Homeमहाराष्ट्रजम्मू राजस्थानमधील पाकिस्तान ड्रोन अटॅक इंडियन आर्मीने व्हिडिओ पुरावा सामायिक केला

जम्मू राजस्थानमधील पाकिस्तान ड्रोन अटॅक इंडियन आर्मीने व्हिडिओ पुरावा सामायिक केला


Indian Army Shares Video: ८ मे रोजी मध्यरात्री पाकिस्तानकडून भारतीय हद्दीत जवळपास ५० ड्रोन डागण्यात आल्याचं समोर आलं आहे. भारताच्या S-400 सुदर्शन या एअर डिफेन्स सिस्टीमच्या मदतीने भारतानं पाकिस्तानचे हे सर्व ड्रोन हल्ले निष्प्रभ केले असून भारतीय हद्दीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. एकीकडे पाकिस्तानच्या बाजूने या ड्रोन हल्ले झाल्याचं प्रत्यक्ष स्थानिकांनीही पाहिल्यानंतरही पाकिस्तानने मात्र आपण काहीही केलं नसल्याचा कांगावा केला. यानंतर मात्र भारतीय लष्करानं थेट पुरावाच दिला असून पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांचा व्हिडीओ शेअर केला आहे.

काय घडलं ८ मेच्या मध्यरात्री?

गुरुवारी ८ मेच्या मध्यरात्री पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणावर भारतातली १५ शहरांवर ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न करण्यात आला. जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात या राज्यांमधील सीमेवरच्या भागांमधली ही ठिकाणं असून त्याला भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं आहे. एस ४०० सुदर्शन या भारताच्या अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टीमच्या मदतीने पाकिस्तानचे सर्व ड्रोन भारतानं पाडले आहेत. या कारवाईदरम्यान सुरक्षेचा उपाय म्हणून सीमेवरच्या जिल्ह्यांमध्ये पूर्ण ब्लॅकआऊट पाळण्यात आला.

पाकिस्तानच्या या आगळिकीनंतर भारतानं पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत ठणकावलं आहे. पाकिस्ताननं जर ही आगळीक थांबवली नाही, तर भारतही थांबणार नाही, अगदी शेवटपर्यंत प्रत्युत्तर दिलं जाईल, असा सज्जड दमच भारतानं पाकिस्तानला दिल्याचं इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावरून अनेक देशांनी भारताच्या समर्थनार्थ भूमिका घेतली असून पाकिस्तानला माघार घेण्याचा सल्ला दिला आहे.

भारतानं दिला पुरावा, पाकिस्तानचा दावा खोटा!

दरम्यान, पाकिस्तानं भारतातील ड्रोन हल्ल्यांशी आपला काहीही संबंध नसल्याचा कांगावा पाकिस्ताननं केल्यानंतर भारतीय लष्करानं पुरावाच सादर केला आहे. भारतीय लष्कराच्या अधिकृत एक्स हँडलवर यासंदर्भातली माहिती देण्यात आली असून ड्रोन हल्ल्याचा एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे.

“ऑपरेशन सिंदूर… पाकिस्तानी लष्करानं ८ आणि ९ मेदरम्यानच्या रात्री भारताच्या संपूर्ण पश्चिमेकडील सीमेलगत वेगवेगळ्या ठिकाणी ड्रोन आणि इतर दारुगोळ्याचा वापर करून हल्ला केला. जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ (LOC) पाकिस्तानी लष्करानं अनेक ठिकाणी शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. पाकिस्तानच्या या ड्रोन हल्ल्यांना भारताकडून यशस्वीरीत्या निष्प्रभ करण्यात आलं असून शस्त्रसंधी उल्लंघनालाही सडेतोड उत्तर देण्यात आलं आहे”, असं भारतीय लष्करानं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

“भारताचं सार्वभौमत्व आणि भौगौलिक एकतेचं संरक्षण करण्यासाठी भारतीय लष्कर बांधील आहे. त्यावर आक्रमण करणाऱ्या कोणत्याही आततायी कृतीला संपूर्ण ताकदीनिशी उत्तर दिलं जाईल”, असा इशाराही भारतीय लष्करानं पाकिस्तानला दिला आहे.

हेही वाचा

Video मध्ये काय आहे?

लष्करानं शेअर केलेल्या व्हिडीओ क्लिपमध्ये एक ड्रोन हवेतच उद्ध्वस्त झाल्याचं दिसत आहे. लष्कराच्या विशेष कॅमेऱ्यात टिपलेली ही दृश्य पाकिस्तानच्या कांगाव्यातला फोलपणा स्पष्ट करण्यासाठी पुरेशी ठरली असून आता पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय स्तरावरूनदेखील शांततेसाठी माघार घेण्यासाठी दबाव येऊ लागला आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

चंपत राय राजीनाम्याच्या तिसऱ्या दिवशी दिल्लीत:RSS राम मंदिर देणगी चोरीचा तयार करत आहे अहवाल

0
श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टमधून राजीनामा दिल्यानंतर, चंपत राय रविवारी संध्याकाळी अयोध्येहून दिल्लीसाठी रवाना झाले. ते दुपारी तीन वाजेपर्यंत राम मंदिरातच होते. सूत्रांनी...

ज्येष्ठ पौर्णिमा 2026: विष्णु-महालक्ष्मी अभिषेक, पितृपूजा

0
3 तासांपूर्वीलिंक कॉपी कराआज (२९ जून) ज्येष्ठ महिन्याची शेवटची तिथी म्हणजेच पौर्णिमा आहे. या वेळी अधिकमासामुळे ज्येष्ठ महिना ५९ दिवसांचा होता. याच पौर्णिमेला...

बेन स्टोक्सची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती:2019 विश्वचषक, 2022 टी-20 वर्ल्डकपचा हिरो; नाइट क्लब वादामुळे कारकीर्द...

0
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेला तिसरा कसोटी सामना त्याचा शेवटचा सामना असेल. त्याच्या निवृत्तीची घोषणा...

दिव्य मराठी मुलाखत‎:पिण्याच्या पाण्याचा मुद्दा संवेदनशीलपणे हाताळणार, जिल्हा परिषद सीईओ अनय नावंदर यांची ग्वाही

0
जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नव्याने रुजू झालेले भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी अनय नावंदर यांनी "दिव्य मराठी’शी संवाद साधला. शिक्षकांच्या प्रशिक्षणासह अन्य माध्यमांतून...
spot_img

बेन स्टोक्सची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती:2019 विश्वचषक, 2022 टी-20 वर्ल्डकपचा हिरो; नाइट क्लब वादामुळे कारकीर्द...

0
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेला तिसरा कसोटी सामना त्याचा शेवटचा सामना असेल. त्याच्या निवृत्तीची घोषणा...

भारताची पाचवी विकेट पडली, स्कोअर 85/5:जय मुंद्राने तीन बळी घेतले; आयर्लंडने दिले 155 धावांचे...

0
दुसऱ्या टी२० सामन्यात आयर्लंडने भारतासमोर १५५ धावांचे लक्ष्य ठेवले. हॅरी टेक्टरच्या अर्धशतकाच्या (५३) जोरावर संघाने २० षटकांत १५४ धावा केल्या. सामन्याचे स्कोअरकार्ड… प्लेइंग-११...

मुलाला कोचिंगमध्ये प्रवेश द्यायचा आहे:कोचिंग सेंटरमध्ये दाखल करण्यापूर्वी हे 10 प्रश्न विचारा, प्रत्येक पालकांसाठी...

0
सर्व पालकांना असे वाटते की, त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या चांगल्या संधी मिळाव्यात. चांगले कोचिंग मिळावे, जेणेकरून ते उत्तम करिअर घडवू शकतील. त्यामुळे चांगले कोचिंग...

रावणाची लंका अन् अशोक वाटिका आता कशी दिसते?:अभिनेता प्रदीप काबरा यांनी श्रीलंकेतून शेअर केली...

0
अभिनेता प्रदीप काबरा नुकतेच श्रीलंका दौऱ्यावर गेले होते, जिथे त्यांनी 'रामायण'शी संबंधित मानल्या जाणाऱ्या स्थळांची झलक शेअर केली. त्यांनी रावणाची लंका, अशोक वाटिका,...
error: Content is protected !!