Homeदेश-विदेशमोठी बातमी! भारत आणि पाकिस्तान शस्त्रसंधीला तयार, 'पण 12 मे रोजी दुपारी...

मोठी बातमी! भारत आणि पाकिस्तान शस्त्रसंधीला तयार, ‘पण 12 मे रोजी दुपारी 12 वाजता पुन्हा एकदा…’


इंडिया पाकिस्टा सीसफायर: भारत आणि पाकिस्तानमध्ये आता युद्धबंदी आहे, अशी माहिती देताना परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दिली आहे. ते म्हणाले की, आज दुपारी 3.35 वाजता दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये चर्चा झाली. दोन्ही देशांनी संध्याकाळी 5 वाजल्यापासून हवेत, पाण्यातून आणि जमिनीवरून होणारे हल्ले तात्काळ थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आज दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी जाहीर करण्यात आली आहे. पण 12 मे रोजी दुपारी 12 वाजता  दोन्ही देशांचे लष्करी ऑपरेशन्स महासंचालक पुन्हा चर्चा करणार आहेत, असे मिस्री म्हणाले.

https://www.youtube.com/watch?v=kg16_pku7h4

https://www.youtube.com/watch?v=e4iyy5df6ucg

भारत आणि पाकिस्तानने आज गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याबाबत एक सामंजस्य करार केला आहे. भारताने सर्व प्रकारच्या आणि प्रकटीकरणातील दहशतवादाविरुद्ध सातत्याने ठाम आणि तडजोड न करणारी भूमिका कायम ठेवली आहे. ती पुढेही कायम राहील. दरम्यान भारत – पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं की, “अमेरिकेने मध्यस्थी केल्याने रात्रभर झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर, मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. कॉमन सेन्स आणि आपल्या हुशारीचा वापर केल्याबद्दल दोन्ही देशांचे अभिनंदन. या प्रकरणाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद,” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

त्यानंतर त्याला पाकिस्तान परराष्ट्रमंत्री इशक डार यांनी दुजोरा दिला आहे.

या घोषणेनंतर भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषद घेत भारताचा भूमिकेबद्दल सांगितलं. आज दुपारी 3.35 वाजता दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये चर्चा झाली. दोन्ही देशांनी संध्याकाळी 5 वाजल्यापासून हवेत, पाण्यातून आणि जमिनीवरून होणारे हल्ले तात्काळ थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आज दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी जाहीर करण्यात आली आहे. पण 12 मे रोजी दुपारी 12 वाजता  दोन्ही देशांचे लष्करी ऑपरेशन्स महासंचालक पुन्हा चर्चा करणार आहेत, असे ते म्हणाले. त्यांनी हेही स्पष्ट केलं की, भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबलण्याची चर्चा दोन्ही देशांमध्ये झाली आहे.

भारत आणि पाकिस्तानमध्ये अचानक घोषित झालेल्या युद्धबंदीमागे एक मोठे राजनैतिक कारण आहे, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या अमेरिकन समकक्षांसोबत सतत चर्चेत होते. या चर्चेचा उद्देश सीमेवरील वाढता तणाव संपवणे आणि शांततापूर्ण तोडगा काढणे हा होता.

22 एप्रिल 2025 ला जम्मू – काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात 27 पुरुषांचे प्राण गेले होते.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!