Homeमहाराष्ट्रSharad Pawar Surrendered To Hinduism Says MNS Leader Prakash Mahajan | शेवटी...

Sharad Pawar Surrendered To Hinduism Says MNS Leader Prakash Mahajan | शेवटी पवारांना हिंदू धर्माला शरण जावे लागले: ते स्वतःला पूजा करताना देखील दाखवू शकतात, प्रकाश महाजनांची सडकून टीका – Beed News

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुढाकार घेत ठाण्यात अक्षय्य तृतीयेच्या दिवशी प्रति तुळजाभवानी मंदिर उभारण्यात आले. शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. त्यानंतर शरद पवारांनी राज ठाक

?

प्रकाश महाजन म्हणाले, महाराष्ट्रात फोडण्यासारखे काही नाही, म्हणून शेवटी पवार साहेबांना उपरती आली. बीड जिल्ह्यात तर पवार साहेबांनी नवरा-बायको फोडले. आम्ही तुमच्या देवाचे बाप असे भाषण करणारे पवार आहेत. मी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात न जाता बाहेरच्या कट्ट्यावर गप्पा मारतो, असेही ते म्हणाले आहेत. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून ते स्वतःला पूजा करताना देखील दाखवू शकतात, अशी टीका महाजन यांनी केली.

शेवटी पवारांना हिंदू धर्माला शरण जावे लागले

पुढे बोलताना प्रकाश महाजन म्हणाले, शेवटी पवारांना हिंदू धर्माला शरण जावे लागले. शरद पवार स्वतःची मुंज झालेली पण दाखवू शकतात. हिंदू धर्माच्या दूर जाऊन राजकारण होऊ शकत नाही, हे पवारांच्या लक्षात आलं. धर्माजवळ जाण्याचा हा प्रकार आहे. जितेंद्र आव्हाडांना तुळजाभवानीचे मंदिर बांधावे लागले. ही हिंदूंची ताकद आहे.

अतिरेक्यांचा धर्म का लपवायचाय?

पहलगाम हल्ला हा देशासाठी धक्का आहे. काही लोक या परिस्थितीला धार्मिक विचार देण्याचा प्रयत्न करत आहेत, असे शरद पवारांनी म्हटले होते. यावर बोलताना प्रकाश महाजन म्हणाले, पवारांनी त्या कुटुंबाची भेट घेऊन देखील त्यांनी अतिरेक्यांनी धर्म विचारल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. पवारांना अतिरेक्यांचा धर्म का लपवायचा आहे? हिंदू म्हणून मारले हे सांगायला का वाईट वाटत आहे? पर्यटकांनी धर्मासाठी बलिदान दिले हे त्यांना कधीच कळणार नाही, अशी टीका महाजन यांनी केली आहे.

वडेट्टीवारांसारखे मूर्ख काँग्रेसमध्ये जमा झालेत

कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दहशतवादी हल्ला करताना लोकांशी बोलतात का? त्यांच्या धर्माची चौकशी करत बसतात का? असे वादग्रस्त विधान केले होते. यावर प्रतिक्रिया देताना प्रकाश महाजन यांनी सडकून टीका केली आहे. ते म्हणाले, वडेट्टीवारांसारखे मूर्ख काँग्रेसमध्ये जमा झाले आहेत, त्यात कर्नाटकाचे मुख्यमंत्री मागे नाहीत. काँग्रेसचे नेते पाकिस्तान धार्जिणे आहेत. त्यांचे भाषणाचे क्लिप पाकिस्तान दाखवत आहे. पाकिस्तानच्या संसदेत हे लोक आपल्यासोबत असल्याचे सांगितले गेले. आयुष्यभर हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे बाळासाहेब ठाकरे होते. मात्र उद्धव ठाकरे सर्वपक्षीय सभेला देखील उपस्थित नव्हते. या सर्व लोकांचे राजकारण मुस्लिम धार्जिणे आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात फेरबदल मंत्र्यांची यादी अपडेट; AAP TMC शिवसेना खासदार

0
मराठी बातम्याराष्ट्रीयपंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात फेरबदल मंत्र्यांची यादी अपडेट; AAP TMC शिवसेना खासदार | भाजपनवी दिल्ली2 तासांपूर्वीलिंक कॉपी करापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी...

बुधवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीचे योग आणि तूळ राशीचे लोक मोठ्या योजनेवर काम...

0
बुधवार, २४ जून रोजी मेष राशीच्या व्यक्तींचे नवीन संपर्क बनतील आणि कामात लोकांचे सहकार्य मिळेल. मिथुन राशीच्या व्यक्तींना आई किंवा घरातील एखाद्या महिलेच्या...

Vaibhav Suryawanshi ICC Rules Separate Dressing Room England

0
क्रीडा डेस्क4 तासांपूर्वीलिंक कॉपी करा15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी इंग्लंड दौऱ्यावर संघातील इतर खेळाडूंपेक्षा वेगळा ड्रेसिंग रूम वापरेल. सूर्यवंशीसाठी हा निर्णय आयसीसी (ICC) आणि...

कारच्या हेडलाइटमधून दिसेल सिनेमा:सारख्या चेहऱ्यामुळे 17 वर्षे निर्दोष व्यक्ती तुरुंगात राहिला; मशरूम खाल्ल्याने महिलेची...

0
चिनी टेक कंपनी हुआवे ने असे स्मार्ट हेडलाइट सादर केले आहे ज्यामुळे लोक सिनेमाचा आनंद घेऊ शकतात. दुसरीकडे, अमेरिकेत एका निर्दोष व्यक्तीला 17...
spot_img

Vaibhav Suryawanshi ICC Rules Separate Dressing Room England

0
क्रीडा डेस्क4 तासांपूर्वीलिंक कॉपी करा15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी इंग्लंड दौऱ्यावर संघातील इतर खेळाडूंपेक्षा वेगळा ड्रेसिंग रूम वापरेल. सूर्यवंशीसाठी हा निर्णय आयसीसी (ICC) आणि...

कारच्या हेडलाइटमधून दिसेल सिनेमा:सारख्या चेहऱ्यामुळे 17 वर्षे निर्दोष व्यक्ती तुरुंगात राहिला; मशरूम खाल्ल्याने महिलेची...

0
चिनी टेक कंपनी हुआवे ने असे स्मार्ट हेडलाइट सादर केले आहे ज्यामुळे लोक सिनेमाचा आनंद घेऊ शकतात. दुसरीकडे, अमेरिकेत एका निर्दोष व्यक्तीला 17...

संजय लीला भन्साळींविरुद्ध FIRची मागणी:लव्ह अँड वॉरच्या सेटवर विजेचा धक्का लागून कामगाराचा मृत्यू, असोसिएशनने...

0
संजय लीला भन्साळींचा आगामी चित्रपट ‘लव्ह अँड वॉर’ सेटवर झालेल्या अपघातानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटाचे शूटिंग मुंबई फिल्मसिटीजवळच्या रॉयल पंप स्टुडिओमध्ये सुरू...

मेटा, ॲमेझॉन सारख्या कंपन्यांमध्ये AIचा वापर मर्यादित:वेगाने येणारे नवीन मॉडेल महाग झाल्याने खर्च वाढला;...

0
या वर्षाच्या सुरुवातीला टेक कंपन्या कर्मचाऱ्यांना अधिकाधिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) वापरण्यासाठी प्रोत्साहित करत होत्या. अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांमध्ये एआय टूल्सवर खर्च होणाऱ्या 'टोकन'च्या संख्येवरून...
error: Content is protected !!