Narayan Rane on Raj-Uddhav Alliance: राज्यात मागील काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा रंगली आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी भावना मागील अनेक वर्षांपासून व्यक्त होत आहे. त्यातच राज ठाकरे यांनी आपण युतीसाठी तयार असल्याचं सूचक विधान केल्यानंतर या चर्चेला बळ मिळालं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का? अशी चर्चा सुरु झाली होती. त्यातच आता भाजपा खासदार नारायण राणे यांनी मात्र यावर परखड मत मांडलं आहे. दोघेही भाजपाच्या पुरात वाहून जातील असं ते म्हणाले आहेत.































