Homeमहाराष्ट्रकोकणात माकडे, वानरांकडून मोठा उपद्रव, वनमंत्री गणेश नाईक घेणार मोठा निर्णय!

कोकणात माकडे, वानरांकडून मोठा उपद्रव, वनमंत्री गणेश नाईक घेणार मोठा निर्णय!

महाराष्ट्र : निर्जंतुकीकरण माकडांसाठी सेंटर: कोकणातील फळबागा आणि शेतीपिकांना होणारा वानर आणि माकडांचा मोठ्या प्रमाणात होणाऱ्या उपद्रवाला आळा घालण्यासाठी माकडांचे निर्बीजीकरण करण्यासाठी केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या त्रासासंदर्भात वनमंत्री नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी नाईक बोलत होत. यावेळी वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, उपसचिव विवेक होसिंग, कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) आर.एम. रामानुजम,  विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई, दापोली ग्रामोद्योग फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे संचालक विनायक महाजन, पत्रकार मिलिंद लिमये, वन्य जीव अभ्यासक संतोष महाजन आदी यावेळी उपस्थित होते. तर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) शोमिता बिश्वास, अतिरिक्त प्रधान मुख्य वन संरक्षक नरेश झुरमुरे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. दापोली तालुक्यात रानडुकर, माकड व वानरांमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होत असून आता माकडे व वानरे ही गावात येऊन घरातील वस्तूंचेही नुकसान करत असल्याचै महाजन यांनी सांगितले.

कोकणात माकडे व वानरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वन्य प्राण्यांपासून शेतीचे होणारे नुकसान झाल्यानंतर भरपाई देणे हा कायमस्वरुपी उपाय होऊ शकत नाही. हे नुकसान टाळण्यासाठी दीर्घकालीन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी माकडे, वानरे यांचे निर्बीजीकरण करण्यासंदर्भात रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्बीजीकरण केंद्र उभारण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू आहे. वन्यप्राण्यांपासून फळबाग व शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी दीर्घकालीन उपाय योजना करण्यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू देणार नसल्याचे वनमंत्री नाईक यांनी यावेळी सांगितले.

रानडुकरांमुळे फळबागा तसेच भातशेतीचे नुकसान होते. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांना कायद्याच्या चौकटीत राहून अनुमती देण्यात यावी. तसेच शेतात येणाऱ्या वन्य प्राण्यांपासून बचावासाठी यापूर्वी कोकणातील शेतकऱ्यांना शस्त्र परवाने देण्यात आले होते. मात्र, हे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. अशा शेतकऱ्यांना शेतीच्या रक्षणासाठी नियमानुसार परवाने देण्याचे निर्देशही वन मंत्री नाईक यांनी यावेळी रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले. यावेळी महाजन यांनी वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या पिक नुकसानीची भरपाई लवकर देण्यात यावी. तसेच साळिंद्र या प्राण्यामुळे होणाऱ्या नुकसानाचाही समावेश यामध्ये करण्याची मागणी केली. सौ.झी.न्यूज

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

भारताने सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी आरोग्य घोषणा अनिवार्य केली; हवाई सुविधा 2.0 लाँच केले

0
मराठी बातम्याव्यवसायभारताने सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी आरोग्य घोषणा अनिवार्य केली; हवाई सुविधा 2.0 लाँच केलेनवी दिल्ली11 तासांपूर्वीलिंक कॉपी कराभारत सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी एअर सुविधा...

खदानीत सेल्फी काढताना पाय घसरला:एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात 3 मित्रांचा खोल पाण्यात बुडून अंत, अमळनेरमधील...

0
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथून एक अत्यंत सुन्न करणारी आणि भीषण दुर्घटना समोर आली आहे. चोपडा रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या शेजारी असलेल्या एका खोल खदाणीत सेल्फी...

राम मंदिर देणगी चोरीवर चंपात राय यांचे पहिले पत्र:म्हटले- SIT च्या अहवालानंतर सर्व काही...

0
अयोध्या राम मंदिराच्या देणगी चोरी प्रकरणात आरोपांनी घेरलेले माजी सरचिटणीस चंपत राय यांनी मंगळवारी श्रीरामचरितमानसमधील चौपाई लिहून आपले मौन सोडले आहे. त्यांनी आपल्या...

7 जुलैचे राशिभविष्य:कुंभ राशीच्या लोकांना थांबलेले पैसे मिळतील, मीन राशीच्या लोकांना प्रॉपर्टी व्यवहार फायदेशीर...

0
मंगळवार, 7 जुलै रोजी कुंभ राशीच्या लोकांना थांबलेली पेमेंट मिळू शकते आणि नोकरीशी संबंधित चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. मीन राशीच्या लोकांसाठी दुपारनंतर...
spot_img

प्रभसिमरन सिंगला संधी; संजू सॅमसन नाबाद

0
क्रीडा डेस्क42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करासंजू सॅमसनला भारतीय संघातून वगळण्यात आलेले नाही. निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाने 2028 टी-20 विश्वचषकाची तयारी सुरू केली आहे....

पावसाळ्यात वाढतात कीटक आणि झुरळे:10 खबरदारी घेतल्यास कीटक येणार नाहीत, तज्ञांकडून जाणून घ्या पळवून...

0
उन्हाळ्यानंतर पावसाळा दिलासा घेऊन येतो, पण या ऋतूत आर्द्रता आणि ओलसरपणा वाढतो आणि जागोजागी पाणी साचते. कीटकांच्या वाढीसाठी या परिस्थिती अनुकूल आहेत. यामुळेच...

कृती सेननने ‘मिमी’ चित्रपटाच्या वेळी एग्स फ्रीज केले:म्हणाली- लग्न किंवा मुले स्वतःच्या इच्छेने व्हायला...

0
बॉलिवूड अभिनेत्री कृती सेननने खुलासा केला आहे की, तिने तिच्या 'मिमी' चित्रपटाच्या तयारीदरम्यान तिची अंडी (एग्स) फ्रीज केली होती. 'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे'ला दिलेल्या...

टाटा ग्रुपमध्ये नवीन पिढीला कमान सोपवण्याची रणनीती:नोएल टाटा यांची मुलगी माया रिटेल चेन ‘वेस्टसाइड’चा...

0
टाटा ग्रुपची फॅशन रिटेल चेन 'वेस्टसाइड'च्या ई-कॉमर्स मार्केटिंगची धुरा नोएल टाटा यांची कन्या माया टाटा (37 वर्षे) सांभाळतील. सोमवारी झालेल्या या बदलाचा उद्देश...
error: Content is protected !!