Homeदेश-विदेशकिरकोळ वादातून भीषण अपघातात 14 जणांचा मृत्यू; जयपूरमध्ये डंपर चालकाचा रक्तरंजित थरार

किरकोळ वादातून भीषण अपघातात 14 जणांचा मृत्यू; जयपूरमध्ये डंपर चालकाचा रक्तरंजित थरार


सोमवारी दुपारी जयपूरच्या हरमारा परिसरात एका भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने रस्त्यावर प्रचंड कहर केला. डंपर समोरून येणाऱ्या अनेक वाहनांना धडक दिली. ज्यामध्ये 14 जणांचा मृत्यू आणि 10 जण जखमी झाले. डंपर इतका वेगाने जात होता की, चालकाला ब्रेक लावता आला नाही. मिळालेल्या माहितीनुसार डंपरचे ब्रेक निकामी झाले होते. अर्ध्या किलोमीटर ते अनेक किलोमीटर अंतरावर तो वाहने आणि पादचाऱ्यांना चिरडत गेला. डंपर रोड क्रमांक 14 पासून लोहा मंडी पेट्रोल पंपाकडे वेगाने जात असताना वाटेतील अनेक वाहनांना धडकत होता. जखमींवर एसएमएस हॉस्पिटलच्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत आणि अनेकांची प्रकृती गंभीर आहे. तर मृत्यूच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातापूर्वी डंपर चालकाचा पेट्रोल पंपाबाहेर कार चालकाशी वाद घातला होता. वादानंतर, मद्यधुंद अवस्थेतील चालकाने संतापून डंपर वेगाने चालवण्यास सुरुवात केली. रस्त्याच्या चुकीच्या बाजूला गाडी चालवत त्याने पहिल्यांदा एका दुचाकीला धडक दिली. त्यानंतर दुचाकीस्वार त्याचा पाठलाग केला. घाबरून चालकाने डंपरचा वेग आणखी वाढवला, ज्यामुळे हा घातक अपघात झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहा मंडीजवळ हा भीषण अपघात घडला जेव्हा एका मद्यधुंद डंप ट्रक चालकाने किमान 17 वाहनांना धडक दिली. नंतर दुसऱ्या ट्रेलरला धडक दिली आणि तो थांबला. हा अपघात इतका भीषण होता की डंप ट्रकने धडकलेल्यांचे मृतदेह रस्त्यावर पसरले होते. डंप ट्रकच्या चाकाखाली अनेक मोटारसायकली चिरडल्या गेल्या आणि अनेक कारचेही नुकसान झालंय.

प्रत्यक्षदर्शींनी हे दृश्य “नरसंहार” असल्याचे वर्णन केलं आहे. एका दुकानदाराने सांगितलं की, “आम्ही अपघातग्रस्त झालेल्या गाड्यांमधून एकामागून एक मृतदेह बाहेर काढताना प्रत्यक्ष पाहिले आहेत. काही आत अडकले होते, तर काही रस्त्यावर पडले होते. सर्वत्र गोंधळ, आक्रोश आणि रक्त पसरले होते.” घटनास्थळी उपस्थित असलेले अतिरिक्त पोलिस आयुक्त राजीव पचार म्हणाले की, डंपर चालक बेपर्वाईने गाडी चालवत होता. एका पाठोपाठ तो कारला धडक देत होता, त्यानंतर स्थानिकांनी त्याचा पाठलाग केला. त्यांच्या मते, त्याने डंपर जास्त वेगाने चालवला, ज्यामुळे रस्त्यावरील पादचाऱ्यांना आणि दुचाकीस्वारांना धडक बसली. दिल्ली-अजमेर महामार्गावर ट्रेलर ट्रक आणि कारला धडकल्यानंतर ट्रक थांबला असं त्यांनी सांगितलं.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

‘ताजमहाल तेजोमहालय मंदिर होते का’:अलाहाबाद हायकोर्टाने केंद्र- ASI ला उत्तर मागितले; सर्वेक्षण आयुक्त नियुक्तीच्या...

0
अलाहाबाद उच्च न्यायालयाने सोमवारी ताजमहालमध्ये तेजो महालय मंदिर असल्याच्या याचिकेवर सुनावणी केली. त्याचे सर्वेक्षण करण्यासाठी वकील आयोग (एडवोकेट कमिशन) नियुक्त करण्याच्या मागणीवर केंद्र...

ट्रस्टच्या वादातून साधूची फसवणूक; फसवणुकीची कथा

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराएक लोककथा आहे. जुन्या काळात एका गावातील मंदिरात एक साधू राहत होता. तो आपल्या तपस्या, शिस्त आणि साधेपणासाठी प्रसिद्ध होता....

जादूटोण्याची भीती घालून महिलेवर बलात्कार अन् जबरदस्तीने विवाह:मुलासह महिलेचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न, दारणा...

0
धंद्यात भरभराट करून देण्याचे आमिष दाखवत जादूटोण्याची भीती घालून एका महिलेवर लैंगिक अत्याचार करून नंतर तिच्याशी जबरदस्तीने विवाह केल्याप्रकरणी सायखेडा पोलिसांनी संशयित भोंदूबाबा...

श्रीलंका 142 धावांनी आघाडीवर:WI च्या पहिल्या डावात 499 धावा, ग्रीव्ह्सच्या 180 धावा; दुसऱ्या डावात...

0
श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्याचe चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने आपली आघाडी आणखी मजबूत केली. वेस्ट इंडिजचा पहिला डाव...
spot_img

श्रीलंका 142 धावांनी आघाडीवर:WI च्या पहिल्या डावात 499 धावा, ग्रीव्ह्सच्या 180 धावा; दुसऱ्या डावात...

0
श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्याचe चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने आपली आघाडी आणखी मजबूत केली. वेस्ट इंडिजचा पहिला डाव...

संजू सॅमसन झिम्बाब्वे टी-20 मालिकेतून बाहेर:वैभव सूर्यवंशीला पुन्हा संधी, रिंकू सिंगचे पुनरागमन; श्रेयसच कर्णधार...

0
BCCI ने झिम्बाब्वेमध्ये 23 ते 26 जुलै दरम्यान होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या 'प्लेअर...

मैत्रीतील मंदी:तीन चतुर्थांश तरुण मित्र असूनही एकटेपणा अनुभवत आहेत, अधिक ‘कनेक्टेड’ असूनही जवळच्या मित्रांची...

0
एक काळ असा होता, जेव्हा मैत्री म्हणजे तासन्तास एकत्र बसणे, विनाकारण भेटणे आणि लहान-मोठ्या प्रत्येक गोष्टी वाटून घेणे होते. आज चित्र बदलले आहे....

नेटफ्लिक्स शोमध्ये अश्नीर ग्रोवरच्या पत्नीचे वादग्रस्त विधान:’लॉकअप 2′ मध्ये माधुरी म्हणाली- श्रीमंत मुले जन्माला...

0
नेटफ्लिक्सच्या रिॲलिटी शो ‘लॉकअप 2’ मध्ये उद्योगपती अश्नीर ग्रोवर यांच्या पत्नी माधुरी जैन ग्रोवर यांच्या एका विधानावर वाद निर्माण झाला आहे. शोमध्ये एलिमिनेशन...
error: Content is protected !!