सातारा जिल्ह्यातील कासेगाव (ता. वाळवा) येथे एका युवकाची अमानुषपणे मारहाण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रहिमतुल्ला सलीम आतार असे मृत युवकाचे नाव आहे. रहिमतुल्लाचे एका नातेवाईक मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून त्याचे अ
?
पोलिस निरीक्षक जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेल्या संशयितांपैकी एकाची नातेवाइक असलेल्या कराडमधील मुलीबरोबर रहिमतुल्ला आतार याचे प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. रहिमतुल्ला हा मोबाईल दुरूस्तीचा व्यवसाय करीत असल्याने त्याचे कराडला नेहमी येणे-जाणे होते. सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास संशयितांनी दोन चारचाकी वाहनांतून येऊन वाठार (ता. कराड) येथून रहिमतुल्लाचे अपहरण केले. अपहरणानंतर त्याला रेठरे व कासेगाव येथे विविध ठिकाणी नेऊन दुपारी दोन ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत लोखंडी सळी, लाकडी दांडके व पीव्हीसी पाईपने बेदम मारहाण केली. जखमी अवस्थेतच रहिमतुल्लाला पुन्हा घरी आणून सोडण्यात आले.
गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या रहिमतुल्लाला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कराड विभागाचे पोलिस अधिकारी अमोल ठाकूर, पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप, सहाय्यक पोलिस निरीक्षक सखाराम बिराजदार, आणि फौजदार साक्षात्कार पाटील यांनी रुग्णालयात धाव घेतली.
यानंतर कराड तालुका व कासेगाव पोलिसांनी संयुक्त शोधमोहीम राबवली. रेठरे, वाठार आणि कासेगाव परिसरात छापे टाकून अवघ्या काही तासांत सातही संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई अपर पोलिस अधीक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली कराडचे पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर, इस्लामपूरचे पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण,पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप, सखाराम बिराजदार, साक्षात्कार पाटील, कासेगाव पोलिस ठाण्याचे फौजदार कृष्णत कांबळे, कराड तालुका व कासेगाव पोलिसांनी केली.
































