Homeमहाराष्ट्रडिझेलसाठी पर्याय म्हणून सीएनजी एलएनजी वापरण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग 235 कोटी...

डिझेलसाठी पर्याय म्हणून सीएनजी एलएनजी वापरण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग 235 कोटी एसटीची बचत करेल


सेंट 235 कोटी रुपयांची बचत करेल: मुंबई एसटी महामंडळ दरवर्षी पाच हजार याप्रमाणे पुढील पाच वर्षांत 25 हजार बसेस घेणार आहे. यापैकी चालू आर्थिक वर्षापासून पुढील चार वर्षांत 20 हजार बसेस खरेदी केल्या जाणार असून या सर्व बसेस पर्यावरणपूरक अशा सीएनजी आणि एलएनजीसारख्या इंधनाबरोबरच डिझेल इंधन हायब्रिड करून चालणाऱ्या असतील. डिझेल इंधनाचा वापर केवळ आपत्कालीन परिस्थितीत करण्याचं नियोजन आहे. पर्यावरणपूरक इंधनाच्या संदर्भात एसटी अधिकारी आणि संबंधित इंधन पुरवठादार संस्थांच्या प्रतिनिधींसोबत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी बैठक घेतली. यावेळी इंधन वापराचा आढावा घेण्यात आला.

दररोज 10 लाख 70 हजार लिटर डिझेल लागते

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये एसटीच्या बहुतेक सर्व बसेस डिझेल इंधनावर चालणाऱ्या आहेत अशी माहिती समोर आली. महामंडळाच्या एकूण खर्चापैकी सुमारे 34 टक्के खर्च हा इंधनावर होतो. महामंडळाला दररोज सुमारे 10 लाख 70 हजार लिटर इतके डिझेल लागते. परिणामी वर्षाला सुमारे 34 हजार कोटी रुपयांचा खर्च इंधनावर होतो, अशी माहिती यावेळी परिहवमंत्र्यांना अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

…म्हणून पर्यायी इंधनाची गरज

भविष्यात डिझेल इंधनाची उपलब्धता आणि त्याच्या दरात वारंवार होणारा बदल लक्षात घेता पर्यायी इंधन वापरणे आवश्यक आहे. सीएनजी आणि एलएनजी हे पर्यायी इंधन प्रकार तुलनेने डिझेलपेक्षा स्वस्त असून पर्यावरणपूरकदेखील आहेत, या अनुषंगाने बैठकीमध्ये चर्चा झाली.

नव्या इंधनाची कार्यक्षमता चांगली

डिझेलपेक्षा सीएनजी, एलएनजी इंधनाची कार्यक्षमता चांगली असल्याने बस प्रतिलिटर पाच ते साडेपाच किलोमीटर अंतर कापते. सहाजिकच एलएनजी आणि सीएनजी इंधन वापरल्यास इंधनावरील खर्चात बचत होऊन प्रदूषण कमी होण्यास मदत होणार असल्याने पुढील वर्षीपासून नव्या 20 हजार बसेसच्या खरेदीला सुरुवात होणार आहे.

90 ठिकाणी एलएनजीचे पंप उभारले जाणार

दरम्यान, राज्यभरात 90 ठिकाणी एलएनजीचे पंप उभारले जाणार आहेत. तसेच महानगर गॅस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून सीएनजीचे 20 पंप उभारण्यात येणार आहेत.  सर्व नव्या बसेस या हायब्रिड इंधनावर चालणाऱ्या असतील, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

235 कोटी रुपयांची बचत

एसटी महामंडळाने यापूर्वी किंग्ज गॅस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसोबत केलेल्या करारानुसार एलएनजी इंधन हे तत्कालीन डिझेल इंधनाच्या किमतीच्या 20 टक्के कमी दराने पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्याच्या खर्चात दरवर्षी 235 कोटी रुपयांची बचत होणार आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

इंडिगो फ्लाइटमध्ये मूल बेशुद्ध; सुरतमध्ये इमर्जन्सी लँडिंग

0
सुरत6 तासांपूर्वीलिंक कॉपी कराअहमदाबादहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या 6E-7018 विमानामध्ये सोमवारी संध्याकाळी 3 वर्षांचा एक मुलगा बेशुद्ध पडला. त्याची प्रकृती बिघडल्याने वैमानिकाने वैद्यकीय आणीबाणी...

डॉ. पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुलासाठी:श्री शिवाजी शिक्षण संस्थेने दिला मूळ प्रस्ताव

0
अमरावती येथे डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावाने शैक्षणिक संकुल उभारण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारने स्वीकारले आहे. या संकुलासाठीचा मूळ प्रस्ताव डॉ. पंजाबराव देशमुख यांनीच...

श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील अपहार प्रकरण; दोषींवर कठोर कारवाई करावी !

0
मंदिराच्या दानपेटीतील अर्पणातील अपहार, हे महापापच; मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांकडेच हवे ! - हिंदु जनजागृती समिती अयोध्येतील श्रीराममंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून ते जगभरातील...

IPL क्रिकेटर शशांक, त्यांच्या IPS वडिलांवर भोपाळमध्ये FIR:चांगले जेवण न बनवल्यामुळे कुकला मारहाण-शिवीगाळ केली,...

0
मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आयपीएल टीम पंजाब किंग्सचा फलंदाज शशांक सिंग आणि त्याचे वडील निवृत्त विशेष डीजी शैलेश सिंग आयपीएस यांच्यावर कुकला मारहाण आणि...
spot_img

भारतासह 4 महिला संघ ऑलिम्पिकसाठी थेट पात्र:क्रिकेटच्या पात्रता नियमांना मंजुरी, पुरुषांसाठी 2026 च्या रँकिंगमधून...

0
भारत, ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघांनी लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 च्या क्रिकेट स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळवली आहे. आयसीसी (ICC) आणि...

स्वच्छता, अन्न सुरक्षा आणि आरोग्य हॅक्स

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करापावसाळा उन्हाळ्यातून आराम देतो. पण पाऊस सुरू होताच खाण्यापिण्याशी आणि स्वच्छतेशी संबंधित अनेक आरोग्य समस्यांचा धोकाही वाढतो. पावसात आर्द्रता वाढल्यामुळे...

सैफ अली खान तैमूर आणि जेहला देवाच्या एकतेबद्दल शिकवतो

0
1 तासापूर्वीलिंक कॉपी कराबॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने त्याची पत्नी करीना कपूर आणि दोन्ही मुलं, तैमूर आणि जेह यांच्या संगोपनाबद्दल मोकळेपणाने सांगितले आहे....

एआय तुमचा सोबती; जाणून घ्या वापराचे 4 सोपे मार्ग:स्मार्टफोनमध्ये आधीपासून असलेल्या ॲप्समधून शिका एआयचा...

0
अनेक वृद्धांना वाटते की, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) फक्त नवीन पिढीसाठी आहे. पण सत्य याच्या उलट आहे. आता एआय वृद्धांसाठी उपयुक्त ठरू शकते. जर...
error: Content is protected !!