काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज नव्याने निवडणूक आयोगावर निशाणा साधत हायड्रोजन बॉम्ब फोडला. राहुल गांधी यांनी ‘H फाइल्स’ प्रेझेंटेशनमध्ये ब्राझीलमधील मॉडेलच्या उल्लेख करत तिने 22 वेळा मतदान केल्याचा दावा केला. हरियाणात या मॉडेलने नाव बदलून 22 वळा मतदान केलं. कधी सीमा, कधी स्विटी कर कधी सरस्वती बनून मतदान केलं असं राहुल गांधी म्हणाले. या मॉडेलचं नाव Matheus Ferroro असल्याचं काँग्रेस आणि राहुल गांधींकडून सांगितलं जात आहे. नेमकी ही Matheus Ferroro कोण आहे जाणून घ्या…
राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत जिचा उल्लेख केला ती ब्राझीलमधील एक मॉडेल असल्याचं बोललं जात आहे. पण तपासणी करण्यात आली असता, या महिलेचं नाव Matheus Ferroro नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
ब्राझीलमधील या मॉडेलचं नाव Matheus Ferroro असल्याचा दावा होत आहे. पण राहुल गांधी पत्रकार परिषदेत फोटोसह उल्लेख केलेल्या या महिलेचं नाव Matheus Ferroro नाही. याउलट या मॉडेलचा फोटो ज्या फोटोग्राफरने क्लिक केला आहे त्याचं नाव Matheus Ferroro आहे. हा फोटो Unsplash, Pexels वर फोटोग्राफरच्या प्रोफाइलवर दिसत आहे.

हा फोटो रॉयल्ट्री फ्री इमेज एजन्सीवर उपलब्ध आहे. जो अनेक युट्यूब व्हिडीओ, ऑनलाइन ई-कॉर्मसवर प्रोडक्टसह वापरण्यात आला आहे.

काँग्रेसने मॉडेलचं नाव Matheus Ferroro असल्याचं सांगितलं
काँग्रेस केरळने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “ब्राझीलची नागरिक मॅथ्यूज फरोरोने हरियाणात स्विटीपासून ते सरस्वतीपर्यंत 22 नावांनी मतदान केलं. या आश्चर्याला @ECISVEEP! हरियाणा निवडणुकीत घोळ झाल्याचे आणखी पुरावे हवेत का?”.
पत्रकार परिषदेपूर्वी काँग्रेसने त्यांच्या ट्विटर अकाउंटवर “हायड्रोजन बॉम्ब लोडिंग” अशी पोस्ट केली होती, म्हणजेच काहीतरी मोठा खुलासा होणार आहे असं त्यांनी सूचित केलं होतं. काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत “एच फाइल्स” नावाने सादरीकरण सादर केले, ज्यामध्ये त्यांनी मतचोरीचा मुद्दा उपस्थित केला.
राहुल म्हणाले की हरियाणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्र सारख्या राज्यांमधून निवडणूक अनियमिततेच्या असंख्य तक्रारी आल्या आहेत. मतदान करण्यासाठी वापरलेला फोटो प्रत्यक्षात ब्राझिलियन मॉडेलचा फोटो होता हे देखील त्यांनी निदर्शनास आणून दिले. राहुल गांधींनी केंद्रीय निवडणूक आयोगावर (ECI) बनावट मतदार न काढल्याचा थेट आरोप केला. त्यांनी असे म्हटले की जर त्यांनी असे केले तर निवडणूक निष्पक्ष होईल, परंतु निवडणूक आयोगाला निष्पक्ष निवडणूक नको आहे. ते म्हणाले की भाजप काय करत आहे याचा हा स्पष्ट पुरावा आहे.
































