र, कायदेतज्ज्ञांच्या मते सचिन अहिर यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई करणे जवळपास अशक्य आहे. शिंदे गटात जाऊनही सचिन अहिर यांनी “मी पक्ष सोडलेलाच नाही,” असे खळबळजनक विधान केले आहे. त्यांच्या या विधानाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भक्कम कायदेशीर आधार देत समर्थन दिले आहे. शिंदे यांनी स्पष्ट केले की, “सचिन अहिर २०२२ मध्ये जेव्हा विधानपरिषदेवर निवडून गेले, तेव्हा त्यांना आमच्याच आमदारांनी मतदान केले होते. ते अधिकृत शिवसेनेकडून आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हावरच विजयी झाले होते. आजघडीला निवडणूक आयोगाच्या निकालानुसार शिवसेना हा मूळ पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह आमच्याकडेच आहे. त्यामुळे अहिर मूळ पक्षातच असल्याने त्यांच्या अपात्रतेचा प्रश्नच उद्भवत नाही.” पक्षांतर बंदी कायद्यातून सचिन अहिर कसे बचावणार? ॲड. असीम सरोदे यांनी यामागील कायदेशीर पेच आणि अहिर यांना मिळणारे संरक्षण सविस्तरपणे स्पष्ट केले आहे. सचिन अहिर यांना विधानपरिषदेचे उपसभापतीपद दिले जाणार आहे, आणि हीच बाब त्यांना कायदेशीरदृष्ट्या सर्वात मोठे संरक्षण देणारी ठरणार आहे. ॲड. असीम सरोदे यांच्या मते, सचिन अहिर हे उपसभापतीपदी विराजमान झाल्यास त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत अपात्रतेची कारवाई होऊच शकत नाही. संविधानातील तरतूद काय सांगते? भारतीय संविधानाच्या दहाव्या अनुसूचीतील (पक्षांतर बंदी कायदा) परिच्छेद ५ नुसार काही विशिष्ट घटनात्मक पदांवर असलेल्या व्यक्तींना पक्षांतराच्या कारवाईतून विशेष सूट देण्यात आली आहे. या तरतुदीनुसार लोकसभा अध्यक्ष व उपाध्यक्ष, राज्यसभा उपसभापती, राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष आणि विधानपरिषदेचे सभापती व उपसभापती या घटनात्मक पदांवरील व्यक्तींना या कायद्यातून वगळण्यात आले आहे. या कायदेशीर तरतुदीमुळे, सचिन अहिर हे जरी एकटे आमदार म्हणून शिंदे गटात गेले असले, तरी उपसभापती पद स्वीकारताच त्यांना अपात्रतेच्या कारवाईपासून पूर्णपणे संरक्षण मिळेल. ठाकरे गटाची मोठी कोंडी शिंदे गटाची ही खेळी ठाकरे गटासाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे. एकीकडे मूळ पक्ष आणि चिन्हावरील हक्क शिंदे गटाकडे असल्याने तांत्रिकदृष्ट्या पक्षांतराचा मुद्दा कमकुवत ठरतो आणि दुसरीकडे उपसभापती पदामुळे संविधानाचे संरक्षण मिळते. या दुहेरी कोंडीमुळे ठाकरे गट कायदेशीर लढाईत कशी पावले उचलणार आणि महाराष्ट्राच्या राजकारणात हा नवा अध्याय कोणती वळणे घेणार, हे पाहणे आता अत्यंत औत्सुक्याचे ठरणार आहे.
Source link
एकट्याने पक्ष सोडूनही सचिन अहिर एकदम सेफ!:अपात्रतेची कारवाई होणार नाही; जाणून घ्या कायदेशीर बाजू, असीम सरोदे यांनी सांगितले कारण
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
वॉशिंग मशीन बाल्कनीमध्ये ठेवणे योग्य आहे का?:जाणून घ्या देखभाल टिप्स, 12 खबरदारी, किती दिवसांनी...
वॉशिंग मशीन आज जवळपास प्रत्येक घराची गरज बनली आहे. बहुतेक घरांमध्ये ती तुम्हाला बाल्कनीमध्ये ठेवलेली दिसेल. लोक जागा वाचवण्यासाठी असे करतात. हे सोयीचे...
‘आवारापन 2’ चा टीझर प्रदर्शित:चित्रपट 14 ऑगस्ट रोजी जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित होईल
सुमारे दोन दशकांच्या प्रतीक्षेनंतर, इम्रान हाश्मी अभिनित 'आवारापन 2' या चित्रपटाने अखेर आपली पहिली झलक प्रेक्षकांसमोर सादर केली आहे. कल्ट चित्रपट 'आवारापन'चा वारसा...
Bajaj Pulsar N125 भारतात बंद
नवी दिल्ली1 दिवसापूर्वीलिंक कॉपी कराबजाज ऑटोने भारतात आपली पल्सर N125 बाईक बंद केली आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये लॉन्च झालेली ही बाईक भारतीय बाजारात...
ऑस्ट्रेलिया टेक दिग्गजांना किशोरवयीन सोशल मीडिया कायद्याच्या उल्लंघनासाठी मोठा दंड सहन करावा लागतो
व्हिक्टोरिया किम.द न्यूयॉर्क टाइम्स1 तासापूर्वीलिंक कॉपी कराऑस्ट्रेलिया 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियापासून दूर ठेवण्यासाठी आपला कायदा अधिक कठोर करण्याच्या तयारीत आहे.किशोरवयीन मुलांसाठी प्रमुख...
वॉशिंग मशीन बाल्कनीमध्ये ठेवणे योग्य आहे का?:जाणून घ्या देखभाल टिप्स, 12 खबरदारी, किती दिवसांनी...
वॉशिंग मशीन आज जवळपास प्रत्येक घराची गरज बनली आहे. बहुतेक घरांमध्ये ती तुम्हाला बाल्कनीमध्ये ठेवलेली दिसेल. लोक जागा वाचवण्यासाठी असे करतात. हे सोयीचे...
‘आवारापन 2’ चा टीझर प्रदर्शित:चित्रपट 14 ऑगस्ट रोजी जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित होईल
सुमारे दोन दशकांच्या प्रतीक्षेनंतर, इम्रान हाश्मी अभिनित 'आवारापन 2' या चित्रपटाने अखेर आपली पहिली झलक प्रेक्षकांसमोर सादर केली आहे. कल्ट चित्रपट 'आवारापन'चा वारसा...
Bajaj Pulsar N125 भारतात बंद
नवी दिल्ली1 दिवसापूर्वीलिंक कॉपी कराबजाज ऑटोने भारतात आपली पल्सर N125 बाईक बंद केली आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये लॉन्च झालेली ही बाईक भारतीय बाजारात...
नोएल टाटा नोव्हेंबरमध्ये व्होल्टासच्या अध्यक्षपदावरून पायउतार होतील:आज 72व्या एजीएममध्ये घोषणा; भागधारकांना सांगितले- ही माझी...
नोएल टाटा या वर्षी नोव्हेंबरमध्ये 70 वर्षांचे झाल्यानंतर व्होल्टासच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देतील. मंगळवारी कंपनीच्या 72व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) त्यांनी स्वतः भागधारकांना ही...





























