लॅटूरमध्ये भाजप लीडर अपघात: महाराष्ट्रात भीषण अपघात झाला आहे. तुळजापूर ते औसा महामार्गावर हा अपघात झाला. या अपघातात भाजप नेते तथा माजी आमदार आर टी देशमुख यांचा जागीच मृत्यू झाला आहे. आर टी देशमुख हे गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्ती होते. आर टी देशमुख यांच्या मृत्यूने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
लातूर जिल्ह्यात ही अपघाताची घटना घडली आहे. लातूर तुळजापूर रस्त्यावरील बेलकुंड येथे आर टी देशमुख यांच्या कारचा अपघात झाला. अपघातात आर टी देशमुख यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. बेलकुंडीजवळ त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला.
चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात असलेली कार उलटली. या भीषण अपघातात देशमुख गंभीर जखमी झाले. तातडीने त्यांना लातूरच्या सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. रुग्णालयात पोहचण्याआधीच वाटेतच त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते. आर. टी. देशमुख हे माजलगाव मतदारसंघाचे आमदार होते. माजी आमदार आर टी देशमुख हे गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्ती होते.भाजपच्या संघटनात्मक मांडणीसाठी त्यांनी मोठे योगदान दिले होते.
































