Homeमहाराष्ट्रEknath Shinde Criticized Uddhav Thackeray Europe Tour | Maharashtra Politics | नेते...

Eknath Shinde Criticized Uddhav Thackeray Europe Tour | Maharashtra Politics | नेते युरोपात अन् कार्यकर्ते कोमात: एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले – कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो – Mumbai News

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा सत्ताधारी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. सद्यस्थितीत उबाठाची अवस्था नेते युरोपात आणि कार्यकर्ते कोमात अशी झाल्

?

उद्धव ठाकरे काही दिवसांपूर्वी सुट्ट्या घालवण्यासाठी परदेशात गेले होते. ते नुकतेच परतलेत. त्यांच्या या परदेश दौऱ्यावरून एकनाथ शिंदे यांनी अमरावती येथे आयोजित शिवसैनिकांच्या मेळाव्यात त्यांच्यावर निशाणा साधला आहे. या मेळाव्यात ठाकरे गटाच्या अनेक स्थानिक नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी बोलताना शिंदे ठाकरेंवर टीका करत म्हणाले, वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सांगायचे कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो. त्याप्रमाणे शिवसेनेचे कार्यकर्ते लोकांच्या दारात काम करत आहेत. लोक काम करणाऱ्याला निवडून देतात, घरात बसणाऱ्याला नाही. मात्र आता नेते युरोपात आणि कार्यकर्ते कोमात, अशी उबाठाची अवस्था झाली आहे.

काही लोक घराबाहेर पडले तर थेट परदेशात जातात

माजी आमदार दिवंगत संजय बंड हे सच्चे शिवसैनिक होते. पण त्यांना काय मिळाले. एखाद्या कार्यकर्त्याला धुळीस कसे मिळवायचे याचे क्लासेस लावायचे असतील, तर मुंबईतील बांद्रा येथे त्याचे एकच ठिकाण आहे. आमची कुठेही शाखा नाही. आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जात आहोत. आम्ही शासन आपल्या दारी ही योजना घेऊन आलो. 5 कोटी लोकांनी त्याचा लाभ घेतला. पण काही लोक घराच्या बाहेरच पडत नाही आणि पडले तर थेट परदेशात जातात, असेही ते यावेळी उद्धव यांना उपरोधिक टोला हाणताना म्हणाले.

मोदी पाकचे नामोनिशाण मिटवून टाकतील

एकनाथ शिंदे यांनी यावेळी भारत-पाक तणावावरही भाष्य केले. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी एअर स्ट्राईक करत पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले. मात्र त्यानंतरही भारतीय हद्दीत क्षेपणास्त्रे डागून आगळीक करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केल्यास त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल. भारतीय सैन्यदल त्यांना असे प्रत्युत्तर देईल की पाकिस्तानचा नामोनिशाण जगाच्या नकाशावरून पुसला जाईल, असे ते म्हणाले.

हे ही वाचा…



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

चंपत राय राजीनाम्याच्या तिसऱ्या दिवशी दिल्लीत:RSS राम मंदिर देणगी चोरीचा तयार करत आहे अहवाल

0
श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टमधून राजीनामा दिल्यानंतर, चंपत राय रविवारी संध्याकाळी अयोध्येहून दिल्लीसाठी रवाना झाले. ते दुपारी तीन वाजेपर्यंत राम मंदिरातच होते. सूत्रांनी...

ज्येष्ठ पौर्णिमा 2026: विष्णु-महालक्ष्मी अभिषेक, पितृपूजा

0
3 तासांपूर्वीलिंक कॉपी कराआज (२९ जून) ज्येष्ठ महिन्याची शेवटची तिथी म्हणजेच पौर्णिमा आहे. या वेळी अधिकमासामुळे ज्येष्ठ महिना ५९ दिवसांचा होता. याच पौर्णिमेला...

बेन स्टोक्सची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती:2019 विश्वचषक, 2022 टी-20 वर्ल्डकपचा हिरो; नाइट क्लब वादामुळे कारकीर्द...

0
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेला तिसरा कसोटी सामना त्याचा शेवटचा सामना असेल. त्याच्या निवृत्तीची घोषणा...

दिव्य मराठी मुलाखत‎:पिण्याच्या पाण्याचा मुद्दा संवेदनशीलपणे हाताळणार, जिल्हा परिषद सीईओ अनय नावंदर यांची ग्वाही

0
जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नव्याने रुजू झालेले भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी अनय नावंदर यांनी "दिव्य मराठी’शी संवाद साधला. शिक्षकांच्या प्रशिक्षणासह अन्य माध्यमांतून...
spot_img

बेन स्टोक्सची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती:2019 विश्वचषक, 2022 टी-20 वर्ल्डकपचा हिरो; नाइट क्लब वादामुळे कारकीर्द...

0
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेला तिसरा कसोटी सामना त्याचा शेवटचा सामना असेल. त्याच्या निवृत्तीची घोषणा...

भारताची पाचवी विकेट पडली, स्कोअर 85/5:जय मुंद्राने तीन बळी घेतले; आयर्लंडने दिले 155 धावांचे...

0
दुसऱ्या टी२० सामन्यात आयर्लंडने भारतासमोर १५५ धावांचे लक्ष्य ठेवले. हॅरी टेक्टरच्या अर्धशतकाच्या (५३) जोरावर संघाने २० षटकांत १५४ धावा केल्या. सामन्याचे स्कोअरकार्ड… प्लेइंग-११...

मुलाला कोचिंगमध्ये प्रवेश द्यायचा आहे:कोचिंग सेंटरमध्ये दाखल करण्यापूर्वी हे 10 प्रश्न विचारा, प्रत्येक पालकांसाठी...

0
सर्व पालकांना असे वाटते की, त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या चांगल्या संधी मिळाव्यात. चांगले कोचिंग मिळावे, जेणेकरून ते उत्तम करिअर घडवू शकतील. त्यामुळे चांगले कोचिंग...

रावणाची लंका अन् अशोक वाटिका आता कशी दिसते?:अभिनेता प्रदीप काबरा यांनी श्रीलंकेतून शेअर केली...

0
अभिनेता प्रदीप काबरा नुकतेच श्रीलंका दौऱ्यावर गेले होते, जिथे त्यांनी 'रामायण'शी संबंधित मानल्या जाणाऱ्या स्थळांची झलक शेअर केली. त्यांनी रावणाची लंका, अशोक वाटिका,...
error: Content is protected !!