Homeमनोरंजनरोहित शर्मा ऐकण्यास नकार दिल्यानंतर माहेला जयवर्धनेने अहंकार बाजूला ठेवण्यास सांगितले

रोहित शर्मा ऐकण्यास नकार दिल्यानंतर माहेला जयवर्धनेने अहंकार बाजूला ठेवण्यास सांगितले


IPL 2025: मुंबई इंडियन्सने रविवारी अटीतटीच्या सामन्यात दिल्लीचा 12 धावांनी पराभव केला. एका क्षणी करुण नायरची तुफान फलंदाजी पाहता दिल्ली संघ सहजपणे 206 धावांचं आव्हान अत्यंत सहजपणे पूर्ण करेल असं वाटत होतं. दिल्ली संघाची स्थिती 145 धावांवर 4 गडी बाद होती. त्यांना जिंकण्यासाठी 7 ओव्हर्समध्ये 61 धावांची गरज होती. यावेळी मुंबईने चेंडू बदलण्याची मागणी केली आणि अम्पायर्सनी ती स्विकारली. यानंतर जे काही घडलं ते सर्व नाट्यमय होतं. यामागे रोहित शर्माचा मास्टरस्ट्रोक होता. 14 व्या ओव्हरला तो डगआऊटमध्ये होता. रोहित शर्माने कर्ण शर्माला तेथून चेंडू बदलण्यास सांगितलं. आयपीएलच्या नवीन नियमानुसार दुसऱ्या डावाच्या 10 व्या षटकानंतर दवाचा परिणाम कमी करण्यासाठी नवीन चेंडू घेण्याची परवानगी आहे.

चेंडू बदलल्यानंतर लगेचच विकेट पडू लागल्या. “रोहित शर्माच्या एका महत्त्वाच्या सल्ल्याने पराभवाचं विजयात रूपांतर केलं. दिल्ली संघ सहजपणे विजयी होत होता. करुण नायर शानदार फलंदाजी करत होता,  त्याला कोणीही रोखू शकत नव्हतं. तो पुष्पासारखा खेळत होता, वणव्यासारखा पसरत होता. 13 व्या षटकात दिल्ली जिंकेल असं वाटत होतं. पण लगेचच रोहितने मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धनेला फिरकीपटूला ओव्हर देण्यास आणि कर्ण शर्माला गोलंदाजीसाठी आणण्यास सांगितलं. मला वाटतं की महेला जयवर्धने रोहित शर्माशी सहमत नव्हता. जर ते जयवर्धनेच्या म्हणण्यानुसार वागले असते तर मुंबई इंडियन्सने हा सामनाही गमावला असता. रोहित शर्मा तिथे होता, त्याच्याकडे सर्वोत्तम रणनीती होती. तो कर्णधार आहे. तो नेहमीच कर्णधारासारखा विचार करतो. कर्णधार हा नेहमीच कर्णधार असतो आणि त्याच्या रणनीतिक कौशल्यामुळे मुंबईला जिंकण्यास मदत झाली,” असं हरभजनने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर म्हटलं.

“कर्ण शर्माने आक्रमण करत तीन विकेट घेतल्या आणि खेळाला कलाटणी दिली. हा एक सुवर्ण खेळ होता. जर रोहित शर्मा डगआउटमध्ये असता तर तिलक वर्मा लखनौविरुद्ध रिटायऱ् झाला आणि मिशेल सँटनरला मैदानात पाठवण्यात आलं ते घडलं नसतं. महेला जयवर्धनेने वाईट निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध रोहितने अविश्वसनीय कामगिरी केली. कधीकधी, प्रशिक्षकांनी त्यांचा अहंकार बाजूला ठेवून संघाला कसा फायदा होईल याचा विचार केला पाहिजे. मला आशा आहे की रोहित शर्मा डगआउटमधून त्याचे विचार शेअर करत राहील,” असं मतही त्याने व्यक्त केलं.

दरम्यान, आयपीएलमध्ये रोहित शर्माची अपयशी कामगिरी सुरूच राहिली. रविवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या लढतीतही तो मोठी खेळी करु शकला नाही.  फलंदाजीला आल्यानंतर रोहित आणि रायन रिकेल्टन यांनी आक्रमक भूमिका घेत अनुकूल परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. पण रोहित फक्त 18 धावांवर बाद झाला.

रोहितच्या नावे आता आयपीएल 2023 नंतर किमान 25 डाव खेळलेल्या खेळाडूंमध्ये सलामीवीर म्हणून दुसऱ्या क्रमांकाची सर्वात कमी सरासरी आहे.

आयपीएल 2023 पासून, रोहितने फक्त 24.39 च्या सरासरीने 805 धावा केल्या आहेत, जी सलामीवीराची दुसऱ्या क्रमांकाची सर्वात कमी सरासरी आहे. या स्फोटक सलामीवीराच्या पुढे फक्त वृद्धिमान साहा आहे, त्याने 20.28 सरासरीने 507 धावा केल्या आहेत. चालू हंगामात, रोहितने 11.20 च्या सरासरीने फक्त 56 धावा केल्या आहेत.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!