Homeमुळशीपावसाचा मुळशीत कहर; रस्ते, पूल पाण्याखाली

पावसाचा मुळशीत कहर; रस्ते, पूल पाण्याखाली

मुळशी (दि.19) : मुळशी तालुक्यात गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले असून नद्या, ओढे आणि नाल्यांना पूर आला आहे. मुळा, मुठा आणि वळकी नद्यांसह लहान-मोठ्या ओढ्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून अनेक रस्ते आणि पूल पाण्याखाली गेले आहेत.

घोटावडे, रिहे खोरे, पिरंगुट, मुठा खोरे आणि लवासा परिसरात पावसाचे जोरदार लोट वाहत असून रस्त्यांवरून नद्यासारखे प्रवाह निर्माण झाले आहेत. मुळा नदी दुथडी भरून वाहत असल्याने लवळे, भरे, चांदे, नांदे आणि माण परिसरातील कृषीपंप पाण्यात बुडाले आहेत.

लवळे-भरे रस्त्यावरील कळमकरवस्ती येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. घोटावडेतील शेळकेवाडी ते माण या रस्त्यावरून ओढा वाहत असून पाणी घरांमध्ये आणि दुकानांमध्ये घुसल्याचे स्थानिक भाजप पदाधिकारी रामचंद्र देवकर यांनी सांगितले.

पुणे-कोलाड महामार्गावरील घोटावडे फाटा येथे पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले असून वाहतूक अत्यंत मंद गतीने सुरू आहे. कासार आंबोली परिसरातील सुतारवाडी ते शिंदेवाडी या रस्त्यालाही ओढ्याचे स्वरूप आले आहे. पाण्याच्या लाटा रस्त्यावर धडकत असल्याने वाहनचालकांची कसरत सुरू असल्याची माहिती माजी सरपंच गणेश सुतार यांनी दिली.

दरम्यान, उरवडे मुकाईवाडी रस्त्यावर चार ठिकाणी मोऱ्यांमधून पाणी ओसंडून वाहत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. या परिस्थितीबाबत पिरंगुटचे माजी ग्रामपंचायत सदस्य भानुदास गोळे यांनी चिंता व्यक्त केली आहे.

पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता प्रशासन आणि स्थानिक नागरिकांकडून खबरदारीचे आवाहन करण्यात येत आहे.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

NTA म्हणाले- NEET पेपर आमच्या प्रणालीतून लीक झाला नाही:संसदीय समितीने विचारले- पुन्हा परीक्षा का,...

0
NEET-UG पेपरफुटी प्रकरणासंदर्भात गुरुवारी संसदेच्या स्थायी समितीची बैठक झाली. या बैठकीत NEET परीक्षा घेणारी संस्था नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) चे अधिकारीही उपस्थित होते....

सातारा जिल्ह्यातही ‘कॉक्रोच जनता पार्टी’ची धडक:धुळदेव ग्रामसभेत तरुणांचा एल्गार, हातात पोस्टर घेऊन आक्रमकपणे उपस्थित...

0
देशभरात चर्चेत आलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) या व्यंगात्मक मोहिमेचे पडसाद आता सातारा जिल्ह्यातीस माण तालुक्यातही उमटू लागले आहेत. माण तालुक्यातील धुळदेव येथील...

गुजरात विधानसभा निवडणुका 2027 मध्ये होणार:2029 मध्ये ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची अंमलबजावणी झाल्यास 2034...

0
वन नेशन, वन इलेक्शन प्रकरणी स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीने (JPC) विविध राज्यांमध्ये जाऊन राजकीय पक्ष आणि अधिकाऱ्यांशी सल्लामसलत सुरू केली आहे. तीन...

स्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:शास्त्रे सत्याचा मार्ग दाखवतात आणि आम्हाला शुभ संकल्पांसह जीवन जगण्याची...

0
मराठी बातम्याजीवन मंत्रधर्मअवधेशानंद गिरी महाराज जीवन धडा. ज्ञान सत्य प्रकट करते; पवित्र शास्त्र सत्याचा मार्ग दाखवते आणि उदात्त संकल्प आणि सकारात्मक मूल्यांसह जीवन...
spot_img

भारत देशांतर्गत क्रिकेट हंगाम 2026-27 वेळापत्रक; दुलीप ट्रॉफी सुरू, रणजी दोन टप्प्यात

0
मराठी बातम्याखेळभारत देशांतर्गत क्रिकेट हंगाम 2026 27 वेळापत्रक; दुलीप ट्रॉफी सुरू, रणजी दोन टप्प्यातमुंबई1 तासापूर्वीलिंक कॉपी कराभारतीय देशांतर्गत हंगाम 2026-27 ची सुरुवात 23...

‘हिटलर’ बॉस; सहानुभूतीत शून्य:संशोधनातून खुलासा – इतरांच्या कामाचे श्रेयही घेतात, नफ्याच्या नादात चुकीची निवड...

0
एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापकाची उत्कृष्ट कामगिरी, शानदार संवादक, कंपनी बोर्डाचा आवडता. पण त्याच्या टीममध्ये सतत राजीनामे, भीतीचे वातावरण आणि अनैतिक निर्णयांच्या तक्रारी....

सोनाक्षी सिन्हा-झहीर इकबालने मेलोडी टॉफीवर व्हिडिओ बनवला:PM मोदींनी मेलोनींना भेट दिली टॉफी; सोशल मीडियावर...

0
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिचे पती झहीर इक्बाल सोशल मीडियावर सुरू असलेल्या 'मेलोडी' ट्रेंडमध्ये सामील झाले आहेत. दोघांनी बुधवारी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर...

2031 पर्यंत चंद्र मोहिमेसाठी 8 तास टॉयलेट बॅकअप

0
न्यू यॉर्क6 दिवसांपूर्वीलिंक कॉपी करानासाच्या 2028 पर्यंत मानवांना पुन्हा चंद्रावर पाठवण्याच्या मोहिमेला धक्का बसू शकतो. अमेरिकन ऑडिट रिपोर्टनुसार, 'एक्झिओम स्पेस'चे नवीन स्पेस सूट...
error: Content is protected !!