Homeमहाराष्ट्रMaharashtra ATS arrests Prashant Jalinder Kamble for alleged links with naxalites

Maharashtra ATS arrests Prashant Jalinder Kamble for alleged links with naxalites


महाराष्ट्र दहशतवादविरोधीत पथकाने (Maharashtra Anti-Terrorism Squad) रविवारी एका 44 वर्षीय व्यक्तीला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या कथित आरोपांखाली त्याला अटक करण्यात आली आहे. प्रशांत जालिंदर कांबळे असं या व्यक्तीचं नाव असून, त्याला लॅपटॉप या नावानेही ओळखलं जातं. शहर नक्षलवाद प्रकरणी 2011 पासून तो वाँटेड होता असं अधिकारी म्हणाला आहे.

दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत मारले गेलेले सीपीआयचे (माओवादी) वरिष्ठ नेते मिलिंद तेलतुंबडे आणि टॉप माओवादी अँजेला सोनटक्के यांचंही 2011 च्या एफआयआरमध्ये नाव होतं.

एटीएस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत कांबळे रायगड जिल्ह्यातील खोपोली परिसरात लपून राहिला होता. तिथे तो गेल्या सहा ते सात वर्षांपासून आदिवासी विद्यार्थ्यांना शिकवत होता.

अधिकाऱ्याने सांगितलं आहे की, पुण्यातील ताडीवाला रोड येथे स्थित असणारा प्रशांत कांबळे कॉम्प्युटर आणि लॅपटॉप रिपेअरिंगचं काम करत होता. तिथे ते तो कबीर कला मंच या सांस्कृतिक गटाच्या संपर्कात आला. या गटावर नक्षलवादाशी संबंध असल्याचा आरोप आहे.

पुढे त्यांनी सांगितलं की, प्रशांत कांबळेने 2010 मध्ये आपलं घर सोडलं होतं. आपण मुंबईला कामासाठी जात असल्याचं सांगून तो घरातून गेला होता. पण तो घरी परतलाच नाही. प्रशांत कांबळेसह पुण्यातून बेपत्ता झालेला संतोष शेलार गडचिरोलीच्या जंगलात सीपीआयचे (माओवादी) सक्रीय सदस्य होते.

जानेवारी 2024 मध्ये संतोष शेलार आपल्या पुण्याच्या घऱी परतला होता. यादरम्यान त्याची प्रकृती बिघडलेली होती. एटीएसने तिथेच त्याला अटक केली. अधिकाऱ्याने सांगितलं की, प्रशांत कांबळे हे मोठं टार्गेट होतं. नक्षलवादी विचारसरणीचा कट्टर अनुयायी होता.

2011 च्या खटल्यानंतर, प्रशांत कांबळेला न्यायालयाने फरार घोषित केलं आणि त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट आणि घोषणापत्र जारी करण्यात आले, असे ते म्हणाले. एटीएसच्या पुणे युनिटने खोपोली येथून प्रशांत कांबळेला अटक केल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. पडताळणीनंतर त्याला अटक करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

कांबळेला मुंबई न्यायालयात हजर करण्यात आलं असता त्याला 13 मेपर्यंत एटीएसच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याचं अधिकाऱ्याने सांगितलं आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शिमल्यात मुसळधार पाऊस, दिवसा अंधार पसरला:रस्ते पाण्याने तुडुंब भरले, चंबा येथे ऑरेंज अलर्ट; 2...

0
हिमाचल प्रदेशच्या राजधानीत दुपारनंतर अचानक हवामान बदलले आणि जोरदार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे शहरातील रस्ते आणि मार्ग पाण्याने भरले. यावेळी शाळकरी मुलांना आणि...

संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांची तिरुपती वारी:11 किलोमीटरची पायपीट, कन्यका देवीचेही...

0
राज्यात 'ऑपरेशन टायगर' यशस्वी झाल्यानंतर शिंदे गटात सामील झालेल्या सहा खासदारांनी आपापल्या मतदारसंघात जाऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आपली बाजू समजावून सांगण्याचा प्रयत्न केला....

हिमाचलमध्ये रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू:महिला शिक्षिकेने बनवलेला लाइव्ह व्हिडिओ समोर आला, दूध विकून...

0
हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यातील रामपूर येथे आज (शुक्रवारी) दुपारनंतर एक बोलेरो कॅम्पस खोल दरीत कोसळली. या अपघातात आई-मुलासह सहा जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी...

कथा: व्यापाऱ्याची दुःखी व्यक्तीला शिकवण:आपण शिकण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या मेहनतीने ज्ञान मिळवतो, तेव्हा...

0
फार जुन्या काळातील एक कथा आहे. एक सोनार मरण पावला. त्याच्या कुटुंबात त्याची पत्नी आणि एक मुलगा होता. सोनाराच्या मृत्यूनंतर कुटुंबावर आर्थिक संकट...
spot_img

अनऑफिशियल कसोटी, जुरेलच्या शतकामुळे भारत-ए मजबूत स्थितीत:पहिली इनिंग 452/6 धावांवर घोषित केली; श्रीलंका-ए 114/2,...

0
गॉल येथे भारत 'ए' आणि श्रीलंका 'ए' यांच्यातील पहिल्या अनधिकृत कसोटीच्या दुसऱ्या दिवशी कर्णधार ध्रुव जुरेलने शतक झळकावले. शुक्रवारी झालेल्या पावसामुळे दिवसाचा खेळ...

व्यायामानंतरही वजन कमी होत नाही:कॅलरी ट्रॅक करणे पुरेसे नाही, हार्मोन टेस्ट करा, तज्ञांकडून वजन...

0
वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांची सर्वात मोठी तक्रार हीच असते- "मी रोज चालतो, जिममध्ये जातो, डाएटही कंट्रोल करतो, तरीही वजन कमी होत...

लग्नासाठी गोव्यात पोहोचले साऊथ आणि बॉलिवूड स्टार्स:अनिल कपूर-जॅकी श्रॉफ, चिरंजीवी आणि नागार्जुन पारंपरिक लूकमध्ये...

0
अभिनेत्री आणि राजकारणी खुशबू सुंदर आणि चित्रपट निर्माता सुंदर सी यांची मोठी मुलगी अवंतिका सुंदर विवाहबंधनात अडकली आहे. तिने 25 जून रोजी गोव्यातील...

50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी, 22 भाषा सपोर्ट

0
नवी दिल्ली4 तासांपूर्वीलिंक कॉपी करासॅमसंगने आपला गॅलेक्सी A-सिरीजचा नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी A27 5G जागतिक बाजारात लॉन्च केला आहे. हा नवीन हँडसेट जुन्या गॅलेक्सी...
error: Content is protected !!