Homeमहाराष्ट्रPasha Patel Says Big opportunity for bamboo cultivation in Pune district ignored...

Pasha Patel Says Big opportunity for bamboo cultivation in Pune district ignored | पुणे जिल्ह्यात बांबू लागवडीची मोठी संधी दुर्लक्षित: भोर-वेल्हा वगळता इतर भागात लागवड नाही, येत्या वर्षी 1000 हेक्टरचे उद्दिष्ट – पाशा पटेल – Pune News

पुणे जिल्ह्यातील भोर आणि वेल्हा तालुक्यात बांबू लागवड लोकप्रिय असली तरी मोठी संधी असूनही उर्वरित पुणे जिल्ह्यात बांबू लागवड झालेली नाही, या पुढील काळात क्षेत्रीय स्तरावर कर्मचाऱ्यांना व्यक्तीशा टार्गेट देऊन पुणे जिल्ह्यात मराग्रारोहयो अंतर्गत बांबू ल

?

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत बांबू लागवड अभियान विषयक आढावा बैठक मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या बैठकीला उपजिल्हाधिकारी रोहयो डॉ. चारुशीला देशमुख-मोहीते, डॉ. कृपाण घोष, प्रमुख, अँग्रीमेट विभाग,के.सी.साई कृष्णन, प्रमुख, आयएमडी पुणे,डॉ.ओ.पी श्रिजीत, शास्रज्ञ , डॉ. एस.डी. सानप, शास्रज्ञ आरती बंडकर, शास्रज्ञ, नवनाथ अवताडे,उप‌प्रादेशिक अधिकारी म.प्र.निः मंडळ पुणे, आर. वाय. पाटील,कार्यकारी अभियंता, सा.बा.पुणे उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. चारुशीला देशमुख-मोहीते म्हणाल्या, 2024-25 साठी 300 हेक्टर उद्दिष्ट देण्यात आले होते. 2025-26 साठी 450 हेक्टर उद्दिष्ट देण्यात आले. एकूण पाच वर्षातील 3000 हेक्टर उद्दिष्ट पैकी २०२४-२५ मध्ये १३३.६ हेक्टर इतकी लागवड झाल्याचे सांगितले. तसेच यावर्षी सर्व यंत्रणांना मागील वर्षीचे शिल्लक उद्दिष्ट व या वर्षीचे उद्दिष्ट नुसार सर्व यंत्रणांना जास्तीच उद्दिष्ट वाटप करून प्रति ग्रामसेवक, कृषी सहाय्यक,आर एफ ओ व मृद व संधारण आणि जलसंपदा विभागाला उद्दिष्ट देऊन यावर्षी 1 हजार हेक्टरचे उद्दिष्ट साध्य करु असे सांगितले.

यावेळी बोलताना पाशा पटेल म्हणाले, पुणे जिल्ह्यामध्ये क्षमता असूनही बांबू लागवडी मध्ये दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. वातावरण बदलाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. इस्रायलमधील तेल अविव आणि अमेरीकेत कैलिफोर्निया आग लागली. 2024 हे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले असून एकंदरीतच वातावरण बदलाच्या संकटामुळे मानवजातीसमोरचे सगळे मार्ग खुंटले आहेत.

कार्बन इमिशन (उत्सर्जन) दिवसेंदिवस वाढत असल्याचे सांगत ते म्हणाले, 2050 पर्यंत समुद्र किनारी असणारे देश आणि शहरे यांना धोका आहेत. कोळसा आधारित औष्णीक प्रकल्प बंद करावे लागणार आहेत. सर्वांनाच आता पर्यावरण पुरक वस्तु वापराव्यात लागणार आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. वेगाने वाढणारा बांबु एकमेव गवत वर्गीय वृक्ष असून बांबू बहु उपयोगी ठरत आहे.

भारतीय हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस.डी. सानप म्हणाले, ‘औद्योगिक विकासाने कार्बन उत्सर्जन वाढले आहे. पारंपारिक उर्जा स्रोत वापराने कार्बन इमिशन वाढले. त्यामुळे वातावरण बदल होऊन कृषी क्षेत्राला वातावरण बदलाचा मोठा फटका बसत आहे.तापमानातील वाढ, कमी कालावधीत जास्त पाऊस, ढगफुटी, वादळे घटक शेती बरोबरच आरोग्य वनक्षेत्र आणि जलसंधारण या विभागांना प्रभावित करत असल्याचे कडे त्यांनी लक्ष वेधले.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

डॉ. पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुलासाठी:श्री शिवाजी शिक्षण संस्थेने दिला मूळ प्रस्ताव

0
अमरावती येथे डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावाने शैक्षणिक संकुल उभारण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारने स्वीकारले आहे. या संकुलासाठीचा मूळ प्रस्ताव डॉ. पंजाबराव देशमुख यांनीच...

श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील अपहार प्रकरण; दोषींवर कठोर कारवाई करावी !

0
मंदिराच्या दानपेटीतील अर्पणातील अपहार, हे महापापच; मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांकडेच हवे ! - हिंदु जनजागृती समिती अयोध्येतील श्रीराममंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून ते जगभरातील...

IPL क्रिकेटर शशांक, त्यांच्या IPS वडिलांवर भोपाळमध्ये FIR:चांगले जेवण न बनवल्यामुळे कुकला मारहाण-शिवीगाळ केली,...

0
मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आयपीएल टीम पंजाब किंग्सचा फलंदाज शशांक सिंग आणि त्याचे वडील निवृत्त विशेष डीजी शैलेश सिंग आयपीएस यांच्यावर कुकला मारहाण आणि...

पुरीमध्ये भगवान जगन्नाथ 15 दिवस आजारी राहतील:आज सोन्याच्या विहिरीतून 108 घागरी पवित्र जल आणणार,...

0
ओडिशातील जगन्नाथ मंदिरात सोमवारी देवस्नान पौर्णिमा साजरी केली जाईल. विश्वप्रसिद्ध रथयात्रेपूर्वी साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात भगवान जगन्नाथ, देवी सुभद्रा आणि भगवान बलभद्र यांना...
spot_img

भारतासह 4 महिला संघ ऑलिम्पिकसाठी थेट पात्र:क्रिकेटच्या पात्रता नियमांना मंजुरी, पुरुषांसाठी 2026 च्या रँकिंगमधून...

0
भारत, ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघांनी लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 च्या क्रिकेट स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळवली आहे. आयसीसी (ICC) आणि...

स्वच्छता, अन्न सुरक्षा आणि आरोग्य हॅक्स

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करापावसाळा उन्हाळ्यातून आराम देतो. पण पाऊस सुरू होताच खाण्यापिण्याशी आणि स्वच्छतेशी संबंधित अनेक आरोग्य समस्यांचा धोकाही वाढतो. पावसात आर्द्रता वाढल्यामुळे...

सैफ अली खान तैमूर आणि जेहला देवाच्या एकतेबद्दल शिकवतो

0
1 तासापूर्वीलिंक कॉपी कराबॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने त्याची पत्नी करीना कपूर आणि दोन्ही मुलं, तैमूर आणि जेह यांच्या संगोपनाबद्दल मोकळेपणाने सांगितले आहे....

एआय तुमचा सोबती; जाणून घ्या वापराचे 4 सोपे मार्ग:स्मार्टफोनमध्ये आधीपासून असलेल्या ॲप्समधून शिका एआयचा...

0
अनेक वृद्धांना वाटते की, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) फक्त नवीन पिढीसाठी आहे. पण सत्य याच्या उलट आहे. आता एआय वृद्धांसाठी उपयुक्त ठरू शकते. जर...
error: Content is protected !!