Homeदेश-विदेशबिझनेस यूकेने प्रमुख रशियन तेल कंपन्या आणि भारत न्यारा एनर्जी आणि चिनी...

बिझनेस यूकेने प्रमुख रशियन तेल कंपन्या आणि भारत न्यारा एनर्जी आणि चिनी तेल टर्मिनल नवीनतम अद्यतनांवर निर्बंध लादले


तेल कंपन्यांवर यूके बंदी: (india vs america tariff war) अमेरिकेच्या आयात शुल्काचा मारा आणि तत्सम धोरणांना सामोऱ्या जाणाऱ्या भारताला आता आणखी एका देशाच्या अशाच काही धोरणांचा सामना करावा लागणार आहे. ज्यामुळं दिवाळीआधीच देशाचं परराष्ट्र मंत्रालय आणि त्यांच्या रणनितींकडेच साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. भारताला सणासुदीच्या दिवसांमध्ये धक्का देऊ पाहणारा हा देश आहे ब्रिटन.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

रशियाविरोधातील आर्थिक धोरणं आणखी कठोर करण्यासाठी म्हणून भारतानं एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, यावेळी ब्रिटनच्या निशाण्यावर फक्त रशिया नसून, भारत, चीन आणि इतर काही देशांतील तेल उत्पादन कंपन्याही आहेत. ब्रिटीश शासनानं युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धाच्या धर्तीवर रशियाची युद्धासाठीची आर्थिक रसद थांबवण्यासाठी नवे निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये भारतातील सर्वात मोठी उर्जा कंपनी न्यारा एनर्जीचाबी समावेश असून, ही कंपनी रशियाकडून खनिजतेल खरेदी करते अशी माहिती आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान नुकतेच भारत दौऱ्यावरून मायदेशी परतले. ज्यानंतरच ही मोठी घोषणा करण्यात आली. प्राथमिक हेतूसंदर्भातील माहितीनुसार रशियाची आर्थिक ताकद कमकुवत करत युक्रेनसाठी त्यांच्या आर्थिक वाटा बंद करणं हा हेतू असल्याचं सांगण्यात येत आले. ब्रिटीश चान्सेलर रेचेल रिव्ज यांच्या माहितीनुसार रशिया हळुहळू वैश्विक तेल बाजारातून बाहेर पडत असून, ब्रिटनकडून हे निश्चित केलं जाणार आहे की कोणताही देश किंवा कंपनी त्यांच्या तेल व्यवसायाला चालना देणार नाही.

भारतावर काय होणार परिणाम?

भारतातील न्यारा एनर्जी एक मुख्य तेल शुद्धिकरण प्रकल्प असणारी कंपनी आहे. या कंपनीकडून मागील काही दिवसांमध्ये रशियाकडून विक्रमी स्तरावर तेल खरेदी करण्यात आली होती. अधिकृत आकडेवारीनुसार 2024 मध्ये न्यारा एनर्जीनं 100 मिलियन बॅरल कच्चं तेल खरेदी केलं असून याची किंमत 5 बिलियन डॉलर अर्थात साधारण 41 हजार कोटी रुपयांच्या घरात होती. भारत आणि चीनसारखी राष्ट्र रशियाकडून तेल खरेदी करत त्यांची अर्थव्यवस्था आणखी भक्कम करत असल्याची बाब अधोरेखित करत ब्रिटनकडून याबाबत नाराजीसुद्धा व्यक्त करण्यात आली. युक्रेनसोबतच्या युद्धात रशियाला या खरेदीमुळं आर्थिक पाठबळ मिळत आहे, ज्यामुळं न्यारासुद्धा निर्बंध लावण्यात आलेल्या कंपन्यांच्या यादीत आल्यानं आता भारतापुढील अडचणी वाढू शकतात.

ब्रिटनकडून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळं भारतासोबतच्या या देशाच्या आर्थिक व्यवहारांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊ शकते. कारण, न्यारा एनर्जीसारख्या कंपन्या भारताच्या उर्जासंबंधित गरजा पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र तरीही आपला केंद्रीत हेतू हा रशियाचं आर्थिक पाठबळ पूर्ण करणं हाच आहे, असंच ब्रिटन सतत सांगत असल्यानं भविष्यात त्यांचं हे वक्तव्य कितपत खरं ठरतं आणि त्यात काही बदल होतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

ब्रिटनने कोणत्या धोरणाची घोषणा केली आहे आणि त्याचा मुख्य उद्देश काय आहे?
ब्रिटनने रशियाविरोधातील आर्थिक निर्बंध कठोर करण्यासाठी नवीन धोरणाची घोषणा केली आहे. याचा मुख्य उद्देश रशियाची युद्धासाठीची आर्थिक रसद थांबवणे आहे, ज्यामुळे युक्रेनसोबतच्या युद्धात रशियाला आर्थिक पाठबळ मिळणार नाही.

या निर्बंधांमध्ये भारताच्या कोणत्या कंपनीला लक्ष्य करण्यात आले आहे?
भारतातील सर्वात मोठी ऊर्जा कंपनी न्यारा एनर्जीला या निर्बंधांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. ही कंपनी रशियाकडून खनिज तेल खरेदी करते, ज्यामुळे तिला ब्रिटनच्या निशाण्यावर ठेवण्यात आली आहे.

ब्रिटिश पंतप्रधानांच्या भारत दौऱ्याचा याच्याशी काय संबंध आहे?
ब्रिटिश पंतप्रधान नुकतेच भारत दौऱ्यावरून मायदेशी परतले. दौऱ्यानंतरच ही मोठी घोषणा करण्यात आली, ज्यामुळे भारत-ब्रिटन संबंधांवर ताण येऊ शकतो.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...
spot_img

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...
error: Content is protected !!