Homeमहाराष्ट्रखळबळ! कर्जतच्या फार्महाऊसवर पशुपालनाच्या नावाखाली ड्रग्जची फॅक्टरी; थरारक कारवाईत ₹ 240,000,000 चा...

खळबळ! कर्जतच्या फार्महाऊसवर पशुपालनाच्या नावाखाली ड्रग्जची फॅक्टरी; थरारक कारवाईत ₹ 240,000,000 चा मुद्देमाल जप्त


प्रफुल्ल पवार, झी मीडिया, कर्जत : (Karjat News) पावसाळी सहलींसाठी किंवा अगजदी एकदिवसीय सहलींसाठी लोकप्रिय असणाऱ्या कर्जत इथं अनेक फार्महाऊस पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज असतात. पण, याच कर्जतमधून नुकत्याच समोर आलेल्या एका बातमीनं खळबळ माजली असून, त्यामुळं फार्महाऊस याच शब्दानं धडकीसुद्धा भरू शकते.

कर्जमध्ये ड्रग्जची फॅक्टरी…

कर्जत तालुक्यातील किकवी इथं शेळीपालन व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेल्या अंमली पदार्थ निर्मिती कारखान्याचा मुंबई पोलिसांनी नुकताच पर्दाफाश केला. पोलिसांनी किकवी येथील सावली फार्म हाऊसवर धाड टाकत तिथं केलेल्या कारवाईत तब्बल साडेपाच किलो एम डी ड्रग्ज जप्त केले.

पोलिसांच्या या कारवाईतून जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत 11 कोटी 5 लाख रुपये इतकी असल्याचं सांगण्यात येत आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत 24 कोटी 50 लाख रुपये साडेबारा किलो एम डी ड्रग्ज हस्तगत करण्यात आलं असून, 1 कोटी रुपयांचा कच्चा मालदेखील पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी आतापर्यंत 6 जणांना अटक करण्यात आली आहे.

हेसुद्धा वाचा : सुंभ जळाला तरी… PoK मध्ये पुन्हा दहशतवादी तळ सक्रिय; आणखी एका Operation Sindoor साठी BSF सज्ज?

कशी करण्यात आली कारवाई?

पूर्व उपनगर नशामुक्त करण्यासाठी पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्यामार्फत अमली पदार्थ विरोधी पथक स्थापन करण्यात आलं. ज्यानंतर कर्जतला एमडी ड्रग्जची निर्मिती केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि लगेचच या ठिकाणी पोलीस पथक दाखल झालं. तिथं सावली फार्महाऊसचं नाव समोर आलं. मात्र प्रथमदर्शनी तिथं शेळीपालन होत असल्याचच वास्तव समोर आलं.

पोलीस पथकानं या फार्महाऊसवर नजर ठेवली आणि अखेर अपेक्षित माहिती समोर आलीच. इथं शेळीपालनाच्या नावाखाली ड्रग्ज निर्मिती होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली पोलिसांनी लगेचच धडक कारवाई करत कोट्यवधींचा मुद्देमाल घटनास्थळाहून जप्त केला.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

राम मंदिर देणगी चोरीवर चंपात राय यांचे पहिले पत्र:म्हटले- SIT च्या अहवालानंतर सर्व काही...

0
अयोध्या राम मंदिराच्या देणगी चोरी प्रकरणात आरोपांनी घेरलेले माजी सरचिटणीस चंपत राय यांनी मंगळवारी श्रीरामचरितमानसमधील चौपाई लिहून आपले मौन सोडले आहे. त्यांनी आपल्या...

7 जुलैचे राशिभविष्य:कुंभ राशीच्या लोकांना थांबलेले पैसे मिळतील, मीन राशीच्या लोकांना प्रॉपर्टी व्यवहार फायदेशीर...

0
मंगळवार, 7 जुलै रोजी कुंभ राशीच्या लोकांना थांबलेली पेमेंट मिळू शकते आणि नोकरीशी संबंधित चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. मीन राशीच्या लोकांसाठी दुपारनंतर...

प्रभसिमरन सिंगला संधी; संजू सॅमसन नाबाद

0
क्रीडा डेस्क42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करासंजू सॅमसनला भारतीय संघातून वगळण्यात आलेले नाही. निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाने 2028 टी-20 विश्वचषकाची तयारी सुरू केली आहे....

पावसाळ्यात वाढतात कीटक आणि झुरळे:10 खबरदारी घेतल्यास कीटक येणार नाहीत, तज्ञांकडून जाणून घ्या पळवून...

0
उन्हाळ्यानंतर पावसाळा दिलासा घेऊन येतो, पण या ऋतूत आर्द्रता आणि ओलसरपणा वाढतो आणि जागोजागी पाणी साचते. कीटकांच्या वाढीसाठी या परिस्थिती अनुकूल आहेत. यामुळेच...
spot_img

प्रभसिमरन सिंगला संधी; संजू सॅमसन नाबाद

0
क्रीडा डेस्क42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करासंजू सॅमसनला भारतीय संघातून वगळण्यात आलेले नाही. निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाने 2028 टी-20 विश्वचषकाची तयारी सुरू केली आहे....

पावसाळ्यात वाढतात कीटक आणि झुरळे:10 खबरदारी घेतल्यास कीटक येणार नाहीत, तज्ञांकडून जाणून घ्या पळवून...

0
उन्हाळ्यानंतर पावसाळा दिलासा घेऊन येतो, पण या ऋतूत आर्द्रता आणि ओलसरपणा वाढतो आणि जागोजागी पाणी साचते. कीटकांच्या वाढीसाठी या परिस्थिती अनुकूल आहेत. यामुळेच...

कृती सेननने ‘मिमी’ चित्रपटाच्या वेळी एग्स फ्रीज केले:म्हणाली- लग्न किंवा मुले स्वतःच्या इच्छेने व्हायला...

0
बॉलिवूड अभिनेत्री कृती सेननने खुलासा केला आहे की, तिने तिच्या 'मिमी' चित्रपटाच्या तयारीदरम्यान तिची अंडी (एग्स) फ्रीज केली होती. 'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे'ला दिलेल्या...

टाटा ग्रुपमध्ये नवीन पिढीला कमान सोपवण्याची रणनीती:नोएल टाटा यांची मुलगी माया रिटेल चेन ‘वेस्टसाइड’चा...

0
टाटा ग्रुपची फॅशन रिटेल चेन 'वेस्टसाइड'च्या ई-कॉमर्स मार्केटिंगची धुरा नोएल टाटा यांची कन्या माया टाटा (37 वर्षे) सांभाळतील. सोमवारी झालेल्या या बदलाचा उद्देश...
error: Content is protected !!