Homeदेश-विदेशजैसलमेर जोधपूर महामार्गावर बस कॅचने आग लावल्यानंतर 19 ठार

जैसलमेर जोधपूर महामार्गावर बस कॅचने आग लावल्यानंतर 19 ठार


खासगी बसला आग लागून 19 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना झाली आहे. मंगळवारी जैसलमेरहून राजस्थानमधील जोधपूरला जाणाऱ्या खासगी बसला आग लागली. यानंतर बसमधील 19 जणांचा होरपळून मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 57 प्रवाशांना घेऊन बस दुपारी 3 वाजता जैसलमेरहून निघाली. जैसलमेर-जोधपूर महामार्गावर बसच्या मागच्या भागातून धूर येऊ लागला. यामुळे चालकाने बस रस्त्याच्या कडेला थांबवली. परंतु काही क्षणातच संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी आली.

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

स्थानिक आणि रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी आग विझवण्यासाठी आणि बचावकार्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी बचावकार्यात मोठी भूमिका पार पाडली. यादरम्यान अग्निशमन दल आणि पोलिसांना माहिती देण्यात आली. जखमी प्रवाशांना जैसलमेरमधील जवाहर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. प्रथमदर्शनी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असं दिसत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

जैसलमेर जिल्हा प्रशासनाने घटनेची माहिती मिळताच तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू केल्याचं सांगितलं. जिल्हाधिकारी प्रताप सिंह यांनी अधिकाऱ्यांना जखमींना तातडीने वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देश दिले. हेल्पलाइन क्रमांक देखील जारी करण्यात आले आहेत.

राज्यपाल हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, भाजप प्रदेशाध्यक्ष मदन राठोड आणि इतर नेत्यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, जखमींना योग्य वैद्यकीय उपचार आणि पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

“जैसलमेरमध्ये बसला आग लागल्याची घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. या दुःखद अपघातात बाधित झालेल्यांप्रती मी तीव्र संवेदना व्यक्त करतो. जखमींवर योग्य उपचार करण्यासाठी आणि पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत,” असे मुख्यमंत्र्यांनी एक्सवर पोस्ट करुन सांगितलं आहे.

मृतांच्या कुटुंबियांना 2 लाखांची मदत जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जैसलमेर घटनेवर शोक व्यक्त केला. ते म्हणाले, “राजस्थानातील जैसलमेर येथे अपघातात झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानीबद्दल मी दु:खी आहे. या कठीण काळात पीडित लोक आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत. जखमी लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो.” पंतप्रधानांनी राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना 2 लाखांची आणि जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...
spot_img

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...
error: Content is protected !!